ठिबक संचाची योग्य देखभाल

पीक उत्पादनात वाढ आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन फायदेशीर ठरते. ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांची शिफारशीत मात्रा देते येते. तसेच अन्नद्रव्ये आणि सिंचनाच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे सोपे होते. ठिबक सिंचनातून अन्नद्रव्ये आणि पाणी योग्य प्रमाणात पुरवठा होण्यासाठी संचाची वेळोवेळी देखभाल करावी.
Applying the right amount of soluble fertilizers through drip irrigation gives quality product.
Applying the right amount of soluble fertilizers through drip irrigation gives quality product.

पीक उत्पादनात वाढ आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन फायदेशीर ठरते. ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांची शिफारशीत मात्रा देते येते.  तसेच अन्नद्रव्ये आणि सिंचनाच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे सोपे होते. ठिबक सिंचनातून अन्नद्रव्ये आणि पाणी योग्य प्रमाणात पुरवठा होण्यासाठी संचाची वेळोवेळी देखभाल करावी. डबल ड्रीपलाइनचा वापर शेतकऱ्याकडून घडणाऱ्या बाबी आजही शेतकरी फळबागेत झाडाच्या एका बाजूस ड्रीपलाइन किंवा लॅटरलवर ड्रीपर बसवून पाणी आणि खते देतात.   तांत्रिकदृष्ट्या योग्य बाबी फळझाडांमध्ये झाडाच्या दोन्ही बाजूंस एकसमान पाणी व अन्नद्रव्ये देण्यासाठी व उत्तम गुणवत्तेचे अधिक फळ उत्पादन मिळवण्यासाठी डबल ड्रीपलाइनचा वापर करणे अतिशय महत्त्वाचे असते. ठिबक सिंचनाचा कालावधी  शेतकऱ्याकडून घडणाऱ्या बाबी

 • बहुतांश शेतकरी पिकाच्या वाढीची अवस्थेनुसार पाण्याची गरज लक्षात न घेता ठिबक सिंचनाने देखील गरजेपेक्षा जास्त पाणी देतात.
 • तांत्रिकदृष्ट्या योग्य बाबी     

 • आपल्याकडे असणारे पीक, आपल्याकडील हवामान परिस्थिती, बाष्पीभवनाचा वेग, पीक वाढीची अवस्था या सर्व बाबींचा विचार करून पिकास आवश्यक तेवढेच पाणी देणे अतिशय जरुरीचे आहे. 
 • पिकाच्या गरजेपेक्षा जास्त किंवा कमी पाणी दिल्यास पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. यासाठी आपल्या पिकाच्या लागवड तारखेनुसार आणि आपल्याकडील हवामानाचा विचार करून त्याचप्रमाणे आपल्याकडील पंपाचा प्रवाह, बसविलेला ठिबक सिंचन संच, त्याच्यामधून ताशी मिळणारा प्रवाह या सर्व बाबी विचारात घेऊन कंपनीकडून पिकास दररोज / एक दिवसाआड किती पाणी द्यावे, संच किती वेळ चालवावा याबद्दलचा तक्ता तयार करून घ्यावा. त्यानुसार ठिबक सिंचन संच चालवावा.
 • साधारणपणे ठोकताळा म्हणून उन्हाळ्यात दरदिवशी ३ तास, हिवाळ्यात २ तास आणि पावसाळ्यात पाऊसमान बघून १ ते १.५ तास ठिबक सिंचन संच चालवावा. 
 • ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन  शेतकऱ्याकडून घडणाऱ्या बाबी  शेतकरी आजही सर्व खते ठिबकमधून देत नाहीत. बहुतांश शेतकरी ठिबकमधून फक्त नत्र खत म्हणजे युरिया देतात.  तांत्रिकदृष्ट्या योग्य बाबी

