प्रक्रियायुक्त आहारासाठी भरडधान्य फायदेशीर

भरड धान्यामध्ये एकूणच प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. प्रथिने शरीरातील झीज भरून काढतात. तसेच आपले स्नायू बळकट करायला देखील मदत करतात. भरड धान्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होते.
Various food products made from sorghum
Various food products made from sorghum

भरड धान्यामध्ये एकूणच प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. प्रथिने शरीरातील झीज भरून काढतात. तसेच आपले स्नायू बळकट करायला देखील मदत करतात. भरड धान्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होते. मका, ज्वारी, बाजरी आणि इतर  कनिष्ठ तृणधान्यांचे उत्पादन हे आपल्या भारतातील पूर्ण खाद्य असून, धान्यांचा एकूण उत्पादनातील चौथा हिस्सा आहे. भारतीय धान्यपदार्थांच्या अर्थ उद्योगात भरड धान्याला एक महत्त्वाचे स्थान आहे. 

 • पारंपरिक स्वयंपाकाच्या पद्धती व्यतिरिक्त भरडधान्य प्रामुख्याने लहान बालकांचे अन्न व मोठ्या माणसांसाठी मुख्य अन्न म्हणून जास्त प्रमाणात वापरले जाते. 
 • ज्वारी हे ग्लुकोज आणि इतर पेयाच्या उत्पादनास वापरतात. नाचणी आणि गहू यांच्या मिश्र प्रमाणातील अनेक पदार्थ बाजारात उपलब्ध होऊन लोकप्रिय होत आहेत. यामध्ये बिस्किटे, केक, शेवया विविध पेये, इत्यादी ते पापड, आटा अशा पदार्थांचा समावेश आहे. 
 • काही पारंपरिक पद्धतीमध्ये जसे फुलवणे, भाजणे, मोड आणणे, भिजवणे या पद्धतीने तयार केलेले पदार्थ लोकप्रिय होऊ लागले आहेत. लहान बालके आणि  वयस्कर लोकांच्या आहारात भरडधान्याचा किंवा त्यांच्या मिश्र पिठाचा वापर लाभदायक आहे. 
 • ज्वारीच्या पिठाची भाकरी, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.  ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर ( गोड ज्वारीपासून ) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (माल्ट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात.
 • ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करतात. ज्वारीच्या पोहे तयार करण्याचे तंत्र  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये  विकसित झाले आहे.
 • नाचणीपासून भाकरी, आंबिल किंवा लापशी करतात. नाचणीची चव गोड, तुरट असते. ती पचायला भरपूर हलकी असते. त्वचेच्या रोगांवर पोटिस बांधण्यासाठी उपयोग होतो. नाचणीत लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे रक्तक्षयामध्ये उपयोगी आहे.
 • बाजरीपासून  भाकरी बरोबरच शंकरपाळी, पुरी, वडे तसेच इतर पिठांसोबत अनेक पदार्थ तयार करता येतात. जास्त पौष्टिकता व विविधता मिळविण्यासाठी मिश्र पिठांचा उपयोग लाभदायक ठरतो. बाजरीच्या पिठाचे विविध पदार्थ सामुदायिक महाविद्यालय, परभणी येथे विकसित करण्यात आले  आहेत.
 • मक्यापासून व मक्यात इतर तृण धान्याचे पीठ मिसळून अनेक पदार्थ तयार करता येतात. यात भाकरी, पोळी तसेच पाव, केक, बिस्किटे इत्यादीपर्यंत समावेश होतो.
 • भरड धान्यातील पोषण मूल्ये 
  अन्नपदार्थ  ऊर्जा (किलो कॅलरी)   प्रथिने (ग्रॅम)  स्निग्ध पदार्थ (ग्रॅम)  कर्बोदके कॅल्शिअम (मि.ग्रॅम) लोह (मि. ग्रॅम) मॅग्नेशिअम (मि. ग्रॅम)    पोटॅशिअम (मि. ग्रॅम)  
  बाजरी   ३६१   ११.६   ५.०   ४२   ८.० १३७ ३०७
  ज्वारी  ३४९     १०.४     १.९     - २५     ४.१     १७१     १३१
  मका     ३४२     ११.१     ३.६     - १०     २.३     १३९     २८६
  नाचणी ३२८     ७.३ १.३     ७२.०     ३४४     ३.९     १३७     ४०८
  स्रोत :   Nutritive Value of Indian Foods, by National Institute of Nutrition, ICMR, Hydrerabad (२००४)

  संपर्क : डॉ. साधना उमरीकर, ९४२०५३००६७ डॉ. दीपाली कांबळे,९३०७१६३९३९ (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जि. जालना)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com