सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड' गाडीचा आविष्कार 

सातवीपर्यंत शिक्षण झालेले आवटी हे पेशाने मेकॅनिकआहेत. त्यामुळे त्यांना भंगारातून नेहमीच काही ना काही बनविण्याची आवड आहे.
Jugaad Mini Ford Car
Jugaad Mini Ford Car

सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांच्या जुगाड जीपची (Jugaad Jeep) चर्चा ताजी असतानाच सांगलीच्याच आणखी एका अवलियानं भंगारातल्या साहित्यातून १९३० सालची प्रसिद्ध मिनी फोर्ड गाडी (Jugaad Mini Ford car) तयार केली आहे. सांगली शहरातील काकानगर येथे राहणाऱ्या अशोक आवटी (Ashok Awaty) या अवलियाने ही गाडी तयार केली आहे. भंगारातील साहित्य आणि दुचाकीच्या इंजिनाच्या (Teo wheeler Engine) जुगाडातून आवटी यांनी ही गाडी बनवली आहे. 

सातवीपर्यंत शिक्षण झालेले आवटी हे पेशाने मेकॅनिक (Mechanic) आहेत. त्यामुळे त्यांना भंगारातून नेहमीच काही ना काही बनविण्याची आवड आहे. गॅरेजमध्ये वीज नसल्याने त्यांनी असाच जुगाड करत पवनचक्की (Windmill) तयार करून त्यातून वीज तयार केली होती. आपल्याकडेही चारचाकी गाडी असावी, असे त्यांना वाटत असे. पण ऐपत नाही म्हणून कधी चारचाकी गाडी घेता आली नाही. मग त्यांना स्वत:च गाडी बनविण्याची कल्पना सुचली. लॉकडाऊनमध्ये युट्यूबवर त्यांनी अशा गाड्या पाहिल्या होत्या... त्यातूनच त्यांनी दुचाकीच्या इंजिनपासून १९३० सालची प्रसिद्ध मिनी फोर्ड गाडी तयार केली. या गाडीचं वजन जवळपास १०० किलो असून त्यांना यासाठी ३० हजारांचा खर्च आला आहे.    अशी तयार झाली मिनी फोर्ड गाडी -  

आवटी यांनी भंगारातील साहित्य, जुन्या एमएटी (M80) गाडीचं इंजिन आणि रिक्षाच्या पार्टचा (Auto Part) वापर करून ही जुगाड गाडी (Jugaad Car) तयार केली आहे. गाडी सुरू करण्यासाठी गाडीला रिक्षाप्रमाणेच हँडल आहे. तसेच रिव्हर्स गिअरसाठी रिक्षाचा गिअर बॉक्स बसवला आहे. तर गाडीचं स्टेअरींग आवटी यांनी स्वत: तयार केलं आहे. गाडीला एमएटी दुचाकीची चाकं असून गाडीला तीन गिअर आहेत. तर ही गाडी ३० किलोमीटरच मायलेज देते. या गाडीत चार लोकं आरामात बसू शकतात. १९३० सालच्या मिनी फोर्ड गाडीप्रमाणे आवटी यांनी हूबेहूब गाडी तयार केली आहे. रस्त्यावर धावताना आता ही गाडी सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे.      

व्हिडीओ पाहा - 

जुगाड जीपनंतर मिनी फोर्डचा आविष्कार - 

सांगलीच्या देवराष्ट्रे गावातल्या दत्तात्रय लोहार (Dattatrey Lohar) यांनी भंगारातील साहित्यातून अशीच एक जुगाड जीप (Jugad Jeep) तयार केली होती. लोहार यांच्या या जुगाड जीपची आख्ख्या देशभरात चर्चा झाली. त्यांच्या या जुगाड जीपची प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी दखल घेतले होती. लोहार यांच्या जीपची चर्चा सुरू असतानाच आवटी यांनी जुगाडातून बनवलेल्या मिनी फोर्डचाही बोलबाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com