 •  पाण्यामध्ये विरघळणारी / द्रवरूप खते ठिबकमधून पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार व गरजेप्रमाणे दिल्यास खतांचा कार्यक्षम वापर होतो. खतमात्रेत ३० टक्के बचत होते. 
 •  नत्रासाठी युरिया, स्फुरदासाठी फॉस्फरिक आम्ल किंवा मोनोअमोनियम फॉस्फेट (१२:६१:०) आणि पालाशसाठी पांढऱ्या रंगाचे म्युरेट ऑफ पोटॅश यांचा वापर करावा. 
 • सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबक सिंचन पद्धतीतून देणे फायदेशीर आहे. पिकाला दररोज अथवा एकदिवसाआड खते ठिबकमधून देणे खूप फायदेशीर असते. 
 • आपल्या पिकासाठी कोणती खते, कधी व किती प्रमाणात द्यावीत याबद्दलचा तक्ता कंपनीकडून तयार करून घ्यावा. त्याप्रमाणेच खते द्यावीत.
 • ठिबक सिंचन संचाची देखभाल  शेतकऱ्याकडून घडणाऱ्या बाबी बरेच शेतकरी ठिबक सिंचन संचाची देखभाल वेळेवर व योग्य प्रकारे करत नसल्याने ठिबक सिंचनातील ड्रीपर बंद होऊन सर्व ठिकाणी शेतात एकसमान पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध न झाल्याने पिकाचे उत्पादन घटते.  तांत्रिकदृष्ट्या योग्य बाबी ठिबक सिंचन संच कायमस्वरूपी योग्य दाबावर कार्यक्षमरीत्या चालण्यासाठी खालील देखभाल वेळेवर करावी.

 • गाळण यंत्रणा स्वच्छ करणे : मीडिया फिल्टर, स्क्रीन फिल्टर / डिस्क फिल्टर दररोज साफ करावा.
 • ठिबक सिंचन १.५ किलोग्रॅम / सेंमी वर्ग दाबावर चालवावा. लॅटरलच्या शेवटच्या ड्रीपरवर १ किलोग्रॅम / सेंमी वर्ग एवढा दाब असणे जरुरीचे आहे.
 • आठवड्यातून एकदा सबमेन वरील फ्लॅश व्हॉल्व्ह खोलून सबमेन साफ करावी. आठवड्यातून एकदा लॅटरल / लहान जलवाहिन्या शेवटच्या तोंडाचे एन्ड कॅप काढून नेहमीपेक्षा दीडपट ते दुप्पट दाबाच्या पाण्याने फ्लश कराव्यात.सहा महिन्यांनी बंद पडलेल्या तोट्या एक टक्का आम्लाच्या पाण्याने साफ कराव्यात. 
 • जैविक कारणाने तोट्या बंद पडल्या असतील, तर सहा महिन्यांतून एकदा क्लोरिनची प्रक्रिया करावी. 
 • लहान जलवाहिन्यात शेवाळाची वाढ होत असेल तर मोरचुदाची प्रक्रिया करावी.  पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास आम्ल प्रक्रिया करणे जरुरीचे असते. आम्ल उपचारासाठी सल्फ्युरिक ॲसिड  (६५%), हायड्रोक्लोरिक ॲसिड (३५%), नायट्रिक ॲसिड (८५%) फॉस्फरिक ॲसिड  (८५%)  यापैकी एका आम्लाचा वापर करावा.  
 • जर पाण्यात लोहाचे प्रमाण ०.५ पीपीएमपेक्षा जास्त असेल, तर फॉस्फरिक ॲसिडचा वापर टाळावा.
 • गुंतवणुकीवर मोबदला  शेतकऱ्याकडून घडणाऱ्या बाबी गुणवत्तापूर्ण  ठिबक सिंचन संच बसवला जात नाही. तो अपेक्षित कालावधी योग्य प्रकारे चालत नसल्याने नुकसान होते.  तांत्रिकदृष्ट्या योग्य बाबी आयएसआय मार्क असणारे ठिबक सिंचन साहित्य घ्यावे. त्यामुळे कमीत कमी सात वर्षे ठिबक सिंचन संच व्यवस्थितपणे कार्यरत राहील.  - अरुण देशमुख,  ९५४५४५६९०२ (सह सरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा.लि. पुणे)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com