Cotton Crop : दफ्तरी ॲग्रोद्वारे कपाशी पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम

दफ्तरी ॲग्रो प्रा.लि. सेलूद्वारे संशोधित कपाशीच्या पुष्पा २२४४ BG-II आणि रॉकी ३४३४ BG-II या वाणांचा पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम शुक्रवारी (ता.७) पार पडला.
Cotton Crop
Cotton CropAgrowon

परभणी ः दफ्तरी ॲग्रो प्रा.लि. सेलूद्वारे संशोधित कपाशीच्या पुष्पा २२४४ BG-II (Pushpa 2244 BG-II) आणि रॉकी ३४३४ BG-II (Rocky 3434 BG-II) या वाणांचा पीक (Crop Varients) प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम शुक्रवारी (ता.७) पार पडला. या कार्यक्रमासाठी भारतीय कापूस मूल्यदर निर्धारण समितीचे सदस्य व प्रगतिशील शेतकरी प्रशांत इंगळे तिगावकर (Prashant Ingle Tigavkar) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Cotton Crop
Crop Damage : नुकसानग्रस्तांना पुरेशी मदत मिळालेली नाही : भुजबळ

धानोली मेघे (ता. सेलू) येथील गोपालदासजी लोहिया यांच्या शेतात पुष्पा २२४४ BG-II आणि रॉकी ३४३४ BG-II या वाणाचा संतोष कोटंबकर यांच्या शेतात पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी श्री. इंगळे तिगावकर म्हणाले, की हे वाण मोठ्या बोंडाचे असून बोंडातून कापूस लवकर वेचला जात आहे. बोंडसड, अळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. अधिक उत्पादन मिळण्याची क्षमता असल्याचे माझ्या निरीक्षणानुसार दिसून आले.’’

कापूस पिकातील तज्ज्ञ अमृतरावजी देशमुख म्हणाले, की योग्य नियोजन केल्यास कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसत नाही.

वाणांची वैशिष्ट्ये ः

- तळापासून शेंड्यापर्यंत एकसमान मोठे टपोरे ४ ते ५ कळ्यांचे बोंड.

- रसशोषक किडीस सहनशील, जास्त बोंड लागण्याची क्षमता.

- वेचणीस सोपा, लांब धाग्याचे कापूस उत्पादन.

BG-II कपाशीला ३ ते ४ वर्षांपूर्वी शासकीय राज्यस्तरीय समन्वयक चाचणी समितीद्वारे बीटी जीनची मान्यता मिळाल्यानंतर विकसित करण्यात आले. पीक प्रात्यक्षिकांमध्ये वाणांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. पुढील वर्षी दोन्ही वाण बाजारात उपलब्ध होतील.

- शैलेंद्र दफ्तरी, (संचालक, दफ्तरी ॲग्रो)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com