
पपई ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून जाम, जेली, केक, टुटी-फ्रुटी, सरबत, मार्मालेड, पेपेन बनवता येतात. हे मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याची माहिती या लेखातून घेऊ. महाराष्ट्रासह, तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, बिहार, व मध्य प्रदेश या राज्यामध्ये पपईची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. पपई या पिकातून कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते. पपई ही लंबगोल आकारांची वरून हिरवी व आतून पिवळसर रंगाची असते. पिकतेवेळी ती पिवळसर केशरी रंगाची होते. पोषक घटकांचे प्रमाण (प्रति १०० ग्रॅम) कॅलरी - ४२.८ किलोकॅलरी. पाणी - ८८ ग्रॅम लिपीड- ०.३९ चरबी- ०.१९ कर्बोदके - ११ ग्रॅम साखर- ८ ग्रॅम जीवनसत्वे ‘अ’ - १९ टक्के बी१.थायमिन-०.०२३ मिलिग्रॅम बी२. रिबोफ्लेविन- ०.०२७ मिलिग्रॅम बी३. निॲसिन - ०.३५७ मिलिग्रॅम सी- ६२ मिलिग्रॅम, ई - ०.३ मिलिग्रॅम खनिजे कॅल्शिअम - २० मिलिग्रॅम लोह - ०.२५ ग्रॅम मॅग्नेशिअम- २१ मिलिग्रॅम फाॅस्फरस - १० मिलिग्रॅम. पोटॅशिअम- १८२ मिलिग्रॅम सोडिअम - ८ मिलिग्रॅम. मूल्यवर्धित पदार्थ पपई जॅम पपईची पक्व फळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. चाकूने कापून बी वेगळे काढून, त्यातील गर वेगळे करून घ्यावा. प्रति किलो पपई गरासाठी ७५० ग्रॅम साखर मिसळावी. त्यामध्ये ५ ते ८ ग्रॅम सायट्रिक ॲसिड घालून हे मिश्रण मंद आचेवर गरम करावे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्याचा टी.एस.एस व तापमान मोजावे. त्याचा टी.एस.एस (ब्रिक्स) ६८ टक्के व तापमान १०२ अंश सेल्सिअस आल्यानंतर गॅस बंद करावा. तयार झालेला जॅम हा निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये गरमगरम भरावा. तयार झालेला जॅम हा थंड व कोरड्या ठिकाणी साठवावा. पपई टुटीफ्रुटी
पपई सरबत
पपई मार्मालेड
पपई केक
पेपेन
पेपेनचा उपयोग १. पेपेन हे प्रथिने पचविणारे व प्रथिनांचे साध्य रसायनात रूपांतर करणारे विकर (एन्झाइम) आहे. मांस कारखान्यांमध्ये कातडी कमविण्यासाठी, मटण मृदू करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पेपेनमुळे कातडीचा भाग मऊ होऊन कातडीस चमक येते. मटण लवकर शिजविण्यासाठी पेपेनची पावडर टाकली जाते. यामुळे मटण पचण्यास हलके होते. २. बिस्कीट मऊ होण्यासाठी बेकरीमध्ये पेपेनचा वापर करतात. ३. जनावरांच्या खाद्यांमध्ये पेपेन मिसळल्यानंतर ते खाद्य लवकर पचते. सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (पीएच.डी. स्कॉलर, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, सैम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.