कृषी सल्ला (सोयाबीन, तूर, भुईमूग,बाजरी )

पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
Groundnut cultivation
Groundnut cultivation

हवामान सारांश  पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. सामान्य सल्ला 

 • शेतीचे कामे करताना मजुरांना ४ ते ५ फुटाचा पट्टा वाटून दिल्यास काम पण योग्य होइल आणि सुरक्षित अंतरही राखले जाईल. काम करताना तोंडाला मास्क अथवा कापड गुंडाळावे.
 • शेती यंत्रे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावीत.
 • सरासरी ६० ते ७५ मिलि पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.
 • सोयाबीन 

 • पेरणीची तयारी
 • मध्यम, काळी पोयट्याची, चांगली निचरा होणारी जमीन लागवडीस निवडावी.
 • एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
 • वाण :  जेएस-३३५, एम.ए.सी.एस-११८८, फुले कल्याणी (डीएस-२२८), जेएस-९३०५, केएस-१०३, फुले अग्रणी, (केडीएस ३४४) आणि फुले संगम (केडीएस ७२६)
 • तूर 

 • पेरणीची तयारी
 • मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकांकरिता योग्य असते.
 • चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुसभुशीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते.
 • जमिनीत स्फुरद, कॅल्शिअम, गंधक या द्रव्यांची कमतरता नसावी.
 • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
 • वाण :  विपुला, फुले राजेश्‍वरी, आयसीपीएल-८७, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६, बीडीएन-७११, बीडीएन-७१६
 • भुईमूग 

 • पेरणीची तयारी
 • मध्यम, भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
 • एक नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
 • वाण :  एसबी-११, जेएल-२४ (फुले प्रगती), टीएजी-२४, जेएल-२२० (फुले व्यास), जेएल-२८६ (फुले उनप), टीपीजी-४१, टीजी-२६, जेएल-५०१, फुले आरएचआरजी-६०२१, फुले उन्नती, जेएल-७७६ (फुले भारती)
 • मूग व उडीद 

 • पेरणीची तयारी
 • मूग आणि उडीद पिकाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
 • पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन लागवडीस टाळावी.
 • चांगली पूर्वमशागत ही मूग आणि उडदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे.
 • लागवडीसाठी वाण 

 • मूग :  वैभव हा वाण खरिपासाठी उपयुक्त आहे. मुगामध्ये वैभव व बी.पी.एम.आर-१४५ हे दोन वाण भुरी रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत.
 • उडीद :   टी.पी.यू-४ आणि टी.ए.यू-१.
 • बाजरी 

 • पेरणीची तयारी
 • पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी.
 • जमिनीचा सामू हा ६.२ ते ८ दरम्यान असावा.
 • हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.
 • जमिनीची १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या
 • कुळवणी अगोदर प्रती हेक्टरी ५ टन किंवा १० ते १५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे.
 • वाण  अ) संकरित :  फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती
 • ब) सुधारित :  धनशक्ती
 • मका 

 • पेरणीची तयारी
 • मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीस निवडावी.
 • एक खोल नांगरट, २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीची पूर्वमशागत करावी.
 • हेक्टरी १० ते १ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मिसळून घ्यावे.
 • हिरवळीचे खत गाडले असल्यास शेणखत/ कंपोस्ट खताची आवश्‍यकता नसते.
 • सूर्यफूल 

 • पेरणीची तयारी
 • लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.
 • आम्लयुक्त आणि बांध जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
 • जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या उभ्या आडव्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.
 • संपर्क ः ०२४२६-२४३२३९ (प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com