Sweet Corn : स्वीटकॉर्न सह प्रक्रियायुक्त मालाची सहा देशांना निर्यात

पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनपासून नजीक भवरापूर येथील सुभाष साठे यांनी मुले गौरव व तेजस यांच्या मदतीने ‘स्वीट कॉर्न’ व अन्य शेतमाल प्रक्रिया प्रकल्प आकारास आणला आहे.
Sweet Corn
Sweet CornAgrowon

संदीप नवले

पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनपासून (Urali Kanchan Pune) नजीक भवरापूर येथील सुभाष साठे (Subash Sathe) यांनी मुले गौरव व तेजस यांच्या मदतीने ‘स्वीट कॉर्न’ व अन्य शेतमाल प्रक्रिया प्रकल्प (Sweet Corn Project) आकारास आणला आहे. गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम उत्पादनाच्या निर्मितीतून सहा देशांना निर्यात यशस्वी करून वर्षाला १४ कोटींची उलाढाल करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.

पुणे शहरापासून काही किलोमीटरवर उरुळी कांचन हे प्रसिद्ध गाव आहे. येथून जवळचभवरापूर गाव आहे. येथील सुभाष साठे यांची वडिलोपार्जित १० ते १२ एकर शेती आहे. उत्पन्नस्रोत वाढवण्यासाठी त्यांनी जवळच असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यात जवळपास १५ वर्षे नोकरी केली. ती सुरू असतानाच त्यांची गावी सरपंच म्हणून निवड झाली.

‘ॲग्रोवन सरपंच महापरिषदे’ची प्रेरणा

सन २०१२ मध्ये साठे यांची ॲग्रोवन सरंपच महापरिषदेसाठी निवड झाली. नाशिक येथे भरविलेल्या या महापरिषदेत त्यांना तज्ज्ञांकडून शेतमाल प्रक्रियेचे मार्गदर्शन झाले. त्यातून प्रेरणा घेत तालुक्यातील

शेतीमाल प्रक्रिया, बाजारपेठांतील संधी यांचा अभ्यास केला. त्यातून मधुमका (स्वीटकॉर्न) हे पीक त्यांना आश्‍वासक वाटले. त्यानंतर कच्चा माल पुरेसा व वर्षभर मिळण्याच्या दृष्टीने मका उत्पादकांचे नेटवर्क उभारण्यास सुरुवात केली. तीन कोटींचे कर्ज घेऊन २०१५-१६ च्या दरम्यान एस.एस. ॲग्रो फूड्स नावाने कंपनी स्थापन केली.

Sweet Corn
Banana Crop Management : शेतकरी नियोजन पीक : केळी

हमीभाव निश्‍चित केला

साठे यांनी मक्यासाठी आठ रुपये प्रति किलो दर निश्‍चित केला आहे. मात्र बाजारपेठेत जो चालू दरअसेल त्यानुसार शेतकऱ्यांकडून खरेदी होते. सात वर्षांत राज्यभरातील दोन हजारांहून अधिक मका उत्पादक कंपनीचे पुरवठादार झाले आहेत. बियाणे महाग असल्याने ज्यांची आर्थिक अडचण असेल त्यांना उधारी तत्त्वावर ते देऊन पीक व्यवस्थापनाबाबतही मार्गदर्शन केले जाते. कंपनीमध्ये मका पोहोच झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रक्कम खात्यावर वर्ग होते.

Sweet Corn
Tur Crop Management : तुर उत्पादन वाढीसाठी याकडेही लक्ष द्या

...असा आहे प्रकिया उद्योग

कंपनीत सुमारे १४ ते १५ शेतीमालांवर प्रक्रिया होते. मात्र यातील ९० टक्के हिस्सा केवळ ‘स्वीटकॉर्न’चा आहे. उर्वरित मालात भेंडी, मेथी, पालक, गाजर, घेवडा, फ्लॉवर, आले, लसूण, वाटाणा,

तर फळांमध्ये आंबा, सीताफळ, पेरू, जांभूळ आदींचा समावेश आहे. मका दाण्यांव्यतिरिक्त शेतीमालनिहाय पेस्ट व क्यूब्ज, फ्रोझन, पल्प आदी उत्पादने तयार केली जातात. मक्याबाबत बोलायचे तर प्रथम ग्रेडिंग होते. महिला कामगारांकडून कणीस सोलून दाणे काढण्यात येतात. ब्लांचर, बॉयलर, कॉम्प्रेसर, कुकर आदी दहा प्रकारची यंत्रे आहेत. त्याद्वारे प्रक्रिया होते. विविध आकारांतमागणीनुसार २०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत पॅकिंग केले जाते.

परदेशात निर्यात

सुरुवातीला बंगळूर, दिल्ली आदी ठिकाणी उत्पादने पाठवली जायची. होते. मात्र परदेशातील मागणी व संधी लक्षात घेऊन त्यावरच लक्ष केंद्रित केले. साठे यांचा मोठा मुलगा गौरवने ‘एमबीए’

केले आहे. त्यानेच परदेशातील मार्केटिंगची जबाबदारी सांभाळली आहे. तो म्हणाला, की सुरवातीला निर्यातदारांमार्फत आमची उत्पादने परदेशात जायची. त्यामुळे आमच्या गुणवत्तेबाबत आत्मविश्‍वास आला. मग आपल्या उत्पादनांची निर्यात आपणच का करू नये असा विचार मनात आला. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. ‘बीटू बी’, अपेडा, राजदूतावास यांच्यासोबत संपर्क वाढवले. एकेका दिवशी

असंख्य ई-मेल्स पाठवून माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. त्यातून परदेशातील खरेदीदार मिळू लागले. आज या प्रयत्नांतून सौदी अरेबिया, दुबई, रशिया, साऊथ आफ्रिका, इंडोनेशिया, कॅनडा अशा सहा देशांमध्ये माल निर्यात होत आहे. साठे यांचा दुसरा मुलगा तेजस ‘अकाउंट’ विभागाची जबाबदारी सांभाळतो. कंपनीच्या माध्यमातून परिसरासह १५० लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यातून या लोकांना कुटुंबाला चांगलाच हातभार लागला आहे.

यशस्वी उलाढाल

कंपनीत दर महिन्याला सुमारे २०० ते ३०० टन एवढ्या प्रमाणात प्रक्रिया होते. मक्याच्या प्रति किलो टनापासून ४५० किलो दाणे निघतात. एकूण प्रक्रियेसाठी प्रति किलो ४५ रुपये खर्च येतो. कंपनी बाजारात या उत्पादनाची प्रति किलो ४८ रुपये दराने विक्री करते. विजेचे बिल, मजूर, बॅकेहप्ता, कंपनीची देखभाल मेन्टेनन्स असा महिन्याला किमान चार लाखांपर्यंत खर्च होतो. वर्षाला १४ कोटी रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत कंपनीने मजल मारली आहे. यंदा ती १५ कोटींपर्यंत अपेक्षित आहे.

कोरोन काळात आर्थिक फटका बसला. मात्र त्यातून सावरून आता मोठ्या उत्साहाने वाटचाल सुरू आहे. आज सहा कोटींपर्यंत कंपनीची गुंतवणूक पोहोचली आहे.

मक्याच्या पाल्याचा उपयोग

कंपनीमध्ये दररोज सुमारे वीस टन मका येतो. त्यातून दोन ते तीन टन पाला उपलब्ध होतो. परिसरातील

शेतकरी तो जनावरांसाठी अल्प दरात घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्‍न बऱ्यापैकी सुटला आहे.

सुभाष साठे, ९८२३९३३३१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com