Pomogranate Processing : डाळिंबापासून अनारदाना कसा बनवायचा?

डाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थाला उत्तर भारतात चांगली मागणी आहे.
Pomegranate Processing
Pomegranate Processing

डाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थाला उत्तर भारतात चांगली मागणी आहे. हा पदार्थ आंबट जातीच्या म्हणजेच ५ ते ७ टक्के आम्लता असलेल्या डाळिंबापासून बनवतात. अनारदाना चा उपयोग अन्नपदार्थात आंबटपणा आणण्यासाठी करतात. टोमॅटो केचअप, टोमॅटो सॉस याप्रमाणे अनारदानाही बरेच दिवस टिकवून ठेवता येतो. अनारदाना प्रामुख्याने आंबट जातीच्या डाळिंबापासून करतात. पिकलेल्या डाळिंबाचे दाणे उन्हात वाळून त्यापासून अनारदाना कसा बनवितात याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढील माहिती देली आहे.

Pomegranate Processing
Pomegranate : आंबिया बहराच्या डाळिंब बागेतील व्यवस्थापन

अनारदाना चा उपयोग

अनारदाना मध्ये ५.४ ते १४.७ टक्के पाणी, ७.८ ते १५.४ टक्के आम्लता, २.०४ ते ४.४ टक्के खनिजे, आणि ४.७४ ते ६.२५ टक्के प्रथिने असतात. हा पदार्थ अन्न शिजवताना चिंच, आमसूल ऐवजी अनेक अन्नपदार्थांत वापरता येतो. त्यामुळे अन्नाची चव सुधारते व अन्न स्वादिष्ट, रुचकर व पौष्टीक बनते.

अनारदाना कसा बनवाल?

रशियन जातीच्या आंबट डाळिंबापासून अनारदाना बनवितात. परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेल्या डाळिंबाच्या कमी आंबट जाती गणेश, मृदुला पासूनसुद्धा चांगल्या प्रकारे आनारदाना करता येऊ शकतो.

- प्रथम डाळिंब फळे निवडून ती स्वच्छ धुवून, साल काढून, दाणे वेगळे करावेत. नंतर १ किलो डाळिंबाच्या दाण्यात ५० ग्रॅम सायट्रीक आम्ल मिसळून ते सुर्यप्रकाशात ३ ते ४ दिवस सुकवावेत. किंवा कॅबिनेट ड्रायरमध्ये ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला १४ ते १६ तास सुकवावेत.

- तयार झालेला अनारदाना प्लॅस्टिक पिशव्यात भरुन त्याची साठवण किंवा विक्री करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com