खरबुजापासून पावडर, सरबत

खरबुजाचे मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात केल्यास ते टिकवून ठेवण्यात मदत होते. या फळापासून जॅम, जेली, गर, सरबत, स्क्वॅश तयार करता येतो.
muskmelon juice
muskmelon juice

खरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात केल्यास ते  टिकवून ठेवण्यात मदत होते. या फळापासून जॅम, जेली, गर, सरबत, स्क्वॅश तयार करता येतो.

खरबूज फळ पौष्टिक आणि औषधी आहे. हे  जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क , जीवनसत्त्व बी ६ आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. खरबूज हे नाशवंत फळ असल्याने जास्त काळ साठवले जाऊ शकत नाही. खरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात केल्यास ते  टिकवून ठेवण्यात मदत होते. या फळापासून जॅम, जेली, गर, सरबत, स्क्वॅश तयार करता येतो. पावडर 

  • खरबुजाची फळे स्वच्छ पाण्यात धुऊन आणि स्टेनलेस स्टीलच्या चाकू वापरून त्यावरील खाण्यास योग्य नसलेला भाग काढून घ्यावा. 
  • सोललेली फळे दोन भागात अर्धवट कापून त्याच्या बिया काढाव्यात. नंतर त्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून त्याचा गर करून घ्यावा. हा गर मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. नंतर हा गर स्प्रे ड्रायर किंवा कॉन्व्हेंशनल ड्रायर वापरून वळवावा. पावडर प्लास्टिकच्या पिशवीत साठवावी. 
  • सरबत  

  • चांगली निवडलेली फळे स्वच्छ पाण्यात धुऊन आणि स्टेनलेस स्टीलच्या चाकू वापरून त्यावरील खाण्यास योग्य नसलेला भाग काढावा. सोललेली फळे दोन भागात अर्धवट कापून त्याच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये त्याचा गर करून घ्यावा. 
  • गरामध्ये १० टक्के खरबूज गर आणि  १० टक्के साखर असते तसेच ०.१ -०.३ टक्के आम्ल असते. 
  • एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये १ किलो  साखर आणि १ ते ३ ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि ९ लिटर पाणी मिसळून घ्यावे. बनवलेले मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटे गरम करून थंड करून घ्यावे थंड केलेले आरटीएस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे.
  • सिरप 

  • चांगली निवडलेली फळे स्वच्छ पाण्यात धुऊन आणि स्टेनलेस स्टीलच्या चाकू वापरून त्यावरील खाण्यास योग्य नसलेला भाग काढावा. सोललेली फळे दोन भागात अर्धवट कापून  त्याच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये  गर करून घ्यावा.
  • ५०० मिलि गरामध्ये २५० ग्रॅम साखर आणि २ ग्रॅम सायट्रिक आम्ल किंवा १० मिलि लिंबाचा रस मिसळावा. हे मिश्रण साखर विरघळण्यासाठी उकळावा. 
  • उकळलेले मिश्रण सुती कापडातून गाळून प्लास्टिक बाटलीमध्ये भरून रेफ्रिजरेटरमध्ये साठवावे.
  •  - विठ्ठल चव्हाण, ९५१८३४७३०४  ( एम. जी. एम. अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com