Drumstick Processing : शेवग्याच्या पानांपासून पावडर, चहा, रस

शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत. शेवग्याची कोवळी पाने, फुले आणि शेंगाची भाजी करतात. आयुर्वेदात यांचे फायदे सांगितलेले आहेत.
Drumstick
DrumstickAgrowon

आरती देशमुख

शेवग्याच्या शेंगाचे (Drumstick) आरोग्यदायी फायदे आहेत. शेवग्याची कोवळी पाने (Drumstick Leaves), फुले आणि शेंगाची भाजी (Drumstick Recipe) करतात. आयुर्वेदात यांचे फायदे सांगितलेले आहेत. यामध्ये प्रथिने पोषक अन्नघटक लोह, बी १२. कॅरोटीन, अमिनो अॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ, क आणि ब यांसारखी जीवनसत्त्व आहेत. ही जीवनसत्त्वे शरीराची रोग्यप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी मदत करतात. शेवगा बहुगुणकारी आहे. यामध्ये जास्त प्रमाणात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण आहे. जीवनसत्त्व अ हे डोळांसाठी आवश्यक आहे.

Drumstick
नगरमध्ये शेवगा १५०,  गवार १३० रुपये किलो 

आरोग्यदायी गुणधर्म ः

१) शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर फायदेशीर ठरतो.यामध्ये पालक भाजीपेक्षा दुपटीने लोहाचे प्रमाण आहे.

२) शेवग्याच्या पाने शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढविण्यासाठी मदत करतात. अल्सर, ट्यूमर, नियंत्रण, सांधे दुखी सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

३) शेवग्याच्या पानांप्रमाणेच शेंगाही अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये रक्त शुद्धीकरणाची क्षमता असते.

४) रक्तातील दूषित घटक वाढल्याने होणारा आम्लाचा त्रास त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यास शेंगा फायदेशीर ठरतात.

५) शेवग्यांच्या शेंगामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते परिणामी मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. पित्ताशयाचे कार्यही सुरळीत होते.

६) घशातील खवखव, कफ, सर्दी, श्‍वास घेताना त्रास होत असल्यास शेंगाचे सूप घ्यावे. यामधील पोषणतत्त्वे श्‍वसन मार्गातून धोकादायक घटक कमी करण्यास मदत करतात. टीबी, ब्रोकायटिस, अस्थमा यांसारख्या आजारांवर शेंगा उपयुक्त आहेत.

७) डोळ्याची दृष्टी वाढविण्यासाठी कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यास मदत होते.

८) शक्यतो उकळत्या भाजीमध्ये शेवगा पावडरचा वापर करू नये. भाजी उकळून गॅस बंद केल्यानंतर मिसळावी म्हणजे पावडर मधील जीवनसत्त्व ‘अ’चे प्रमाण स्थिर राहते.

Drumstick
शेवगा, हादगा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

१०० ग्रॅम शेवगा पावडरमधील घटक ः

-जीवनसत्त्व ‘अ’चे प्रमाण गाजरापेक्षा ४ पटीने जास्त.

-जीवनसत्त्व ‘इ’चे प्रमाण पालक पेक्षा ३ पटीने जास्त.

-कॅल्शिअमचे प्रमाण दुधापेक्षा ३ पटीने जास्त.

-जीवनसत्त्व ‘अ’चे प्रमाण संत्री पेक्षा ४ पटीने जास्त.

- लोहाचे प्रमाण बदामपेक्षा जास्त.

शेंगा पाने आणि बियांपासून मूल्यवर्धित पदार्थ

शेवग्याच्या पानांचा समावेश पोषक किंवा पूरक आहारामध्ये केला जातो. पाने भाजी स्वरूपात खाण्यासाठी उपयोगी येतात. पाने वाळवून त्याची भुकटी बनवून त्याचा वापर भाज्या, पास्ता ब्रेड रोल इतर खाद्य पदार्थामध्ये केला जातो.

Drumstick
Food Processing : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

पानांचा रस ः

- शेवग्याची १० किलो ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. ती मंद आचेवर ५ मिनिटे गरम करावीत. त्यानंतर थंड करून घ्यावीत.

- शेवग्याच्या १० किलो पानांमध्ये १ लिटर पाणी मिसळून हॅमरमिलच्या साह्याने बारीक करून (दळून) घ्यावीत.

- तयार झालेला शेंगांचा रस गळून घ्यावा. त्यामध्ये २५० ग्रॅम साखर किंवा गूळ, २० ग्रॅम जिरे पावडर मिसळून एकजीव करावे. तयार झालेल्या रस हवाबंद बाटलीत भरून रेफिजरेटमध्ये ठेवावा.

पानांचा चहा ः

- सुरवातीला शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन सावलीत वाळवावी. ही पाने चहा पूड प्रमाणे बारीक करून घ्यावीत.

- एका पातेल्यात गरम पाणी करून त्यामध्ये पानाची पावडर आणि साखर मिसळावी.

- तयार झालेल्या शेवग्याच्या पानाचा चहा काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यामधून ४ ते ५ थेंब लिंबाचा रस मिसळावा. तयार झालेला चहा अतिशय गुणकारी असून चवीला चांगला लागतो.

शेवग्याचे महत्त्व (१०० ग्रॅममधील घटक)

घटक---शेंगा---ताजी पाने---पानांची पावडर

कर्बेादके (ग्रॅम)---२.७---१२.७---४१.२

प्रथिने (ग्रॅम)---२.५---६.७---२९.४

स्निग्ध पदार्थ (ग्रॅम)---०.१---६.७---५.२

तंतुमय पदार्थ (ग्रॅम)---४.८---१.७---१९.२

कॅल्शिअम (मिलि ग्रॅम)---५.२---०.९०---२५.६

जीवनसत्त्व अ (मिलि ग्रॅम)---०.११---६.७८१---७.६

जीवनसत्त्व क (मिलि ग्रॅम)---१२०---२२०---१५८

जीवनसत्त्व इ (मिलि ग्रॅम)---४.४७- --- ---१०८

--------------------------------------------------------

संपर्क ःआरती देशमुख, ९५०३६१२७०२

(विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com