लिंबू प्रक्रियेतील संधी

लिंबाच्या रसात जंतुनाशकता व रोगप्रतिकारकता वाढविण्याची क्षमता असल्याने उन्हाळ्यामध्ये आहारात याचा वापर करावा. लिंबातील विपुल जीवनसत्वामुळे रक्तपित्तावर नियंत्रण आणते.
lemon
lemon

लिंबाच्या रसात जंतुनाशकता व रोगप्रतिकारकता वाढविण्याची क्षमता असल्याने उन्हाळ्यामध्ये आहारात याचा वापर करावा. लिंबातील विपुल जीवनसत्वामुळे रक्तपित्तावर नियंत्रण आणते.

लिं बू हे पाचक, नेत्र सतेज करणारे, उत्साहवर्धक, रुचकर व वायुहरक आहे. उलटी, कंठरोग, कॉलरा, आमवात, रक्तवात व कृमींचा नाश करणारे आहे. वनस्पतिजन्य विष पोटात गेल्यास  लिंबाचा रस गुणकारी आहे. लिंबाच्या रसात जंतुनाशकता व रोगप्रतिकारकता वाढविण्याची क्षमता असल्याने उन्हाळ्यामध्ये आहारात याचा वापर करावा. लिंबातील विपुल जीवनसत्त्वामुळे रक्तपित्तावर नियंत्रण आणते. 

 •  दात आणि हाडांची मजबुती व संधिवातावर लिंबूरस गुणकारी आहे.
 •  दाढेची सूज, घसा व तोंडाच्या विकारावर तसेच स्कर्व्हीसारख्या आजारावर लिंबूरस गुणकारी आहे.
 • लिंबूरस अपचन, हृदयातील धडधड व उच्च रक्तदाब कमी करणारा आहे.
 • मूत्रपिंड, मूत्राशय व यकृताच्या विकारांवर लिंबू रस गुणकारी आहे.
 • मध व लिंबाच्या रसाने बद्धकोष्ठता दूर होते. स्थूलपणा दूर करण्यासाठी लिंबू रस, मध  आणि पाणी नियमितपणे घेतल्यास फायदा होतो. औषधी गुणधर्म असलेले लिंबू आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
 • प्रक्रियेतील संधी  रस 

 •   रस काढण्यासाठी मोठ्या आकाराची चांगली पिवळसर फळे घेऊन स्वच्छ धुऊन घ्यावीत. लिंबू प्रेसरच्या साह्याने रस स्टीलच्या पातेल्यात गाळून घ्यावा.
 •   स्टीलच्या पातेल्यामध्ये रस ८० अंश सेल्सिअस तापमानाला २० मिनिटे गरम करावा. किंवा प्रतिलिटर रसामध्ये ६०० मिलि ग्रॅम सोडिअम बेन्झोएट मिसळावे.
 •   बाटल्या व झाकणे उकळत्या पाण्यात २५ ते ३० मिनिटे ठेवून निर्जंतुक करून त्या कोरड्या कराव्यात. त्यामध्ये ताबडतोब रस भरून घ्यावा. निर्जंतुक करून घेतलेली झाकणे बसवून हवाबंद करावीत.
 •   या रसाचे स्क्वॅश, सरबत, सिरप करता येते. रासायनिक संरक्षक वापरून साठविलेल्या रसापासून स्क्वॅश सरबत करताना पुन्हा सोडिअम बेन्झोएट मिसळण्याची आवश्‍यकता नसते.
 • स्क्वॅश  

 • स्क्वॅश तयार करण्यासाठी २० टक्के रस, ४५ टक्के साखर आणि १ टक्का सायट्रिक आम्ल घ्यावे.सरबताप्रमाणेच स्क्वॅश तयार करावा. 
 •  रस १ लिटर, साखर २ किलो आणि पाणी १ लिटर घ्यावे.
 •  एक लिटर स्क्वॅशपासून ८ लिटर सरबत तयार करता येते.
 • लोणचे

 •   लोणचे तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली पिवळसर रंगाची व मोठ्या आकाराची फळे निवडावीत. स्वच्छ धुऊन फडक्‍याने कोरडी करावीत. लोणचे तयार करताना जितकी जास्त स्वच्छता राखली जाईल तेवढे चांगल्या प्रतीचे लोणचे तयार होते व ते खराब होत नाही.
 •   लिंबू स्वच्छ धुवून व कोरडे करून घेतलेल्या लिंबाच्या स्टीलच्या तीक्ष्ण सुरीने चार सारख्या फोडी कराव्यात व त्यातील बिया काढाव्यात.
 • घटक पदार्थ ः  लिंबू ः १ किलो मीठ ः  १२० ग्रॅम आले (बारीक तुकडे केलेले) ः ५० ग्रॅम हळद, वेलची, मिरे, बडीशेप, लाल तिखट प्रत्येकी १५ ग्रॅम, लवंग ५ नग, गूळ ७०० ते ८०० ग्रॅम   काचेची बरणी स्वच्छ करून नंतर ती गरम पाण्याने धुऊन कोरडी करावी. यामध्ये लिंबाचे लोणचे भरावे. 

  लिंबाच्या सालीचे फायदे

 •   लिंबू वापर झाल्यानंतर अनेक जण साल फेकून देतात. मात्र ही साल आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे.
 •   सालीत लिंबाच्या ५ ते १० पट जास्त जीवनसत्त्व असते. त्यामध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि जीवनसत्त्व क असते. त्यामुळे शरीराला आवश्यक पौष्टिक घटक तर मिळतात, सोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते.
 •   लिंबाच्या सालीत असलेलं सॅल्वेस्ट्रोल क्यू-४० आणि लिमोनेन कॅन्सरच्या पेशींशी लढण्यासाठी मदत करतात. चहामध्ये लिंबाची साल टाकून प्यायल्यास कॅन्सरच्या पेशी जास्त वाढत नाहीत, असं संशोधनात सिद्ध झाले आहे.
 •   लिंबू सालीत सर्वाधिक प्रमाणात जीवनसत्त्व क आणि कॅल्शिअम असते, ज्यामुळे हाडं निरोगी राहतात. हाडांशी संबंधित आजार होत नाहीत.
 •   जीवनसत्त्व ‘क’च्या कमतरतेमुळे हिरड्यांतून रक्त येणे, हिरड्यांना सूज येणे अशा दातांच्या समस्या उद्‌भवतात. लिंबूच्या सालीत सायट्रिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे जीवनसत्त्व ‘क’ची कमतरता भरून निघते. दातांशी संबंधित समस्या होत नाहीत.
 •   लिंबू साल वजन घटवण्यासही मदत करते. लिंबाच्या सालीत पेक्टिन हा घटक असतो, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते.कोलेस्ट्रॉल कमी होते. हृदयासंबंधी समस्या कमी होण्यास मदत मिळते.
 • - ज्ञानेश्वर शिंदे,  ७५८८१७९५८० (आचार्य पदवीचे विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, प्रयागराज, उत्तर प्रदेश)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com