पेरूचे आरोग्यदायी गुणधर्म

पेरू हे नाशवंत फळ असून योग्य वेळेवर पेरू फळांची विक्री न झाल्यास ती खराब होतात. यासाठी विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून विक्री करणे अधिक फायदेशीर ठरते. पेरूचे फळाप्रमाणेच पेरू झाडाचे इतर भागदेखील तेवढेच उपयोगी आहेत.
Guava fruit
Guava fruit

पेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही. योग्य वेळेवर पेरू फळांची विक्री न झाल्यास ती खराब होतात. यासाठी पेरू फळापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून विक्री करणे अधिक फायदेशीर ठरते. पेरूपासून बनविलेल्या विविध प्रक्रियायुक्त फळांना बाजारात चांगली मागणी आहे. पेरूचे फळाप्रमाणेच पेरू झाडाचे इतर भागदेखील तेवढेच उपयोगी आहेत. पेरू हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील फळ असून आज बहुतेक सर्वच देशांमध्ये आढळते. पेरूची झाडे  उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. सामान्यपणे पेरूच्या दोन जाती आहेत. एका जातीमध्ये पांढरा तर दुसऱ्या जातीमध्ये गुलाबी गर असतो. दोन्हीही जातींचे पेरू चवीने गोड व थोडेसे तुरट असतात. अनेक पक्षी पेरू आवडीने खातात. आवळ्याच्या खालोखाल भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व देणारे फळ म्हणून पेरू ओळखला जातो. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होत नाही. पेरू फळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पेरूची चव वर्षभर घ्यायची असेल, तर त्याला काही प्रक्रिया करून वेगवेगळ्या पदार्थांच्या स्वरूपात टिकवून ठेवता येते. फायदे 

  • बद्धकोष्ठतेच्या समस्येवर पेरू खाणे फायद्याचे ठरते. त्यासाठी सकाळच्या वेळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खावा.
  • काही लोकांच्या तोंडामध्ये दुर्गंध येतो. त्यासाठी पेरूची पाने तोंडामध्ये ठेवून चावल्यास दुर्गंध वास कमी होण्यास मदत होते. तसेच दात दुखण्याचा त्रास असेल तर तोही कमी होतो.
  • पोटॅशिअम आणि तंतूच्या जास्त प्रमाणामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
  • पेरू सात्त्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक आहे. त्यामुळे बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला, तर मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते.
  • दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामधील जीवनसत्त्व ‘क’ तसेच ग्लुकोज, टॅनिन आम्ल या घटकांमुळे खालेले अन्न सहजरित्या पचण्यास मदत होते.
  • पोटाच्या विकारांसाठी पेरू गुणकारी मानला जातो.
  • पेरूमध्ये जीवनसत्त्व ‘क’, तंतुमय पदार्थ तसेच इतर पौष्टिक पदार्थ मुबलक प्रमाणात आहेत. हे सर्व घटक एकत्र मिळून शरीरात अँटीऑक्सिडण्ट सारखे म्हणून काम करतात.
  • जीवनसत्त्व ‘अ’मुळे डोळ्यांचे आरोग्यदेखील चांगले राहते.
  • पेरूच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट सोबत इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो. जे शरीरास फायदेशीर असतात.
  • लहान बालके, गर्भवती आणि अशक्त स्त्रिया, कृश व्यक्ती यांनी पेरूचे नियमित सेवन केले पाहिजे. यामधील जीवनसत्त्व ‘क’ आणि इतर पौष्टिक घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीर सुदृढ व मजबूत होते.
  • गर्भवती महिलांसाठी पेरू खाणे चांगले असते. गर्भवती स्त्रियांना उलटी, मळमळ असा त्रास होतो. त्यासाठी पेरूचा सरबत थोड्याथोड्या अंतराने पीत राहावा. आराम मिळतो. तसेच तोंडास रुची निर्माण होऊन उलटी, मळमळीची भावना कमी होऊन भूक चांगली लागते.
  • त्वचेवर उमटणारे चट्टे, डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळे यावर पेरू उपयुक्त आहे.
  • पेरूचा गर नुसता शरीरावर लावल्यानेसुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते. त्वचा नितळ होऊन तेजस्वी दिसायला लागते.
  • पेरूमध्ये ८० टक्के पाणी असते. हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यासही मदत करते. 
  • पेरू रसामध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असते. पेरू पाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम कार्य करते.
  • - प्रा. चव्हाण व्ही. आर. ९५१८३४७३०४ डॉ. काळे आर. व्ही., ९४०३२६१४५० (एम. जी. एम. अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, जि. औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com