
राळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या बियांच्या आकाराचे असते. राळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हे सर्व गुणधर्म बघता राळ्याचा नियमित वापर आहारामध्ये होणे गरजेचे आहे. राळ्याला इंग्रजीमध्ये फॉक्सटेल मिलेट किंवा इटालियन मिलेट आणि हिंदीमध्ये कांगणी किंवा ककूम असे संबोधले जाते. राळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या बियांच्या आकाराचे असते. राळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हे सर्व गुणधर्म बघता राळ्याचा नियमित वापर आहारामध्ये होणे गरजेचे आहे. पोषकत्त्वांचे प्रमाण (प्रति १०० ग्रॅमनुसार) पोषणतत्त्वे---प्रमाण कर्बोदके---६० ग्रॅम प्रथिने---१२.३ ग्रॅम तंतूमय पदार्थ---१४ ग्रॅम कॅल्शिअम----३१ग्रॅम लोह---२.८ ग्रॅम फॉस्फरस---२९० मिलिग्रॅम मॅग्नेशिअम---८१ मिलिग्रॅम थायमीन---०.५९ मिलिग्रॅम तांबे---१.४० मिलिग्रॅम आरोग्यदायी गुणधर्म
राळ्याचे मूल्यवर्धन दळणे तांदळाप्रमाणे राळ्याचे बाह्य आवरण काढून ते पॉलिश केले जाते. असे पॉलिश केलेले अख्खे किंवा पिठाच्या स्वरूपात राळा उपलब्ध असते. भाजून किंवा शिजवून
आंबवून राळ्याचे पीठ तांदूळ आणि आणि उडीद डाळीबरोबर आंबवून इडली, डोसा, उत्ताप्पा असे चविष्ट पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ पचायला हलके तसेच मूल्यवर्धक असतात. राळ्याचा पुलिओगरे भात साहित्य राळे, पुलिओगरे तयार मसाला, मीठ चवीनुसार, तेल, सजावटीसाठी कोथिंबीर कृती नेहमीच्या भाताप्रमाणे राळे मीठ घालून शिजवून घ्यावे. कढईत तेल गरम करून घ्यावे. गरम तेलामध्ये मसाला घालून चांगले परतून घ्यावे. तयार राळ्याचा भात घालून व्यवस्थित परतावे. - जया जमादार, ९०४९७६१३९३ ज्ञानेश्वर शिंदे, ७५८८१७९५८० (दादासाहेब मोकाशी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, मोकाशी जि. सातारा)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.