Drip irrigation is beneficial in vegetable crops
Drip irrigation is beneficial in vegetable crops

कृषी सल्ला : भूईमूग, लसूण घास, कांदा, भाजीपाला

पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. आच्छादनामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. पिकांना पाणी देताना आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब करावा.

  पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. आच्छादनामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.    पिकांना पाणी देताना आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब करावा.  शेतीची कामे करताना कामगारांना ४ ते ५ फुटांचा पट्टा वाटून दिल्यास काम पण योग्य होईल आणि योग्य सुरक्षित अंतरही राखले जाईल. शेती यंत्रे निर्जंतुकीकरण करावीत. तोंडाला मास्क अथवा कापड गुंडाळावे. भुईमूग 

  • शेंगा भरण्याची अवस्था.
  •  ६० ते ७० दिवसांनंतर शेंगा पोसण्याची अवस्था असल्याने संरक्षित पाण्याची पाळी द्यावी.
  • लसूण 

  • काढणी
  •  पीक काढणी अवस्थेत असल्यास तीन आठवडे आधी पाणी तोडावे. 
  • फळ पिके 

  • नवीन लागवड केलेल्या फळबागांच्या कलमी रोपांचे उन्हापासून संरक्षण करावे. 
  • फळबागांमधील बाष्पीभवन कमी होण्यासाठी पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. 
  •  सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • भाजीपाला 

  • वाढीची अवस्था.
  • सध्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
  • शेडनेटमध्ये भाजीपाला पिकांना ठिबकद्वारे पाणी द्यावे. 
  •  भाजीपाला पिकांवरील रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी) ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनील २.५ मिलि.
  • कांदा 

  •   काढणी.
  •  रब्बी कांद्याचे पीक काढणी अवस्थेत असल्यास, तीन आठवडे आधी पिकाचे पाणी तोडावे. 
  • वेलवर्गीय पिके (टरबूज, काकडी) 

  • वाढीची अवस्था.
  •  टरबूज आणि काकडीवर्गीय वेल  पिकांमध्ये खालच्या पानांमध्ये नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 
  •  फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी ५ कामगंध सापळे लावावेत.
  • लसूण घास  स्पोडोप्टेरा अळीच्या व्यवस्थापनासाठी १ मिलि एस.एल.एन.पी.व्ही.+ ५ ग्रॅम बिव्हेरिया बॅसियाना प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पशुपालन  व्यवस्थापन 

  • तापमान वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान देखील वाढते. हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जनावरे जास्त पाणी पितात व चारा किंवा खाद्य कमी 
  • खातात. याचा एकूणच जनावरांच्या वाढीवर, प्रजननावर व उत्पादनावर 
  • प्रतिकूल परिणाम होतो. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उन्हाळ्यात जनावरांची काळजी घ्यावी.
  • जनावरांचा गोठा थंड जागी किंवा झाडाखाली बांधावा. गोठ्याच्या छपरावर गवत, पालापाचोळा, नारळाच्या झावळ्या टाकून त्यावर पाणी शिंपडावे. त्यामुळे गोठा थंड राहतो.
  • उन्हाळ्यामध्ये जनावरांना दिवसातून किमान ३ ते ४ वेळा थंड व स्वच्छ पाणी द्यावे. गोठ्यात पाण्याची स्वतंत्र सुविधा असावी. 
  •  पाण्याचे भांडे शक्यतो, माती किंवा सिमेंटपासून बनवलेले असावे. जेणेकरून पाणी दिवसभर थंड  राहील.
  •  जनावरांना उन्हाळ्यात दुपारच्या वेळी चरावयास सोडू नये.
  • दुपारच्या वेळी जनावरांना हिरवा मका, चवळी, कडवळ, लसूण घास द्यावे. त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही  सुधारते.
  •  उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण होण्यासाठी जनावरांना पुरेसा निवारा उपलब्ध करून द्यावा. गोठा हवेशीर असावा. गोठ्यामधून गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी जागा असावी.
  • - ०२४२६-२४३२३९, (प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com