पशुपालकांना मिळणार KCC अंतर्गत पैसे

ग्रामीण भागातील जवळपास दोन तृतीयांश लोकांच पशुपालन हे उपजीविकेचं साधन आहे. सोबतच या क्षेत्रात बहुतांशी महिला गुंतलेल्या आहेत. यामुळे पशुधन क्षेत्राला बळकटी देण म्हणजे ग्रामीण भारतातील महिलांना समृद्ध करणे होय. किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, ज्याअंतर्गत शेतकऱ्याना एक कार्ड दिलं जात ज्याला आपण शेतकऱ्यांच ATM म्हणू शकतो.
KCC limit increase for 5 years
KCC limit increase for 5 years

किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, ज्याअंतर्गत शेतकऱ्याना एक कार्ड दिलं जात ज्याला आपण शेतकऱ्यांच ATM म्हणू शकतो. सन १९९८ पासूनचं ही योजना शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे. मात्र २०१९ पासून पशुपालकांसाठी पशु kcc हे पशुपालन आणि मच्छिमारी करणाऱ्या व्यवसायासाठी सुरु केलय. Rupay या इंडिअन डोमेनचं हे कार्ड आहे.

किसान क्रेडीट कार्डची गरज केव्हा भासते?

शेतकऱ्यांना अॅग्रीचे इनपुट खरेदी करण्यासाठी वेळेत पैसे उपलब्ध व्हावेत म्हणून नाबार्ड (NABARD) द्वारा ही योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ एकट्या शेतकऱ्याला, गटाने किंवा भाडे तत्वावर शेती करणारे शेतकरी, महिला बचत गट यांसारखे व्यवसायिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पशु kcc मध्ये- डेअरीचे स्वतंत्र पशुपालक, गटाने पशुपालन करणारे, मालकी किंवा भाडेतत्त्वावर पशुपालन करणारे तसेच महिला बचत गट, कुक्कुटपालन करणारे, शेळीपालन करणारे सोबतच मासेमारी करणारे यांसारखे व्यवसायिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हेही पाहा-

पशुपालकांना पशु kcc तीन प्रकारे उपलब्ध होऊ शकते- पिकांची kcc असलेलं शेतकरी आणि नवीन पशु kcc यात दोन प्रकार येतात- १.६ लाखांपर्यंत गहाण खताशिवाय आणि १.६ लाखापासून ३ लाखापर्यंत गहाण खताची गरज पडते.

पशुसंवर्धनातील खेळत्या भांडवलाच्या वित्तीय घटकांमध्ये, पशु आहार, (Animal feed) पशु चिकित्सा, पशुधनाचा विमा, मजूर खर्च, पाणी आणि विज पुरवठा यांचा समावेश होतो. भांडवलाची आवश्यकता असलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना त्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकूण रकमेवर ९ % व्याज दर (interest) द्यावा लागू नये म्हणून RBI कडून २ % दराची व्याज सवलत दिली जाते. मग उरलेल्या ७ टक्क्यावर जर पशुपालकांनी वेळेत कर्जाची परतफेड केली तर अजून 3% सवलत दिली जाते. याचाच अर्थ पशुपालकांना फक्त ४ टक्के व्याजदर एकूण रकमेच्या द्यावं लागेल.

पशु kcc अंतर्गत पशुपालन आणि मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांना २ लाखापर्यंत अल्प मुदतीसाठी ७ % सवलतीच्या दराने आणि जर कर्जदाराने वेळेत कर्जाची परतफेड केली तर त्यांना अधिकची २ %  सवलत दिली जाते.

२०२१-२१ साठी निश्चित केलेले कर्जाचे दर आता आपण पाहूया-

एका गायीसाठी (cow) १२००० रुपये आणि एका म्हशीसाठी-१४००० रुपये दिले जातात. १० शेळ्या किंवा मेंढ्यांच्या व्यवस्थापन खर्चाकरता १२५०० ते २०००० पर्यंत रक्कम दिली जाते. कुक्कुटपालनामध्ये १०० पक्ष्यांच्या युनिटसाठी ब्राॅयालरसाठी ८००० रुपये,  लेअरसाठी १०००० रुपये, आणि गावठी कोंबड्यासाठी ५००० रुपये मिळतात. पशुपालकांना पशु kcc चा फायदा करून घेण्यासाठी आपल्या गोठ्यातील पशुधनाची इनाफ अंतर्गत नोंदणी म्हणजेचं त्यांच्या कानात टॅग असला पाहिजे.

हेही पाहा-

पशु kcc काढताना लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-

  • पूर्ण भरलेला अर्ज
  • ७/१२
  • आधार कार्ड (Adhar Card)
  • जनावरांच्या कानातील टॅगचा क्रमांक –कोऱ्या कागदावर लिहून द्यावा लागतो.
  •  पशुपालकांनी kcc यासाठी बँकेत अर्ज केल्यानंतर २ आठवड्यांच्या आत बँकेच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना, पशुपालकांना kcc उपलब्ध करून द्यावं लागते. एकदा काढलेलं पशु kcc हे ५ वर्षापर्यंत राहत, म्हणजेच या ५ वर्षात पशुपालक बॅकेतून कर्ज घेण आणि परतपेढ या गोष्टी करू शकतात. हा कालवधी संपल्यानंतर पुन्हा kcc हवा असल्यास कागदपत्रे पडताळणी करावी लागते.     

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com