
झुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज, स्पॅगेटी स्क्वॅश आणि काकडी यांच्याप्रमाणे उन्हाळी फळ आहे. ते कच्चे किंवा शिजवून खाता येत असल्याने फळभाजी म्हणून लोकप्रिय आहे. झुकिनी (शा. नाव : कुकुरबीटा पेपो) हे काकडीवर्गीय पीक असून, इंग्रजीमध्ये ‘समरस्क्वॅश’ या नावाने ओळखले जाते. काकडी व दुधी भोपळ्याची मिश्रित चव व काकडीसारखेच याचे फळ दिसते. या पिकाची फळे गर्द हिरव्या, पोपटी, राखाडी व पिवळ्या रंगात येतात. याच्या झुडूपसदृश वेली असून, कमाल ३ फुटांपर्यंत उंची असते. सरासरी उंची दीड ते दोन फुटांपर्यंत राहते. झुकिनीची पाने भली मोठी दीड ते दोन फूट लांब व तांबड्या भोपळ्यासारखी दिसतात. त्याला लांबलचक दांडा असतो व पानावर तसेच पानाच्या दांड्यावर बारीक पांढरी काटेरी लव असते. पानाच्या देठाच्या बेचक्यात याला फुले लागतात. काकडीवर्गीय पीक असल्यामुळे याला नर व मादी अशी वेगवेगळी फुले एकाच झुडपावर लागतात. संपूर्ण न पिकलेली फळे झुडूपसदृश वेलीवरून तोडली जातात. फळांची लांबी २.२ फुटांपेक्षा जास्त वाढू शकते. मात्र सरासरी सामान्यपणे २० सें.मी.पर्यंत फळ घेतले जाते. वनस्पतीशास्त्रानुसार हे फळ असले तरी फळभाजी म्हणून वापरली जाते. याची फळे कच्ची किंवा शिजवून सॅलडच्या स्वरूपात खाल्ली जातात. झुकिनीचे प्रकार
झुकिनीचे आरोग्यवर्धक फायदे एक कप शिजवलेल्या झुकिनी (२२३ ग्रॅम) मधून मिळणारी पोषकतत्त्वे : ऊर्जा १७ कॅलरी, प्रथिने १ ग्रॅम, चरबी १ ग्रॅमपेक्षा कमी, कार्ब ३ ग्रॅम, साखर १ ग्रॅम, फायबर १ ग्रॅम, जीवनसत्त्व-अ ४०%, मॅंगेनीज १६%, जीवनसत्त्व-क १४%, पोटॅशिअम १३%, मॅग्नेशिअम १०%, फोलेट ८%, तांबे ८%, फॉस्फरस ७%, जीवनसत्त्व-ब-६ -७%, थायमिन ५% (टक्केवारीतील प्रमाण हे शिफारस केलेल्या आहारातील दैनिक सेवनाच्या (आरडीआय) तुलनेत दिले आहे.)
- डॉ. अविनाश काकडे, ८०८७५२०७२० डॉ. हेमंत रोकडे, ९८८१७७५०९५ रहीम खान निजाम खान, ९३७१३७३३९९ (राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.