शेतकऱ्यांना मिळाली पारादीप फॉस्फेट्‍स, झुआरी ‘फार्म हब’ची साथ

या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन भारतातील एक अग्रगण्य कृषी निविष्ठा (Agricultural inputs) पुरवणारा समूह आहे. कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शिक्षित व प्रशिक्षित करण्यात येत आहे.
Zuari Farm Hub
Zuari Farm HubAgrowon

पारादीप फॉस्फेट्‍स लि. आणि झुआरी फार्म हब लि. या कंपन्या शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शिक्षित करत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (Farmer Producer Organisation) सहकार्याने पीक आधारित सल्ला, तांत्रिक प्रशिक्षण तसेच कृषी निविष्ठा पुरवठ्यासाठी दोन्ही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.

पारादीप फॉस्फेट्‍स लि. आणि झुआरी फार्म हब लि. या ॲडव्हांटेज ग्रुप कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्या कृषी क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्याचा फायदा घेऊन शेतीतील प्रत्येक टप्प्यातील परिवर्तनामध्ये सहभागी होऊन चालना देण्याचे काम करत आहेत. या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन भारतातील एक अग्रगण्य कृषी निविष्ठा (Agricultural inputs) पुरवणारा समूह आहे. कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शिक्षित व प्रशिक्षित करण्यात येत आहे.

पारादीप फॉस्फेट्‍स लिमिटेडः

पीपीएल ही भारतातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य फॉस्फॅटिक कंपनी आहे. ही कंपनी पारादीप (ओडिशा) आणि झुआरीनगर (गोवा) येथे विविध खतांचे उत्पादन करते. कंपनी प्रामुख्याने डीएपी आणि संयुक्त खते ज्यामध्ये १४ः२८ः०, २४ः२४ः०, २८ः२८ः०, २०ः२०ः०ः१३, १०ः२६ः२६ः, १२ः३२ः१६, १४ः२८ः१४, १९ः१९ः१९ याबरोबरच जयकिसान युरियाचे उत्पादन करते. कंपनी गेल्या पन्नास वर्षांपासून जयकिसान आणि नवरत्ना या ‘ब्रँड'ने देशातील १६ राज्यांमध्ये काम करत आहे. अंदाजित ८१ लाख शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादने व तांत्रिक मार्गदर्शन पुरवत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

‘पारादीप फॉस्फेट्‍स लि. स्वदेशी फॉस्फेटिक (स्फुरदयुक्त) खते बनवून आत्मनिर्भर भारत अभियानात सक्रिय सहभाग घेत आहे. ‘सर्वप्रथम शेतकरी’ या तत्त्वानुसार काम करताना मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’

- सुरेश कृष्णन, एम.डी. आणि सीईओ

‘‘संतुलित पीक पोषण व माती आरोग्यासाठी आवश्यक विस्तृत संयुक्त खतांची श्रेणी पारादीप फॉस्फेट्‍स लि. पुरविते. त्याचबरोबर शाश्वत शेती आणि गुणवत्तापूर्ण उत्पन्नाकरिता सुधारित पोषक द्रव्यांचा संतुलित वापर करण्याकरिता शेतकऱ्यांच्यामध्ये जागरूकता करत असतो.

हर्षदीप सिंग, सीसीओ, पीपीएल

झुआरी फार्म हब लिमिटेड

वाढत्या कृषी गरजांशी देशाने आतापर्यंत जुळवून घेतले आहे. गेल्या काही वर्षांपासून नवीन तंत्राने शेती, अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर वाढत आहे. शेती विकासाच्या प्रक्रियेमध्ये अग्रेसर असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे ही काळाची गरज आहे.

