Soybean Products : सोयाबीनपासून पौष्टिक पदार्थ कसे बनवाल ?

सोयाबीनवर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता येतात. सोयाबीन प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती आणि विक्रीला मोठ्या प्रमाणात वाव आहे.
Soybean Products
Soybean ProductsAgrowon

सोयाबीनवर प्रक्रिया (Soybean Processing) करून विविध पदार्थ तयार करता येतात. सोयाबीन प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती आणि विक्रीला मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्यामुळे महिलांसाठी घरगुती स्तरावर करण्यासाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योग फायदेशीर आहे. सोयाबीन पासून सोयानटस् (Soyanutts), सोयादूध (Soyamilk), सोयापनीर (Soyapaneer) म्हणजेच टोफू याशिवाय चकली, लाडू असे पारंपरिक पदार्थही बनवता येतात. कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद येथील दिप्ती पाटगावकर यांनी सोयाबीन पासून विविध पदार्थ कसे बनवायचे याविषय़ी दिलेली माहिती पाहुया.

Soybean Products
विविध फळांपासून नाविन्यपूर्ण प्रक्रियायुक्त पदार्थ

सोयानटस्

उकळत्या पाण्यात सोडा व मीठ मिसळून सोयाबीन २० ते २५ मिनिटे शिजवावे. गरम पाण्यातून सोयाबीन काढून थोडे सुकवून मायक्रोओव्हनमध्ये १०० अंश सेल्सिअस तापमानाला १२ मिनिटे बेक करावे किंवा शेंगदाणे किंवा चण्याच्या भट्टीत भाजून घ्यावेत. अशा प्रकारे खमंग व खुसखुशीत सोया नटस्‌ तयार करता येतात.

सोया दूध

सोयाडाळ स्वच्छ पाण्याने धुवून तीनपट पाण्यात ६ ते ८ तास भिजवावी. मात्र उन्हाळ्यात ३ ते ४ तास भिजवावी. डाळ स्वच्छ धुवून १ किलो सोयाडाळीसाठी ६ ते ८ लिटर उकळते गरम पाणी घेऊन मिक्‍सरमधून जाडसर बारीक करावे. बारीक केलेले मिश्रण १५ ते २० मिनिटे गॅसवर ठेवून सतत हलवत उकळून घ्यावे. हे दूध मलमलच्या कापडातून गाळून पुन्हा पाच मिनिटे उकळावे.

Soybean Products
शेंगदाण्यापासून विविध पदार्थांची निर्मिती

सोया पनीर (टोफू) 

सोया दूध ८० ते १०० अंश सेल्सिअस तापमानाला उकळावे. २ ग्रॅम सायट्रिक ऍसिड पाण्यात विरघळून १ लिटर सोया दूधात मिसळावे. दूध हलके हलवून ५ मिनिटे तसेच ठेवावे. फाटलेले दूध मलमलच्या कापडातून गाळून घेऊन पाणी वेगळे करून कापडातील साका पनीर प्रेसने दाबून पाण्याचा पूर्ण अंश काढून टाकावा. जो पदार्थ तयार होतो, त्याला सोया पनीर (टोफू) म्हणतात. तयार पनीर थंड पाण्यात ५ ते १० मिनिटे ठेवून पॅक करून फ्रीजमध्ये ठेवावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com