
आले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे. आल्यापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांनाही चांगली मागणी आहे. आरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना शहरी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धन करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. आले पेस्ट घरगुती पदार्थ निर्मितीवेळी आले पेस्ट वापरली जाते. पेस्ट बनवण्यासाठी प्रथम आल्याच्या वरील साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यामध्ये मीठ, सायट्रिक आम्ल घालावे. मिश्रण मिक्सरमधून फिरवून पेस्ट तयार करावी. तयार केलेली पेस्ट ८२ अंश सेल्सिअस तापमानास गरम करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावे. आले पावडर प्रथम आले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घ्यावे. आले पातळ चकत्यांमध्ये कापून उन्हामध्ये किंवा ड्रायरच्या साह्याने वाळवून घ्यावे. वाळलेले आल्याचे तुकडे मिक्सरमधून फिरवून घ्यावेत. तयार झालेली पावडर पाकिटांमध्ये हवाबंद करावी. साठवण कोरड्या जागी करावी. ज्यूस साहित्य आले १०० ग्रॅम, मध अर्धा चमचा, सेंधवा मीठ पाव चमचा कृती आल्याचा ज्यूस बनवण्यासाठी आले स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून टाकावी. त्याचे अर्धा इंचांचे तुकडे करून घ्यावेत. त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून ज्युसर मधून फिरवून घ्यावे. तयार ज्यूस गाळणीने गाळून घ्यावा. त्यामध्ये मध आणि सैंधव मीठ घालून व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे. तयार झालेला ज्यूस बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावा. सर्दी, घसा दूखी वर आले ज्यूस उत्तम उपाय ठरू शकतो. आले कॉर्डियल साहित्य आले १०० ग्रॅम, गूळ २०० ग्रॅम, सायट्रिक आम्ल ५ ग्रॅम, लिंबू रस पाव चमचा. कृती कैरीच्या पन्ह्याप्रमाणे आल्याचे कॉर्डियल बनवले जाते. त्यासाठी प्रथम आले स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून टाकावी. त्याचे बारीक तुकडे करून शिजवून घ्यावेत. शिजवलेले आले, बारीक किसलेला गूळ, लिंबाचा रस, सायट्रिक आम्ल एकत्रित करून हाताने व्यवस्थित कुस्करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण चाळणीने चाळून घ्यावे जेणेकरून त्यामध्ये गुळाचा खडा राहणार नाही. तयार मिश्रण काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमधे ठेवावे. हे कॉर्डियल बनवताना तयार केलेले १ चमचा मिश्रण १ ग्लास पाण्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून सर्व्ह करावे. हे कॉर्डियल फ्रीजमधे ३ महिन्यापर्यंत टिकते . आले कॅण्डी साहित्य आले २०० ग्रॅम, साखर ३०० ग्रॅम, वेलची पावडर अर्धा चमचा कृती
- करिश्मा कांबळे, ८४५९३७४६८४ (सहाय्यक प्राध्यापिका, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, आचळोली ,जि. रायगड)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.