याच पार्श्‍वभूमीवर, झुआरी फार्महब लि. ही कंपनी एकाच छताखाली सेवा व उत्पादने उपलब्ध करून देण्याकरिता स्वतंत्रपणे कार्यरत आहे. प्रगतिशील शेतकरी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी झुआरी फार्महब लि. हा ॲडव्हांटे‍ज ग्रुपचा एक प्रयत्न आहे. पिकांच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आवश्यक असणारी उत्पादने जयकिसान फार्महबतर्फे पुरविली जातात.जयकिसान फार्महब अंतर्गत मुख्यतः चार विभागाद्वारे सेवा पुरविल्या जातात.

१) जयकिसान जंक्शनः

- सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा व गोवा या राज्यांमध्ये ४५० सेवा केंद्रांद्वारे एका छताखाली निविष्ठा व सेवा पुरविल्या जातात.

२) जयकिसान स्पेशालिटी व जयकिसान क्रॉप केअरः

- यामध्ये विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, भू-सुधारके व संप्रेरके, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके यांचा समावेश होतो.

- जयकिसान ऑरगॅनिक्स अंतर्गत विविध सेंद्रिय उत्पादने पुरवठा होतो.

३) सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रित खतेः

- जमिनीचा प्रकार व पिकाची गरज यानुसार आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रित खते उत्पादनांचा पुरवठा करण्याची योजना आहे.

४) इतर सेवाः

- यामध्ये ६ कृषी विकास प्रयोगशाळा बारामती, सोलापूर, बंगळूर, हसन, तिरुपती आणि भुवनेश्‍वर येथे कार्यरत आहेत.

‘‘झुआरी फार्महब ही शेतकरी आणि व्यावसायिक भागीदारांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा देण्यासाठी तत्पर आहे. यासाठी आवश्यक आधुनिक तंत्रे व नवनवीन उत्पादने यामध्ये कंपनी काम करीत राहील.’’

मदन पांडे, एम.डी. झुआरी फार्महब लि.

संतुलित खत वापर हा पीपीएल आणि झुआरी फार्महबचा मुख्य उद्देशः

मागील पाच दशकांपासून आम्ही देशभरात शेतकरी चर्चासत्रे, पीक परिसंवाद, माती परिक्षण, प्रात्यक्षिके, पीक पाहणी कार्यक्रमाद्वारे माहिती प्रसाराचे कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे. हे कार्यक्रम केवळ उत्पादनांची माहिती देण्यापर्यंत मर्यादित नसून जमिनीची सुपीकता, तंत्रज्ञानाचा प्रसार यातून उत्पन्न वाढीसाठी उपयुक्त ठरतात.यामध्ये नेहमीच आमचे विक्रेते व उपविक्रेते यांचा सहभाग आहे. गरजेनुसार शेतकऱ्यांना निविष्ठांची उपलब्धता दिली जाते. याबरोबरच आम्ही महिला शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी तसेच निवृत्त लष्करी जवानांच्या शेतीमधील सहभागाकरिता कटिबद्ध आहोत.

पीपीएल आणि झुआरी फार्महब ‘एफपीसी’ योजनाः

आम्ही सुरवातीपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि सेवा पुरवीत आहोत. शेतकऱ्यांनी नेहमीच ‘जयकिसान’वर विश्‍वास दाखविला आहे. ‘एफपीसी’ हा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन तयार झालेली कंपनी असून महाराष्ट्रात ही चळवळ वेगाने वाढत आहे. या चळवळीला आणखी समृद्ध करण्यासाठी आम्ही पीक आधारित सल्ला, तांत्रिक प्रशिक्षण तसेच कृषी निविष्ठा पुरवठ्यासाठी नजीकच्या जयकिसान जंक्शनशी एफपीसीला जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. ‘ॲग्रोवन’ने शेतकरी समृद्ध करण्यासाठी एफपीसी व कार्पोरेट क्षेत्राला एकत्र आणण्याचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!

संपर्कः हॅलो जयकिसान टोल फ्री क्रमांकः १८०० १२१२ ३३३

दूरध्वनी क्रमांकः ०२०- ४६९०२१००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com