प्रयत्नपूर्वक उंचावला आलेख दुग्धप्रक्रिया उद्योगाचा

परभणी येथील पंकज रुद्रवार या अभियंता तरुणाने पुणे येथील नोकरी सोडून आपल्या शहराच्या ठिकाणी दुग्धप्रक्रिया उद्योग सुरू केला.
Milk Process
Milk ProcessAgrowon

परभणी येथील पंकज रुद्रवार या अभियंता तरुणाने पुणे येथील नोकरी सोडून आपल्या शहराच्या ठिकाणी दुग्धप्रक्रिया उद्योग सुरू केला. मेहुण्यांची मदत, दुग्ध उत्पादकांचे ‘नेटवर्क’, मेहनत,
गुणवत्तेशी प्रामाणिकपणा, स्वतःची विक्री व्यवस्था उभारणे आदींची जोड देत तीन वर्षांमध्ये पाहता पाहता वयाच्या तिशीत उद्योगाची उलाढाल ८० लाखांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.


पंकज गणेश रुद्रवार (Pankaj Ganesh Rudrawar) हा वयाच्या तिशीतील अभियंता (बीई सिव्हिल) युवक आहे. त्यांचे मूळगाव जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली) आहे. वडील गणेशराव रुद्रवार यांचा बोअरवेलशी संबंधित व्यवसाय (Business) असल्याने १९९८ मध्ये हे कुटुंब परभणी येथे स्थायिक झाले. त्यांची जवळा बाजार येथे अकरा एकर शेती होती. पंकज यांनी शिक्षणानंतर पुणे (Pune) गाठले. तेथे कंपनीमध्ये एक वर्ष नोकरी केली. परंतु गावच्या शेतीतच काहीतरी घडविण्याच्या दृष्टीने नोकरी (Job) सोडून ते या शेतीत रमले. सन २०१७ पासून नैसर्गिक पद्धतीने उत्पादन घेऊ लागले. दरवर्षी तीन ते चार एकर हळद असे. केवळ उत्पादनावर (Production) न थांबता प्रक्रिया करावी असे पंकज यांना वाटू लागले. प्रक्रिया उद्योजक होण्याची इच्छा तेथेच दृढ झाली. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या हळदीचे एकरी २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळे. त्यापैकी सुमारे १५ क्विंटल हळदीची पावडर तयार करून विक्री सुरू केली. घरगुती पद्धतीचे खास चव असलेले त्याचे लोणचे तयार करून विक्री सुरू केली. कृषी (Agriculture) प्रदर्शने, सेंद्रिय (Organic) धान्य महोत्सव तसेच घरपोच अशी बाजारपेठ (Market) त्यास मिळू लागली. हळदीतील कुरकुमीन घटकावर आधारित उद्योग उभारणीचा विचार होता. त्यासाठी हैदराबाद येथे दौरा केला.

Milk Process
कृषी सहायक पदभरतीत उत्तरपत्रिका ठेवल्या कोऱ्या

दुग्धप्रक्रिया उद्योगात प्रवेश (Entering the dairy processing industry)

दरम्यानच्या जवळा बाजार येथील यशस्वी दुग्ध प्रक्रिया (Dairy Process) उद्योजक भगवान सावंत यांच्याकडून
या उद्योगातील संधी, अनुभव अभ्यासता आले. त्यातून प्रेरणा घेत पंकज यांनी परभणी शहरात उद्योग सुरू करण्याचे निश्‍चित केले. सन २०१९ मध्ये सुरुवातीचे काही महिने सावंत यांच्याकडून पनीर, दही, खवा ही उत्पादने (Production) खरेदी करून परभणी शहरात विक्री सुरू केली. त्यामुळे ‘मार्केट’मध्ये ओळखी वाढल्या. ग्राहकांचा जाळे तयार झाले. परिसरातील यशस्वी उद्योजकांचे अनुभवही गाठीशी बांधले.
पंकज आणि त्यांचे मेहुणे श्रीनिवास बंडेवार यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये भांडवली गुंतवणूक केली. सन २०१९ च्या सप्टेंबरमध्ये परभणी शहरातील भाग्यनगर येथे दोन गाळे भाडेतत्त्वावर घेतले.
एके ठिकाणी ‘मिल्क टेस्टिंग’, बल्क कुलर, खवानिर्मिती, (‘Milk testing’, bulk cooler, food production) पनीर मोल्ड, वजन काटे, दूध साठवणुकीसाठी कॅन आदी यंत्रसामग्री खरेदी केली. रिशा डेअरी प्रॉडक्ट्स या नावाने दूध संकलन आणि प्रक्रिया निर्मिती आणि विक्रीस सुरुवात केली.

