
सोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि टोफूसारखे सोया आधारित पदार्थ तयार केले जातात. मांस आणि दुग्धजन्य पदार्थाला पर्याय म्हणून सोयाबीनचे सेवन केले जाते. सोयाबीनपासून तेलही तयार केले जाते. सोयाबीनला प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन मांसाइतकेच पोषण पुरवते. त्यामुळे शाकाहारी लोकांनी आहारात सोयाबीनचा समावेश करणे अतिशय चांगले आहे. यामध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. जे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास, वजन कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. सोयाबीन झोपेचे विकार आणि पचन सुधारते. सोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि टोफूसारखे सोया आधारित पदार्थ तयार केले जातात. मांस आणि दुग्धजन्य पदार्थाला पर्याय म्हणून सोयाबीनचे सेवन केले जाते. सोयाबीनपासून तेलही तयार केले जाते. आरोग्यदायी फायदे
विविध प्रक्रियायुक्त पदार्थ सोया दूध सोयाबीन रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. भिजल्यानंतर त्यावरील आवरण काढून घ्यावे. आवरण काढलेले सोयाबीन मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. बारीक केलेले मिश्रण स्वच्छ कापडामधून गाळून घ्यावे. तयार सोयाबीन दूध मंद आचेवर २० मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. सतत ढवळत राहावे. गरम सोयाबीन दूध थंड करून खाण्यासाठी वापरावे. पीठ सोयाबीन स्वच्छ करून चांगले धुऊन घ्यावे. धुतलेले सोयाबीन पाण्यात १२ तास भिजण्यास ठेवावे. चांगले भिजल्यानंतर मंद आचेवर २ मिनिटे उकळून घ्यावे. उकळल्यावर थंड पाण्यात टाकून त्याची साल काढावी. साल काढलेले सोयाबीन रात्रभर कोरडे होण्यास ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवशी कोरडे झालेले सोयाबीन कडक होईपर्यंत भाजून घ्यावे. थोडे थंड झाल्यानंतर त्याचे बारीक पीठ करून घ्यावे. सोया पनीर सोयाबीन दूध मंद आचेवर चांगले उकळून घ्यावे. दूध चांगले उकळल्यानंतर ते फोडण्यासाठी लिंबू किंवा दह्याचे विरजण टाकून चांगले मिसळून घ्यावे. मिश्रण जास्त ढवळू नये. तयार मिश्रण २०-२५ मिनिटे घट्ट होण्यासाठी ठेवून द्यावे. घट्ट झालेले मिश्रण स्वच्छ कापडामध्ये टाकून जास्त दाब न देता पिळून घ्यावे. पिळल्यानंतर २-३ तास टांगून ठेवावे. त्यानंतर कापडामधून सोया पनीर बाजूला काढून काप करावेत. या प्रक्रियेदरम्यान त्यावर जास्त दाब पडू देऊ नये. दाब पडल्यास पनीरमध्ये पाण्याचे प्रमाण फार कमी होते व खाण्यास मऊ लागत नाही. प्रक्रिया करूनच वापरा सोयाबीन
संपर्क ः अमरसिंह सोळंके, ९९२१०९२२२२ (आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.