Food Processing : ‘अन्नप्रक्रिया योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे’

ज्या शेतकऱ्यांना कृषीशी निगडित अन्न प्रक्रियेसंबंधित नवीन उद्योग चालू करावयाचे आहे, त्याच्यासाठी कृषी अन्नप्रक्रिया योजना राबविण्यात येत आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon

पुणे : ज्या शेतकऱ्यांना कृषीशी निगडित अन्न प्रक्रियेसंबंधित (Food Processing) नवीन उद्योग चालू करावयाचे आहे, त्याच्यासाठी कृषी अन्नप्रक्रिया योजना (Agriculture Food Processing Scheme) राबविण्यात येत आहे. ही योजना केंद्र व राज्य सरकारने पुरस्कृत केली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कर्जाशी निगडित अनुदान देण्यात येणार आहे.

Food Processing
Food Processing : बिस्कीट प्रक्रिया उद्योगामध्ये तयार केली ओळख

ते अनुदान ३५ टक्के किंवा दहा लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येईल. यामध्ये शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी केले.

Food Processing
Food Processing : गाईच्या दुधापासून बंगाली मिठाई

दौंड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने केंद्र शासन साह्यित पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडा कार्यशाळेचे आयोजन दौंडमधील नवीन प्रशासकीय इमारत येथे मंगळवारी (ता. ३०) करण्यात आले होते.

बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेगावाचे हळद प्रक्रिया उद्योजक सुधीर पवार हे होते. तालुका कृषी अधिकारी राहुल माने, कृषी अधिकारी राणी खर्डे, ‘आत्मा’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर, संसाधन व्यक्ती दिलावर शेख आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com