कृषी कर्जाची तपासणी

कोणत्याही प्रकल्पासाठी बॅंकेकडून भांडवल कर्जाऊ घेणार असल्यास कर्ज मंजुरीपूर्वी सर्व घटक योग्य असल्याची व कर्ज मंजुरीनंतर दिलेली रक्कम व्यवस्थित वापरली जात असल्याची खात्री बॅंक करते. त्यातून बॅंकेला आपण दिलेले कर्जाऊ भांडवल योग्य व्यक्तीच्या ताब्यात असल्याची म्हणजेच परतफेडीची खात्री पडते.
 कृषी कर्जाची तपासणी
If you are going to do any project with a loan, it is checked by the bank at regular intervals before and after the loan is approved.

कोणत्याही प्रकल्पासाठी बॅंकेकडून भांडवल कर्जाऊ घेणार असल्यास कर्ज मंजुरीपूर्वी सर्व घटक योग्य असल्याची व कर्ज मंजुरीनंतर दिलेली रक्कम व्यवस्थित वापरली जात असल्याची खात्री बॅंक करते. त्यातून बॅंकेला आपण दिलेले कर्जाऊ भांडवल योग्य व्यक्तीच्या ताब्यात असल्याची म्हणजेच परतफेडीची खात्री पडते.   कृषी कर्ज तपासणीचे प्रकार

 • कर्ज मंजुरीपूर्व तपासणी (Pre Sanction inspection)
 • कर्ज वितरण केल्यानंतरची तपासणी (Post Sanction Inspection).
 • कर्ज मंजुरीपूर्व तपासणी  बँकेच्या दृष्टीने ही तपासणी फार महत्त्वाची असते. प्रकल्प अहवालामध्ये नोंदलेल्या सर्व बाबींची शहानिशा या वेळी केली जाते. प्रकल्प करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याची आर्थिक क्षमता, जागेची व शेतीची पाहणी, पीक परिस्थिती, पाणी, वीज यांची उपलब्धता, रस्ते आणि वाहतूक सुविधा इ. सर्व बाबी प्रकल्पाच्या दृष्टीने योग्य आहेत का, यांची खात्री केली जाते. पुढे उभा राहणाऱ्या प्रकल्पातील अडचणींचा अंदाज त्यांना येतो. एखादे कर्ज मंजूर करायचे की नाही, याचीही शहानिशा केली जाते. अशा पाहणीसाठी बहुतांश वेळा अनुभवी, कृषी क्षेत्राशी संबंधित बॅंक अधिकारी भेट देत असतात. त्यांच्या अनुभवी नजरेला खात्री पटल्यानंतर कर्ज प्रकरण मंजूर होण्यात फारशी अडचण येत नाही. म्हणून प्रकल्प अहवाल तयार करताना सर्व बाबी खऱ्या आणि स्पष्टपणे  मांडलेल्या असाव्यात. कर्ज मंजूर पूर्वतपासणीतून प्रकल्पाची तांत्रिक समक्षता   अधिकाऱ्यांना समजू शकते. कर्ज वितरण केल्यानंतरची तपासणी   कर्ज वितरण केल्यानंतरही दिलेल्या रकमेचा प्रकल्पासाठी योग्य व अपेक्षित कारणांसाठीच वापर होत असल्याची खात्री करण्यासाठी बॅंकेच्या वतीने प्रकल्पाची तपासणी केली जाते. प्रकल्पाच्या विविध टप्प्यामध्ये आणि पूर्ण झाल्यानंतर दर काही काळाने अशा दोन्ही प्रकारे तपासण्या केल्या जातात. विशेषतः ज्या कृषी प्रकल्पाच्या उभारणीला अधिक कालावधी लागतो. असा प्रकल्पासाठी कर्जाचे वितरणही टप्प्याटप्प्याने होत असते. प्रत्येक टप्प्यानंतर झालेल्या कामाची तपासणी होणे आवश्यक असते. झालेले काम शास्त्रीय पद्धतीने व योग्य दर्जाचे झाले आहे, याची खात्री झाल्यानंतरच पुढील कर्ज वितरण करता येते. उदा. जमीन सुधारणा प्रकल्प, विहीर खोदाई, उपसा सिंचन योजना, कुक्कुट पालन आणि दुग्ध व्यवसायात शेड चे बांधकाम, फळबाग लागवड इ.  प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठरावीक काळानंतर प्रकल्पाची तपासणी करणे आवश्यक असते. यामध्ये कर्जातून निर्माण झालेली वास्तू, शेड इ. यांचा आकार, दर्जा यांची खात्री केली जाते. तसेच यंत्रे, अवजारे व अन्य साहित्य यांचे कार्य योग्य प्रकारे सुरू असल्याची खात्री केली जाते. उदा. पीककर्जामध्ये पिकांची पाहणी, ट्रॅक्टर व इतर मशिनरी यांची स्थिती, फळबागेमध्ये झाडांची वाढ, हरितगृहाची  स्थिती, ठिबक सिंचन इ. कार्यरत असल्याचे पाहिले जाते. कर्ज तपासणीचे महत्त्व व परिणाम 

