
घरगुती पातळीवर रंगांची निर्मिती सोपी आहे. व्यावसायिक पातळीवर उद्योग म्हणून करण्यासाठी थोडेसे प्रशिक्षण पुरेसे ठरू शकते. एकदा कौशल्यप्राप्तीनंतर दरवर्षी महिलांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय होऊ शकतो. या रंगांची उपलब्धी केल्याने आपले पर्यावरण, आरोग्य यांची हानी टाळू शकतो. माणूस आणि समाजाला जोडून ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये सण, उत्सव, उरुस, जत्रा, यात्रा यांची भूमिका मोठी असते. मात्र कोणताही आनंदी उत्सव साजरा करत असताना तो अधिकाधिक पर्यावरणपूरक कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. आनंद एकमेकांसोबत वाटून घेताना त्यासोबत अपघात, दुःख आणि पर्यावरणाची हानी या बाबी आपण भेट देत नाही ना, याकडेही प्राधान्याने पाहिले जाते. अशा बाबी नक्कीच टाळल्या पाहिजेत. येत्या काळामध्ये होळी हा सण फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला (२८ मार्च) येत आहे. उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशी, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये होळीनंतर पाच दिवसांनी येणाऱ्या रंगपंचमीला रंग खेळला जातो. त्याच प्रमाणे होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाला होळी ज्वलनानंतर तयार झालेली राख ओली करून एकमेकांना लावण्याचीही प्रथा आहे. या तिन्ही दिवशी खेळण्यासाठी विविध प्रकारचे रंग वापरले जातात. बाजारामध्ये रासायनिक पद्धतीने तयार केलेले रंग उपलब्ध असतात. या रंगांचा वापर केल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उदा. त्वचेला, डोळ्यांना इजा किंवा हानी पोहोचणे, केस खराब होणे इ. विशेषतः लहान मुलांची त्वचा अत्यंत नाजूक असते, त्यांना याचा फटका बसू शकतो. हे टाळण्यासाठी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असलेल्या विविध वनस्पतींपासून आपल्याला घरगुती रंग तयार करता येतो. झाडांची फुले, पाने, साली, मुळे, बिया अशा विविध भागांपासून पर्यावरणपूरक रंग तयार करता येतात. उदा. हळदीपासून पिवळा, पळसाच्या फुलांपासून केशरी, मंजिष्ठाच्या मुळांपासून लाल, निळीपासून निळा, निलगिरीच्या सालीपासून तपकिरी (काथ्या). वैशिष्ट्ये
रंगनिर्मितीसाठी आवश्यक साहित्य
पद्धत
गृहउद्योग होळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रंगाला मागणी असते. बाजारामध्ये नैसर्गिक रंगाची उपलब्धता कमी असल्याने आरोग्यासाठी जागरूक लोकांना नैसर्गिक रंगांना चांगलीच मागणी मिळू शकते. ग्रामीण भागामध्ये बहुतांश वनस्पती तुलनेने स्वस्तामध्ये उपलब्ध होऊ शकतात. याचा फायदा घेऊन महिला बचत गट नैसर्गिक रंगनिर्मिती नक्कीच करू शकतात. घरगुती पातळीवर रंगांची निर्मिती सोपी आहे. व्यावसायिक पातळीवर उद्योग म्हणून करण्यासाठी थोडेसे प्रशिक्षण पुरेसे ठरू शकते. एकदा कौशल्यप्राप्तीनंतर दरवर्षी महिलांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय होऊ शकतो. या रंगांची उपलब्धी केल्याने आपले पर्यावरण, आरोग्य यांची हानी टाळू शकतो. संपर्क- डॉ. आर. एल. काळे, ७३५०२०५७४६ (प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.