दर्जेदार बियाणे निवड, पीक व्यवस्थापन महत्त्वाचे...

सध्या खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने योग्य गुणवत्ताक्षम बियाणे निवड करावी. सुधारित पद्धतीने पीक लागवड आणि व्यवस्थापनाचे नियोजन करावे. सकस चाऱ्यासाठी सुधारित चारा पिकांच्या जातींची निवड करावी.
Nepiar grass
Nepiar grass

सध्या खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने योग्य गुणवत्ताक्षम बियाणे निवड करावी. सुधारित पद्धतीने पीक लागवड आणि व्यवस्थापनाचे नियोजन करावे. सकस चाऱ्यासाठी सुधारित चारा पिकांच्या जातींची निवड करावी. कृषी निविष्ठा खरेदीसाठी किंवा माल विक्रीसाठी बाजारात जाताना सामाजिक सुरक्षा उपायांचे पालन करावे. कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्रातून खात्रीशीर बियाणे खरेदी करावे. सोयाबीनचे बियाणे शक्यतो घरचेच वापरावे. त्यासाठी बियाण्याची उगवणक्षमता घरच्या घरी तपासून ७० टक्के उगवणक्षमता असल्यास असे बियाणे पेरणीसाठी  वापरावे.   कापूस 

  • गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी लागवड ७ जूननंतर करावी. 
  • पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. कोरडवाहू संकरित कपाशीला प्रति हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश द्यावे. त्यापैकी ४० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळेस द्यावे. उर्वरित ३० टक्के नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी, तर ३० टक्के नत्र पेरणीनंतर ६० दिवसांनी द्यावा. 
  • अवर्षण काळात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडांना मातीची भर द्यावी. 
  • सोयाबीन

  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम याप्रमाणात प्रक्रिया करावी. (लेबल क्लेम शिफारस) त्यानंतर रायझोबियम आणि पीएसबी या जिवाणूसंवर्धकांची प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम किंवा १०० मिलि या प्रमाणात प्रक्रिया करावी. 
  • उच्च प्रतीचे बियाणे व चांगली उगवणशक्ती असलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे. एमएयूएस-१६२, एमएयूएस-६१२, फुले संगम, पिकेव्ही यलो गोल्ड या सुधारित जाती निवडाव्यात. 
  • पेरणीवेळी प्रति हेक्टरी ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश ही खत द्यावी. स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे न दिल्यास मूलद्रव्य गंधक २० किलो प्रति हेक्टरी पेरणीवेळी द्यावे. 
  • मका

  • लागवड मध्यम ते भारी जमिनीत ६० सेंमी × ३० सेंमी अंतरावर करावी. प्रति हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. माती परीक्षणाच्या आधारावर शिफारशीप्रमाणे प्रति हेक्टरी १५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश ही खत मात्रा द्यावी. त्यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळी द्यावे आणि ७५ किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. 
  • अमेरिकन लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टरी पाच फेरोमोन सापळ्यांचा वापर पेरणीच्या वेळी करावा. 
  • तूर

  • बीडीएन-७११, बीडीएन-७१६, पीकेव्ही तारा, फुले राजेश्‍वरी यांसारख्या मर व वांझ रोग प्रतिबंधक आणि लवकर ते मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या सुधारित जाती निवडाव्यात.
  • पेरणीपूर्वी दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम आणि २५० ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. 
  • पेरणीच्यावेळी प्रति हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद द्यावे.
  • ऊस  पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस (२० टक्के) ३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून हवामान स्वच्छ असताना फवारणी घ्यावी. (ॲग्रेस्को शिफारस) डाळिंब बागेला पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी. झाडाचे योग्य व्यवस्थापन ठेवावे. पोटॅशिअम नायट्रेट १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

    सीताफळ  नवीन लागवडीसाठी बालानगर, धारूर, दौलताबाद यांसारख्या सुधारित जातींची दर्जेदार व रोगमुक्त रोपांची निवड करावी. 

    लिंबूवर्गीय पिके 

  • नवीन लागवडीसाठी दर्जेदार व रोगमुक्त रोपे नोंदणीकृत रोपवाटिकेतून खरेदी करावीत. 
  • आंबिया बहरातील लिंबूवर्गीय पिकांच्या बागेत पाणी व्यवस्थापन करावे. पोटॅशिअम नायट्रेट १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी. 
  • डिंक्या आणि डायबॅक रोगाच्या नियंत्रणासाठी खोडाला बोर्डो पेस्ट लावावी. 
  • केळी रोपांना मातीचा आधार द्यावा. बागेत जैविक आच्छादन करावे.  भाजीपाला पिके मिरची पुसा ज्वाला आणि पुसा ज्योती यासारख्या कीड प्रतिबंधक जातींची निवड करावी. रोपांची लागवड ३० जून पूर्वी करावी. 

    टोमॅटो टोमॅटोच्या अर्का रक्षक किंवा अर्का सम्राट या रोग प्रतिबंधक जातींची लागवड करावी. 

    भेंडी फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा क्लोरॲंट्रॉनिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) २.५ मिलि किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)  वांगी  शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी ४ टक्के निंबोळी अर्क किंवा क्लोरपायरीफॉस (२० टक्के ईसी) २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (ॲग्रेस्को शिफारस)  पशुपालन सल्ला 

  • वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी मका पिकाची आफ्रिकन टॉल आणि संकरित नेपियर गवताची डीएचएन-६, बीएनएच-१० या जातींची लागवड करावी. जास्तीच्या चाऱ्यापासून मुरघास तयार करावा. 
  • दुधाळ जनावरांना पुरेसे स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. अधिक दूध उत्पादन व जनावरे वेळेवर माजावर येण्यासाठी त्यांना प्रति दिन ५० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे. 
  • शेळ्यांचा पीपीआर रोगापासून नियंत्रणासाठी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे. 
  • परसबागेतील कोंबडीपालनासाठी ग्रामप्रिया, श्रीनिधी, कावेरी, गिरिराजा, वनराजा या जातींचे संगोपन करावे.
  • कोरोना काळातील आरोग्य व्यवस्थापन

  • राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना प्रतिबंधक उपायांचा अवलंब करावा. 
  • शेतीकामात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींनी मास्क वापरावा. साबणाने वेळोवेळी हात धुवावेत. 
  • कृषी निविष्ठा खरेदीसाठी किंवा माल विक्रीसाठी बाजारात जाताना विहित सामाजिक सुरक्षा उपायांचे पालन करावे. 
  • मजुरांद्वारे शेती कामे करताना प्रत्येक व्यक्तीला ४ ते ६ फुटांचा एक पट्टा कामासाठी वाटून द्यावा. जेणेकरून दोन व्यक्तीमध्ये पुरेसे अंतर राहून सामाजिक अंतर राखले जाईल. 
  • शेती कामासाठी कृषी यंत्रे व अवजारांचा वापर करावा. 
  •  परसबागेत विविध भाज्या, फळ पिकांची लागवड करावी. 
  • संपर्क : ०२०- २५५१२६६५ (संचालक, अटारी, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com