भरडधान्यांमध्ये प्रक्रियेला संधी

भगरीचे उत्पादन पूर्व आशिया, मंगोलिया, जपान, भारत, पूर्व आणि मध्य रशिया, अरेबिया, सिरीया, इराण, इराक आणि अफगाणिस्तान, अमेरिका, उत्तर चीनमध्ये घेतले जाते.
भरडधान्यांमध्ये प्रक्रियेला संधी
MilletAgrowon

डॉ.यु.डी.चव्हाण

-------------------------------

भगरीचे उत्पादन (Bhagar Production) पूर्व आशिया, मंगोलिया, जपान, भारत, पूर्व आणि मध्य रशिया, अरेबिया, सिरीया, इराण, इराक आणि अफगाणिस्तान, अमेरिका, उत्तर चीनमध्ये घेतले जाते. जमिनीची प्रत निकृष्ट असणाऱ्या ठिकाणी आणि खूप कमी कालावधी पाऊस असणाऱ्या ठिकाणी याचे उत्पादन घेतले जाते. हे कोरडवाहू तृणधान्य (Cereals) म्हणून ओळखले जाते.

१) भगरीपासून पापडया, कुरडया, चकल्या, डोसा इत्यादी पदार्थ तयार करता येतात. हे पदार्थ तयार करण्यासाठी पृष्ठभागावरील कोंडा काढणे आवश्यक असते.

२) भगरीस मिक्सरमधून हलके फिरवून घ्यावे. त्यानंतर पाखडून कोंडा वेगळा करुन घ्यावा. कोंडा विरहीत भगर तांदूळ प्रक्रिया युक्त पदार्थ तयार करण्यासाठी वापरावेत.

तृणधान्य, भरडधान्यापासून विविध खाद्य पदार्थ ः

१. पारंपारिक पदार्थ ः भाकरी, खिचडी, खीर, चुर्मा, खारी शेव, लाडू,बर्फी, भजी, ढोकळा, चाट

२. बेकरीतील पदार्थ ः बिस्कीटे, नानकटाई, केक, ब्रेड, खारी व गोड बिस्कीटे, खोबरे बिस्कीटे

३. इतर पदार्थ ः पास्ता, मॅकरोनी

४. मिश्र पदार्थ ः कडधान्ये व बाजरी यांचे मिश्रपदार्थ

५. डायबेटिक पदार्थ ः खारी व गोड बिस्कीटे, गव्हाच्या पिठाबरोबर मिश्र चपाती, ढोकळा, इडली

प्रक्रियेसाठी यंत्र सामुग्री ः

संयुक्त शेलर व हलर ः

१) या पध्दतीमध्ये प्रथम भगरीवरील टरफले शेलरने काढली जावून हलरने मोतीकरण केले जाते. यामध्ये कोंडा (टरफले) व्यवस्थित काढला जातो.

२) सध्या आधुनिक यंत्राव्दारे तृणधान्य स्वच्छ करणे, तृणधान्याची टरफले काढणे, टरफले तृणधान्यापासून वेगळे करणे, तृणधान्याचे मोतीकरण करणे, दर्जेनुसार तृणधान्य वेगळे करणे इ. प्रक्रिया केल्या जातात.

भगर स्वच्छता ः

१) यामध्ये कचरा, तृणधान्याव्यतिरिक्त इतर पदार्थ तृणधान्यापासून वेगळे केले जातात. तृणधान्यापेक्षा आकाराने लहान किंवा मोठे असलेले इतर पदार्थ लहान मोठया आकाराच्या चाळण्या वापरुन वेगळे काढले जातात.

२) तृणधान्यापेक्षा वजनाने कमी किंवा जास्त असलेले पदार्थ हवेच्या झोताने आणि लोखंडाचे तुकडे चुंबकीय यंत्राच्या सहाय्याने वेगळे केले जातात.

टरफले काढणारे रबरी शेलर ः

१) वेगवेगळ्या गतीने फिरणाऱ्या दोन रबरी रोलरमधील जागेतून तृणधान्ये काढली जातात. दाब आणि घर्षण या क्रियेमुळे टरफले तृणधान्यापासून निघून जातात. रबर शेलर वापरल्यामुळे तृणधान्याचे कमीत कमी तुकडे होतात. रबरी शेलर लवकर खराब होत असल्यामुळे ते वेळच्या वेळी बदलावे लागतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो.

२) मोतीकरण उभ्या शंकूकार मोतीकरण करणाऱ्या यंत्राने केले जाते. पूर्व प्रक्रिया केलेले तृणधान्य खडबडीत पृष्ठभागावर घासले जाऊन त्यावरील कोंडा निघून बारीक स्टीलच्या जाळीतून बाहेर पडतो आणि शेवटी आपल्याला पॉलिश केलेले तृणध्यान्य मिळते. या पध्दतीत उत्पादन खर्च कमी आहे परंतू यासाठी चांगले कुशल कामगार लागतात.

तृणधान्याचे मोतीकरण

तृणधान्य सडण्याच्या पध्दतीमध्ये आणि यंत्रसामुग्रीच्या वापरामध्ये अलीकडच्या काळापर्यंत खूपच बदल घडून आले आहेत. तृणधान्य सडण्यासाठी त्याची टरफले वेगळी करुन त्यांच्या पृष्ठभागावरील पडदा (कोंडा ) घासून वेगळा केला जातो.

----------------------------

संपर्क ः डॉ.यु.डी.चव्हाण, ९६५७२१४८३८

(अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि.नगर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com