पुरंदर हायलॅंड’चे अंजीर ब्रेड स्प्रेड बाजारात दाखल

शेतीमालावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी एकत्र आलेल्या पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनी अंजिराच्या ब्रेड स्प्रेड उत्पादन घेण्यात यशस्वी झाले आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon

पुणे ः शेतीमालावर प्रक्रिया (Agriculture Produce Processing) आणि मूल्यवर्धनासाठी एकत्र आलेल्या पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनी (Purandar Highland Farmer Producer Company) अंजिराच्या ब्रेड स्प्रेड उत्पादन (Fig Bread Spread Production) घेण्यात यशस्वी झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, ॲमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने ऑनलाइन विक्रीसाठी सादर केले आहे, अशी माहिती पुरंदर हायलॅंडचे अध्यक्ष रोहन उरसळ (Rohan Ursal) यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यातील दिवे जाधववाडी येथे अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. अंजिराचे निर्यातक्षम उत्पादन ते प्रक्रिया करण्यासाठी विविध पातळ्यांवर कंपनी काम करत असल्याचे कंपनीचे अध्यक्ष रोहन उरसळ यांनी सांगितले. अंजिराच्या प्रक्रियेसाठी गेली अनेक दिवस कंपनीचे संचालक अतुल कडलग काम करत होते.

Food Processing
‘पुरंदर नॅचरल ब्रॅण्ड’ने बाजारात मिळवली ओळख

गेल्या सहा महिन्यांच्या विविध प्रयत्नांना यश येऊन अंजिराचे ब्रेड स्‍प्रेड बाजारात दाखल झाले आहे. यासाठी भौगोलिक मानांकनांतर्गत नोंदणी झालेल्या ८२ अंजीर उत्पादक शेतकऱ्यांकडून १० टन अंजीर खरेदी करून ते उणे २५ अंश सेल्सअसमध्ये ठेवण्यात आले होते. या अंजिरावर प्रक्रिया करून, ते ब्रेड स्प्रेड विविध हॉटेल्स, कुक, गृहिणी यांना चवी साठी दिले होते. या घटकांकडून आलेल्या प्रतिसादानंतर अंतिम उत्पादन करण्यात आले आहे. १० टन अंजिरापासून ३ टन ब्रेड स्प्रेडचे उत्पादन घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी १ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, असेही उरसळ यांनी सांगितले.

१५ हजार बॉटल्स विक्रीसाठी उपलब्ध

ही उत्पादने २१० ग्रॅमच्या बॉटलमधून विक्री करण्यात येत असून, यासाठी २२५ रुपये किंमत आकारण्यात येत आहे. हे उत्पादन ॲमेझान या ई-कामॅर्ससह पुण्यातील प्रसिद्ध ग्राहक पेठ आणि डागा ब्रदर्स या सुपर स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. सध्या १५ हजार बॉटल्स विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे उरसळ यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com