The kharif is gone, now the season | Agrowon

खरीप गेला, आता भिस्त रब्बी हंगामावर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021

तऱ्हाडी, जि. धुळे : गेल्या महिन्यात अतिवृष्टीने खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले असून, खरीप हंगाम हातून गेला आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामावर भिस्त आहे. शेतीची मशागत करून तऱ्हाडीसह शिरपूर तालुक्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे.

तऱ्हाडी, जि. धुळे : गेल्या महिन्यात अतिवृष्टीने खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले असून, खरीप हंगाम हातून गेला आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामावर भिस्त आहे. शेतीची मशागत करून तऱ्हाडीसह शिरपूर तालुक्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचा हरभरा व गहू पिकाकडे कल असून, हरभरा व गहू लागवड क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ऐन काढणीच्या हंगामात खरीप हंगामाच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. त्यात कापूस, बाजरी, मूग, कांदे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापाठोपाठ परतीच्या पावसाने उडीद, मठ, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता पावसाने उघडीप दिल्याने थंडीची चाहूल लागली असून, रब्बी पेरणीयोग्य वातावरण निर्माण झाले आहे.

सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा जास्त प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात तण वाढले असून, त्यामुळे शेतकरी तणनाशक फवारून व ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची मशागत करण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. काही ठिकाणी पेरणीयोग्य झालेल्या क्षेत्रामध्ये हरभरा व गहू पेरणीला सुरवात झाली असून, यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळे कूपनलिका व विहिरी यांच्यात पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे.


इतर बातम्या
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...