जीवन चलने का नाम

इथे अगदी पहिल्या श्‍वासापासून आपलं धावणं सुरू असतं. भूक स्वस्थ बसू देत नाही व स्वप्न शांतपणे जगू देत नाही आणि हे दोन्ही नसतील तर आपण नेमकं जगायचं कशासाठी? हा प्रश्‍न छळत राहतो.
Life
Life Agrowon

संजय गोर्डे

आयुष्य हे एक रविवार विरहित कॅलेंडर असतं. इथे अगदी पहिल्या श्‍वासापासून आपलं धावणं सुरू असतं. भूक स्वस्थ बसू देत नाही व स्वप्न शांतपणे जगू देत नाही आणि हे दोन्ही नसतील तर आपण नेमकं जगायचं कशासाठी? हा प्रश्‍न छळत राहतो. आपण बसून राहिलो तरी काळ काही थांबत नाही. त्यामुळे चालत राहणं अपरिहार्य आहे.

‘‘चलते रहते हैं कि चलना है मुसाफ़िर का नसीब

सोचते रहते हैं किस राहगुज़र के हम हैं?’’

Life
Indian Tourism : कोरोना साथीनंतर पर्यटन ‘रुळा’वर

या निदा फाजली यांच्या ओळींप्रमाणे आपली अवस्था असते. माणूस कधी पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, तर कधी उद्योग, कला, साहित्य, संशोधन अशा कुठल्या ना कुठल्यातरी गोष्टीसाठी आयुष्यभर धावतच असतो. जगण्यासाठी प्रत्येकालाच असे कुठलेतरी झपाटलेपण हवे असते. या धावपळीत सगळ्यांनाच सुखी ठेवण्याचा, खुश करण्याचा प्रयत्न निष्फळ असतो.

चांगले लोक आपल्याला चांगलं म्हणतात तर वाईट लोक वाईट! महान कोणीच नसतो. दोष सर्वांत असतात अगदी आपल्यातही. म्हणून स्वतःला उत्तरोत्तर दुरुस्त करत राहणं, अवास्तव महत्त्वाकांक्षा, प्रसिद्धीचा हव्यासापासून दूर व सुसंवादी राहून अनावश्यक संघर्ष टाळणं अशक्य नाही. पण काहीतरी मिळवण्याच्या नादात आपण स्वतःलाच कुठेतरी हरवून, विसरून गेलेलो आहोत.

कष्टमय जीवन हेच इथले वास्तव आहे. कुणीच यापासून पळून जाऊ शकत नाही. सुखाचे चैनीचे दिवस चुटकीसरशी निघून जातात. वाढत्या वयासोबत आलेले शहाणपण दुनियेची विसंगती दाखवते. लहानपणी आपल्या भाबड्या निरागस डोळ्यांनी पाहिलेलं सुंदर जग ते हेच का असं वाटत राहतं.

कुत्र्याचे निरागस पिलू आपल्याच गळ्यातल्या दोरीच्या शेंड्याला सावज समजून त्याला पकडण्यासाठी खांबाभोवती धावत राहतं. त्याच्या भाबडेपणाचं आपल्याला हसू येतं, पण आपलीही काहीशी अशीच गत झालेली आहे हे मात्र आपल्या लक्षात येत नाही.

आपल्याभोवती सुद्धा आपण अशा अनेक अनावश्यक गरजांचा पसारा वाढवून ठेवत आहोत आणि पुन्हा त्या गरजांच्या पूर्ततेसाठी धावण्याच्या दुष्टचक्रात आपण अडकलेलो आहोत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com