दूध संकलनातच वाढ (Increase in milk collection)

परभणी तालुक्यातील गावांमधील दुग्धोत्पादकांकडून (Dairy producers) आज फॅटनुसार दुधाची खरेदी होते. साधारण म्हशीच्या दुधाला (buffalo milk) प्रति लिटर ५० रुपये, तर गायीच्या दुधाला प्रति लिटर ३० रुपये दर देण्यात येतो.
सुरुवातीला दररोज १०० ते १५० लिटर दूध खरेदी व्हायची. त्यापासून विविध पदार्थ तयार केले जायचे. दर्जेदार उत्पादने (Quality products) ग्राहकांच्या पसंतीस पडू लागली. मग टप्प्याटप्प्याने दूध खरेदी वाढ केली. आता दररोज ५०० ते ६०० लिटर दूध खरेदी होते.

विविध उत्पादनांना मागणी (Demand for various products)

-आधुनिक संयंत्रावर दररोज १०० लिटर दुधापासून (Milk) २० किलो खवा तयार केला जातो. किरकोळ विक्री २८० रुपये प्रति किलो दराने होते. जिंतूर, पूर्णा, नायगाव, नांदेड या शहरांत त्यास मागणी.
-दर आठ दिवसांतून ५० किलो तूपनिर्मिती. गायीच्या (Cow) तुपाची विक्री प्रति किलो ६०० रुपये, तर
म्हशीच्या तुपाची ७०० रुपये दराने. ५०० व २०० ग्रॅम वजनात पॅकिंग.
-दररोज ४०० लिटर दुधावर प्रक्रिया करून ‘मोल्ड’द्वारे एक क्विंटल पनीर तयार केले जाते.
३५० रुपये प्रति किलो दराने विक्री.
-खव्यापासून दररोज ७ ते ८ किलो पेढे तयार होतात. खव्यात विशिष्ट प्रमाणात साखर, वेलची यांचा वापर करून ‘क्यूब्स’ तयार केले जातात. गोल आकाराचे पेढे करण्यापेक्षा कमी वेळेत हे काम होते. ३२० रुपये प्रति किलो दराने विक्री. खास चवींच्या या पेढ्यांना ग्राहकांकडून कायम मागणी.
-दही, लस्सी, ताक, बासुंदी (Yogurt, lassi, buttermilk, basundi) आदी पदार्थ तसेच दररोज म्हशीच्या दुधाची १० ते १२ लिटर, तर गायीच्या दुधाची १० ते १५ लिटर विक्री.

उलाढालीचा आलेख उंचावला (Turns up the turnover graph)

दररोज सुमारे १५ हजार ते २० हजार रुपयांचे दूध (Milk) विकत घेण्यात येते. दूध संकलन ते विपणन, विक्रीपर्यंत पंकज यांना मेहुणे श्रीनिवास आणि प्रवीण यांची समर्थ साथ मिळते. वडिलांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरते. सकाळी सात ते रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत कामकाज व विक्री केंद्र सुरू असते. अखंड मेहनत, पदार्थांची विविधता, शक्यतो कधी सुट्टी न घेणे, सातत्य, पदार्थांची गुणवत्ता जपणे, भेसळीला वाव न देणे आदी प्रयत्नांमधून प्रगतीला संधी मिळाली. त्यातून सुरुवातीला असलेली २० ते २५ लाख रुपयांची वार्षिक (Yearly) उलाढाल मध्यंतरी ४५ ते ६० लाखांपर्यंत व आज ७० ते ८० लाख रुपयांवर पोहोचली आहे.

उद्योगाचा होणार विस्तार (industry will expand)

दरम्यानच्या काळात रुद्रवार यांनी जवळा बाजार येथील शेती (Farm) विकून परभणीपासून
नजीक गावच्या शिवारात पाच एकर जमीन खरेदी केली. आहे. दोन हजार चौरस फूट जागेत शेड उभारले आहे. दूध प्रक्रिया (Milk Process) उद्योगाची क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री, पॅकिंग युनिट व अन्य जिल्ह्यांत विक्रीसाखळी तयार केली जाणार आहे. उत्पादने ब्रॅण्ड नोंदणी प्रक्रियाही सुरू केली आहे.

संपर्क ः पंकज रुद्रवार, ९०२८३९५९६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com