आरोग्यदायी गुलकंद

गुलकंद हा गुलाब फुलाच्या पाकळ्यापासून बनविलेला अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो. गुलकंदामध्ये जीवनसत्त्व सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते.
health Benefits of Gulkand
health Benefits of Gulkand

गुलकंद हा गुलाब फुलाच्या पाकळ्यापासून बनविलेला अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो.  गुलकंदामध्ये जीवनसत्त्व सी,  ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. गुलकंद निर्मिती  गुलाब पाकळ्या ः २०० ग्रॅम   साखर ः १०० ग्रॅम / खडीसाखर (चवीनुसार) छोटी वेलची ः १ चमचा  बडीशेप ः १ चमचा

 • गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल गुलाबांचा वापर करावा. जेणेकरून गुलकंदाला रंग आणि चांगला सुगंध येतो. गुलाबाची फुले घेऊन त्यांच्या निरोगी पाकळ्या वेगळ्या कराव्यात. गुलाबाच्या पाकळ्या धुवून काचेच्या भांड्यात ठेवाव्यात.
 • पाकळ्यांचे बारीक तुकडे करावे. एक काचेची बरणी घेऊन त्यामध्ये एक थर पाकळ्या व एक थर साखर/ खडीसाखर असे काचेच्या बरणीमध्ये भरावे. त्यानंतर इतर सर्व साहित्य यात मिसळून झाकण लावून ४ ते ५ दिवस उन्हात ठेवावी.  दररोज हे मिश्रण हलवत राहावे. उन्हामुळे साखरेचे पाणी होईल. त्या पाण्यात पाकळ्या चांगल्या मुरतात.
 • जेव्हा गुलाबाच्या पाकळ्या मऊ झाल्यात असे दिसते,तेव्हा गुलकंद २१ ते २५ दिवसांमध्ये खाण्यासाठी तयार झालेला असतो.
 •  गुलकंद तयार झाल्यावर कुठलाही सुकामेवा म्हणजेच बदाम, अक्रोड, काजू, शेंगदाणे यांचे तुकडे त्यामध्ये मिसळू शकता.
 • गुलकंद खाण्याचे फायदे

 • पित्त प्रकोप होत नाही. पोटातील उष्णता कमी करण्याचे काम गुलकंद करतो.
 • गुलकंदामुळे आतड्याचा अल्सर तसेच सूज यावर उपचार करून त्वरित आराम मिळतो.
 • गुलकंदामध्ये जीवनसत्त्व ब चे जास्तीत जास्त स्रोत आढळून येतात. वैज्ञानिकदृष्ट्या हे अल्सरवर सर्वात जास्त प्रभावी औषध मानले जाते. 
 • गुलकंदामुळे यकृताची ताकद वाढते. तसेच भूक आणि पचन सुधारण्यासही मदत होते.
 • पोटाचे विकार, समस्या कमी होतात.
 •  डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गुलकंद  लाभदायक आहे. आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत मिळते. 
 •  त्वचेसाठी उपयुक्त आहे. डाग दूर होण्यास मदत होते. चेहऱ्याची सूज आणि डोळे लाल होणे कमी होते. 
 • तोंड आल्यास गुलकंदाचे सेवन करावे. तसेच हिरड्या सुजल्यास  गुलकंदाचे सेवन फायदेशीर ठरते.
 • लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी गुलकंद फायदेशीर आहे. 
 • बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी मॅग्नेशियमसारख्या पोषक तत्त्वांची आवश्यकता असते जे गुलकंदमध्ये आहे. 
 • गुलकंदाच्या सेवनाने शरीर ताजेतवाने राहते. तसेच गारवा मिळतो. उन्हामुळे येणारा थकवा, आळस, शरीरातील जळजळ दूर होते. 
 • उन्हाळ्यात अनेकांच्या नाकातून रक्त येते. यातून वाचण्यासाठी उन्हात जाण्याआधी दोन चमचे गुलकंद खावा.  याच्या सेवनाने शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यामुळे होणारा त्रास दूर होतो.
 • गुलकंद सेवन केल्याने थकवा, सुस्तपणा, खाज तसेच अंगदुखी आणि ज्वलनामुळे होणाऱ्या आजारांमध्ये आराम पडतो. 
 • ज्यांना सतत विसरण्याची सवय असते.त्यांनी दररोज दुधासोबत एक चमचा गुलकंद खावा. यामुळे मेंदूचे कार्य जलद होते.
 • गुलकंदात असणारे अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म स्मरणशक्ती मजबूत बनवण्यात सकारात्मकतेने प्रभावी ठरतात. 
 • गुलकंदमिश्रित दुधाचे सेवन केल्याने ताणतणावाच्या समस्या दूर राहण्यास मदत होते. 
 • संपर्क ः नारायण जाधव,९५६१६५१५५१ (कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, गुंजाळवाडी पठार, संगमनेर,जि.नगर)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com