दूषित अन्नापासून सावध राहा...

म्यूकरमायकोसिस दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. एखाद्या आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या किंवा मधुमेह किंवा काही इम्यूनोसप्रेसंट औषध घेणाऱ्या व्यक्तीमध्ये हे संक्रमण बहुतेक वेळा उद्‌भवते, म्हणून कोरोनातून बरे होत आलेल्या रुग्णांमध्ये हा संसर्ग प्रकर्षाने आढळत आहे.
Wash fruits and vegetables thoroughly.
Wash fruits and vegetables thoroughly.

म्यूकरमायकोसिस दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. याला पूर्वी झिगॉमायकोसिस असे म्हटले जायचे. हा संसर्ग म्यूकरमायसाइट्स नावाच्या मोल्डच्या एका ग्रुपमुळे होतो. ही बुरशी तुलनेने दुर्मीळ असली तरी अत्यंत गंभीर आहे. या कुटुंबातील बुरशी माती, दुग्धजन्य पदार्थ, ड्रायफ्रूट, सोयाबीन, फळ आणि भाज्या यांच्याशी संबंधित आहे. जर एखाद्या आजारामुळे किंवा आरोग्याच्या स्थितीमुळे  रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या किंवा मधुमेह किंवा काही इम्यूनोसप्रेसंट औषध घेणाऱ्या व्यक्तीमध्ये हे संक्रमण बहुतेक वेळा उद्‌भवते, म्हणून कोरोनातून बरे होत आलेल्या रुग्णांमध्ये हा संसर्ग प्रकर्षाने आढळत आहे. म्यूकरमायकोसिस कारणे आणि लक्षणे

 • आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात म्यूकरमायकोसिस विकसित होऊ शकतो. या संसर्गात ताप, डोकेदुखी, बंद नाक, सायनस वेदना,अचानक दृष्टी कमी होणे, दातदुखी, चेहऱ्यावरील सूज, नाकाच्या आतील भागावर व टाळूवर काळे डाग /चट्टा येणे ही लक्षणे आढळतात.  
 • म्यूकरमायकोसिसचे जंतू शरीरात श्वासामार्फत, अन्नाच्या माध्यमातून किंवा जखमांमधून  शिरकाव करतात. 
 • प्रादुर्भाव हा व्यक्तीच्या रोगप्रतिकारकशक्तीवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक कोरोना बाधित व्यक्ती ही म्युकरमायकोसिसने बाधित होईल असे नाही.
 • म्यूकरमायकोसिसची घातकता 

 • यामुळे शरीरातील सॉफ्ट टिश्‍यू आणि मुख्य अवयव उदा.  फुफ्फुस, मेंदू, टाळू, आतडे, नाक/सायनस, डोळे, जबडा इ. बाधित होतात.
 • लवकर उपचार मिळाले नाही तर हा संसर्ग शरीरात पसरतो. त्यामुळे  बाधित भाग काढून टाकणे  (डोळा, टाळू, जबडा) किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो.
 • अन्नातून प्रादुर्भाव

 • ही बुरशी प्रामुख्याने डेअरी पदार्थ (चीज, योगर्ट इ.), बेकरी पदार्थ, सोयाबीन तसेच फळ व भाजीपाल्यामध्ये आढळते. 
 • ज्याप्रमाणे मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, गर्दी टाळणे, लसीकरण या बाबी कोरोना आजाराला प्रतिबंध करू शकतात. त्याच प्रमाणे अन्न सुरक्षा हीच आपल्या आरोग्याची सुरक्षा असणार आहे.  
 • घरी आणलेली फळे व भाज्या मीठ किंवा सोड्याच्या पाण्यात धुवाव्यात. 
 • भाजी, फळांवर बुरशी किंवा काळे/हिरवे ठिपके आढळल्यास त्या खाण्यासाठी वापरू नयेत. 
 • बागकाम,भाजी घेताना  किंवा हाताला जखम असल्यास हॅन्ड ग्लोजचा वापर करावा.
 • ब्रेडवर बुरशी आढळल्यास आहारात वापरू नयेत. टाकून द्यावेत. 
 • खाद्य पदार्थांवर तंतुमय बुरशी किंवा कापूस सारखी दिसणारी बुरशी आढळल्यास ते  वापरू नयेत.
 • अन्न साठवणूक व प्रक्रिया करण्यासाठी लागणारी जागा ही स्वच्छ, निर्जंतुक असावी.
 • अन्न प्रक्रिया किंवा हाताळणारी व्यक्ती निरोगी असावी तसेच वैयक्तिक स्वच्छता अवलंबिणारी असावी. 
 • शिळे अन्न खाऊ नये. 
 • - श्रुतिका देव,  ९४०४१३९२६६ (एम. आय. टी. अन्नतंत्र महाविद्यालय, औरंगाबाद)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com