
योगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक, पोटॅशिअम, आयोडीन आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. याशिवाय त्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटीक्स असतात. योगर्ट बनविण्यासाठी गाय, म्हैस, शेळीच्या दुधाचा वापर केला जातो. योगर्टसाठी वापरण्यात येणाऱ्या उपयुक्त जिवाणूला ‘योगर्ट कल्चर’ म्हणतात. जेव्हा हे उपयुक्त जिवाणू दुधात टाकले जाते, त्यानंतर दुधातील लॅक्टोज आंबते आणि ‘लॅक्टिक अॅसिड’ तयार होते. लॅक्टिक अॅसिडमुळे दूध घट्ट होते आणि त्याला योगर्टची विशिष्ट चव येते. हे तयार झालेले योगर्ट त्यानंतर थंड केले जाते आणि त्यात आवडीनुसार स्वाद मिसळले जातात. आपण ‘फ्लेवर्ड योगर्ट’ म्हणतो. लॅक्टिक अॅसिड बनविणाऱ्या ‘योगर्ट कल्चर’मुळे आंबटगोड चव येते. ज्या लोकांना डेअरी प्रोडक्ट्सपासून ॲलर्जी असते ते देखील योगर्ट खाऊ शकतात. कारण यामध्ये लॅक्टोज नसल्याने त्यापासून होणारी ॲलर्जी होत नाही. योगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक, पोटॅशिअम, आयोडीन आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. याशिवाय त्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. म्हणून योगर्ट खाणे शरीरासाठी चांगले असते. योगर्ट उत्पादन
योगर्टचे आरोग्यदायी फायदे
- शैलेंद्र कटके, ९९७०९९६२८२ (अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.