 • कर्ज वितरण काळात तपासणीमध्ये कर्जाच्या रकमेचा योग्य वापर होत नसल्याचे आढळल्यास बॅंकेकडून पुढील कर्जवाटप त्वरित थांबवले जाऊ शकते. बॅंक अधिकारी त्यांचे नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने विचार करतात.
 • तपासणीमध्ये प्रकल्प किंवा ते पीक अपेक्षित पद्धतीचे चालू असल्याचे स्पष्ट झाल्यास कर्जाच्या परतफेडीची बॅंकेला खात्री मिळते.
 • कदाचित नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असल्यास प्रत्यक्ष पाहणीनंतर कर्जाच्या परतफेडीची पुनर्बांधणीही करणे शक्य होते. यामध्ये पीक कर्ज आणि मुदत कर्जाचा समावेश होतो. 
 • प्रकल्पामध्ये कोणतीही समस्या निर्माण झाल्यास किंवा कर्जाचा हप्ता व व्याज भरणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट होताच कर्जदाराने बॅंकेस त्याची कल्पना द्यावी. प्रत्यक्ष पाहणी करण्यास सांगावे. ही त्याची जबाबदारी आहे. अनेक वेळा मानवी हाताबाहेरील कारणांमुळे अडचणी येऊ शकतात. बँकेस आपली अडचण व्यवस्थित सांगितल्यास बॅंकेच्या वतीने त्या सोडविण्यासाठीचे पर्याय सुचवले जातात. कर्जाच्या पुनर्बांधणीसंबंधीही बँक योग्य तो निर्णय घेऊ शकते. संभाव्य थकबाकी टाळून प्रकल्प सुरळीत चालू राहू शकतो.
 • प्रकल्प उभारणी वेळी काही अपरिहार्य कारणामुळे प्रकल्प खर्चात वाढ झाल्यास किंवा अन्य काही कारणामुळे प्रकल्प पूर्ण होण्यात समस्या उद्‌भवल्यास त्याचीही कल्पना बॅंकेला देऊन वस्तुस्थितीची पाहणी, तपासणी करण्यास सांगावे. त्यातून मार्ग काढता येतो. 
 • कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यातून घेतलेल्या वस्तू, यंत्रे, पशुधन, साहित्य यांची कर्जदाराने परस्पर विल्हेवाट लावू नये. कारण बॅंकेच्या वतीने नियमित पाहणी होत असते, हे लक्षात ठेवावे. अशा बाबी प्रत्यक्ष पाहणीत आढळून आल्यास बँकेच्या वतीने कर्ज वसुलीसाठी योग्य ते निर्णय  घेतले जातात. 
 • प्रत्यक्ष पाहणी आणि स्पष्टता... मनोजची काहीतरी धावपळ चाललेली दिसल्याने त्याचा मित्र समीरने अडवून विचारले, “काय धावपळ चालू आहे?’’ मनोज म्हणाला, “अरे, बँकेचे अधिकारी शेतावर आले तपासणीला. माझे शेत आणि घर पाहून गेले.’’ समीरच्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह दिसताच त्याने अधिक खुलासा केला. ‘‘काही नाही रे, मी दुग्ध व्यवसायासाठी बँकेत कर्जासाठी प्रकल्प सादर केला. कर्ज मंजूर करण्यापूर्वी तपासणी केली जाते ना, त्यासाठी आले होते बँकेचे लोक.’’ समीरला तरीही शंका होतीच, तो म्हणाला ,‘‘कशासाठी ही तपासणी, कर्जासाठी तू सगळी कागदपत्रे तर आधीच सादर केली असतील ना?’’ मनोज म्हणाला, ‘‘मला ही असेच वाटले होते. पण आज आलेल्या अधिकाऱ्यांबरोबरच्या चर्चेमध्ये बरेच प्रश्‍न होते त्यांना. माझ्या परीने मी सर्व उत्तरे दिली. आपले सगळे खरेच आहे ना, मग भ्यायचे कशाला? मीही सहज म्हणून तुझ्यासारखाच प्रश्‍न त्यांना विचारला. तर ते म्हणाले, की काही वेळा कागदपत्रांतून सगळ्या गोष्टी स्पष्ट होत नाहीत. प्रत्यक्ष प्रकल्पाची जागा, घर, शेत यांची पाहणी केली, की त्या माणसांचा आवाका, रस्ता, पाणी, वीज अशा पायाभूत सुविधांची नेमकी स्थिती कळते. अनेक गोष्टी अधिक स्पष्ट होतात. कर्ज मंजुरीसाठी ही स्पष्टता फार महत्त्वाची ठरते.’’ कर्जाचा योग्य वापर होतोय का? कालच बॅंकेतील अधिकाऱ्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे संपतरावांनी आज त्यांचा ट्रॅक्टर आणि ट्रेलर बँकेसमोर आणून उभा केला. गेल्या वर्षीच त्यांनी हा ट्रॅक्टर बँकेकडून कर्ज काढून घेतला होता. बँकेच्या विनंतीवरून त्यांनी तो बँकेत तपासणीसाठी आणला होता. बँकेच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरची पाहणी केली. ट्रॅक्टर आणि ट्रेलरवर लिहिलेले बँकेचे नाव पाहिले. ट्रॅक्टरचे फोटो काढले. ट्रॅक्टर आणि ट्रेलरचे आरसी पुस्तक पाहिले. त्यावरील बँकेची नोंद तपासली. त्यानंतर बँक अधिकारी म्हणाले, ‘‘संपतराव, बँकेने कर्ज दिल्यानंतर घेतलेली वाहन किंवा यंत्रे ही ठरावीक काळानंतर सुस्थितीत आहेत का, त्यांचा योग्य वापर होतो आहे का, म्हणजेच बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा योग्य वापर होतोय, याची खात्री करणे आवश्यक असते. म्हणून तुम्हाला तुमचा ट्रॅक्टर, ट्रेलर दोन्ही येथे आणायला सांगितले.’’ पाहणी झाल्यानंतर त्यांनी काही नोंदी केल्या. संपतरावांना काम झाल्याचे सांगून, ट्रॅक्टर घेऊन जाण्यास सांगितले. (लेखक बॅंक ऑफ इंडियाचे  निवृत्त सहायक महाव्यवस्थापक आहेत.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com