फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरण

पूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक काढल्यानंतर त्यातील उष्णता (फील्ड हीट) काढून टाकणे. त्याचबरोबर,पूर्व-शीतकरण विविध सूक्ष्मजिवांच्या वाढीस प्रतिबंध करते, ज्याजोगे काढणीनंतरच्या नाशवंत घटकांचा प्रभाव कमी होतो.
फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरण
Vehicles with cooling systems have been developed for transportation.

पूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक काढल्यानंतर त्यातील उष्णता (फील्ड हीट) काढून टाकणे. त्याचबरोबर,पूर्व-शीतकरण विविध सूक्ष्मजिवांच्या वाढीस प्रतिबंध करते, ज्याजोगे काढणीनंतरच्या नाशवंत घटकांचा प्रभाव कमी होतो. पूर्व-शीतकरण उत्पादनांच्या श्वसनाचा दर कमी करते आणि त्याचे साठवण आयुष्य वाढवते. ताजी, दर्जेदार फळे आणि भाज्या यांचा ग्राहकाला पुरवठा करण्यासाठी काढणीनंतरचे व्यवस्थापन महत्वाचे आहे. काढणीनंतर पूर्व-शीतकरण (प्री-कुलिंग) ही महत्वाची प्रक्रिया आहे.  काढणी केलेल्या पिकांचे तापमान आणि थंड साठवण यात बराच फरक आहे. त्यामुळे पूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक काढल्यानंतर त्यातील उष्णता (फील्ड हीट) काढून टाकणे. त्याचबरोबर,पूर्व-शीतकरण विविध सूक्ष्मजिवांच्या वाढीस प्रतिबंध करते, ज्याजोगे काढणीनंतरच्या नाशवंत घटकांचा प्रभाव कमी होतो. पूर्व-शीतकरण उत्पादनांच्या श्वसनाचा दर कमी करते आणि त्याचे साठवण आयुष्य वाढवते. 

 • फळे व भाज्या नाशवंत असल्यामुळे त्या काढणीनंतर ताबडतोब ग्राहकापर्यंत पोहचवणे आवश्यक असते,अन्यथा त्या खराब होण्यास सुरुवात होते. परंतु प्रत्यक्षरित्या फळे व भाज्या ताबडतोब ग्राहकापर्यंत पोहचवणे शक्य नसते. म्हणून उत्पादनाची साठवण क्षमता अधिक असणे आवश्यक आहे. 
 • फळे, भाज्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी, कापणीपश्चात शक्य तितक्या लवकर प्री-कुलिंगची प्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते. काढणीनंतर पिकातील उष्णता शक्य तितक्या वेगाने काढून टाकली पाहिजे, कारण बहुतेक उत्पादनासाठी सुमारे ३५ अंश सेल्सिअस तापमानाच्या परिस्थितीत एका तासाच्या विलंबामुळे जवळपास एका दिवसाच्या साठवण कालावधीचे नुकसान होते. 
 • पूर्व-शीतकरणाची गरज 

 • भारतीय फलोत्पादन मंडळाच्या मार्गदर्शनानुसार विशेषतः द्राक्षे, बेरी, खरबूज, चिकू, भेंडी, टोमॅटो, शिमला मिरची, वांगे, काकडी, मटार, पालक, आंबा,पपई,पेरू, कच्ची केळी, डाळिंब, मुळा, कोबी, फ्लॉवर, गाजर या उत्पादनांचे पूर्व-शीतकरण  करावे.
 • पूर्व-शीतकरण पद्धतीची निवड प्रामुख्याने प्रत्येक पीक प्रकारच्या आवश्यकतेनुसार करावी. आर्थिक स्थिती, आवश्यक कामगार, उपलब्ध उपकरणे, आणि साहित्यावर ही प्रक्रिया अवलंबून असते.
 • पूर्व शीतकरणाच्या पद्धती  रूम कुलिंग 

 • ही एक अत्यंत साधी व सोपी पद्धत आहे, ज्यामध्ये फळे व भाज्या रेफ्रिजरेटेड खोलीत किंवा कंटेनरमध्ये ठेवली जातात. 
 • इतर पद्धतींच्या तुलनेने यास कमी ऊर्जा लागते. तसेच उष्णता काढून टाकण्याचा दर (प्री-कुलिंग) कमी असल्यामुळे,कमी नाशवंत असणाऱ्या फळे व भाज्यांसाठी याची शिफारस केली आहे.
 • फोर्सड् एअर कुलिंग  स्टोरेज चेंबरमध्ये थंड हवेचा वेगाने प्रसार करून उष्णता (फील्ड हीट) काढून टाकली जाते.  हायड्रो कुलिंग  ही एक अत्यंत प्रभावी पूर्व शीतकरण पद्धत आहे. या पद्धतीमध्ये फळे व भाज्यांवर थंड पाण्याने फवारणी केली जाते किंवा ती थंड पाण्यात बुडवली जातात. याचा फायदा म्हणजे पाण्याच्या वापरामुळे फळे व भाज्या स्वच्छ होतात.  व्हॅक्यूम कुलिंग  या पद्धतीत फळे व भाज्या एका एअर टाईट चेंबरमध्ये ठेवतात. अशा प्रकारे हवेचा दबाव कमी होतो. पिकांच्या ओलाव्याचे काही प्रमाणात बाष्पीभवन होते. पाण्याचे बाष्पीभवन करण्यासाठी जास्त प्रमाणात उष्णता आवश्यक असल्याने ही पद्धत पूर्व शीतकरणाचा सर्वात जलद मार्ग आहे. पालेभाज्यांसाठी ही अत्यंत प्रभावी पद्धत आहे.   आइस कुलिंग 

 • या पद्धतीत स्टोरेज कंटेनर किंवा बॉक्समध्ये बर्फ घालून ठेवला जातो. बर्फ वितळत असताना, थंड पाण्यामुळे उत्पादनाची उष्णता कमी होते. 
 • ही पद्धत प्रामुख्याने उत्पादन वाहतुकीदरम्यान वापरली जाते. 
 • पूर्व शीतकरणाचे फायदे 

 • इष्टतम साठवण तापमान लवकर होत असल्यामुळे शीतगृहात साठवण करणे सोपे जाते.  
 • उत्पादनाची श्वसन क्रिया मर्यादित केली जाते.  त्याद्वारे उत्पादनाच्या वजनाचे संरक्षण होते. उत्पादनाची गुणवत्ता टिकवली जाते. 
 • सूक्ष्म जंतूच्या वाढीस प्रतिबंध करता येतो. 
 • कमी वेळेत होणारी प्रक्रिया उत्पादकास मूल्यवर्धन मिळवून देण्यास उपयुक्त ठरते.    
 • संपर्क : स्नेहा सरवदे,९४२३३४४७७२, (अन्न आणि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.