नारळावरील रूगोज चक्राकार पांढरी माशीचे जैविक नियंत्रण

​रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून नारळ, केळी, आंबा, पेरू इ. फळ झाडांवर मुख्यतः दिसून येते. ही कीड पानातील अन्नद्रव्य व पाणी शोषते. त्यासोबत तिच्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या चिकट पातळ पदार्थांवर काळ्या रंगाच्या कॅप्नोडिअम बुरशीची वाढ होते. त्यामुळे पाने काळी पडून निस्तेज होतात.
Biological control of Rugos circular whitefly on coconut
Biological control of Rugos circular whitefly on coconut

​रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून नारळ, केळी, आंबा, पेरू इ. फळ झाडांवर मुख्यतः दिसून येते. ही कीड पानातील अन्नद्रव्य व पाणी शोषते. त्यासोबत तिच्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या चिकट पातळ पदार्थांवर काळ्या रंगाच्या कॅप्नोडिअम बुरशीची वाढ होते. त्यामुळे पाने काळी पडून निस्तेज होतात. जागतिकीकरण आणि खुल्या कृषी व्यापारामुळे शेतमालाची आयात-निर्यात जगभर होत आहे. कीड व रोग यांचे वहन रोखण्यासाठी कायदे असले तरी अपघाताने काही किडी व रोग परदेशातून भारतात आल्याची उदाहरणे आहेत. त्यापैकी एक म्हणजेच नारळावरील रूगोज चक्राकार पांढरी माशी होय. त्यासाठी जैविक नियंत्रण पहिल्या टप्प्यात उपयोगी व प्रभावी ठरते. रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून नारळ, केळी, आंबा, पेरू इ. फळ झाडांवर मुख्यतः दिसून येते. ही कीड पानातील अन्नद्रव्य व पाणी शोषते. त्यासोबत तिच्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या चिकट पातळ पदार्थांवर काळ्या रंगाच्या कॅप्नोडिअम बुरशीची वाढ होते. त्यामुळे पाने काळी पडून निस्तेज होतात. २००४ मध्ये मध्य अमेरिकेतील बेलीज प्रांतात नारळावर रूगोज चक्राकार पांढऱ्या माशीची नोंद मार्टिन या शास्त्रज्ञाने केली. त्यानंतर २०१६ या वर्षी भारतात केरळ राज्यात प्रथम नोंद झाली. त्यानंतर भारतातील अन्य राज्यांमध्ये प्रामुख्याने केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात तिची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, कोल्हापूर, सातारा, धुळे, नगर व नाशिक जिल्ह्यात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही नवीन कीड आक्रमक असून, तिचा जीवनक्रम आणि नियंत्रण उपाययोजनांची माहिती घेऊ. जीवनक्रम काही शास्त्रज्ञांनी २७ अंश सेल्सिअस तापमानास चक्राकार पांढऱ्या माशीचा ३७ दिवसांचा जीवनक्रम नोंदविलेला आहे. जीवनक्रमामध्ये अंडी, पिल्ले आणि प्रौढ अशा एकूण तीन अवस्था असतात. पिले चार अवस्थेतून प्रौढ होतात. नारळावरील या किडीचे प्रौढ हे अन्य प्रजातीच्या पांढरी माशीपेक्षा तिप्पट (म्हणजे अंदाजे २.५ मिलिमीटर एवढे) मोठे असतात.  प्रौढ पाठीवरील पंखावर भुरकट तपकिरी रंगाचे पट्टे असतात. नरमाशीच्या पाठीमागील भागाच्या शेवटी लांब काटेदार रचना असते. ही अवस्था २० ते २१ दिवसांची असते. कोषावस्थेत  हा प्रौढ इंग्रजी टी (T) आकाराचे छिद्रे पाडून बाहेर येतो. या किडीची मादी नारळाच्या पानाच्या खालील बाजूस चक्राकार अगर नागमोडी आकारात अंडी घालते. ती पांढऱ्या मेणासारख्या पदार्थाने झाकलेली असतात.  अंडी लंब वर्तुळाकार क्रीमसारख्या पांढरट किंवा पिवळ्या रंगाची असतात. या किडीची मादी कधीकधी वनस्पती ऐवजी दारे, खिडक्या, भिंती अशा ठिकाणी अंडी घालते. एका चक्राकार किंवा नागमोडी  पुंजक्यामध्ये  २८ ते ३० अंडी असतात. अंडी अवस्था ८ ते ९ दिवसांची असते.  पिल्लावस्था चक्राकार पांढरी माशीची वाढ ही चार टप्प्यांमध्ये होते.  प्रथम बाल्यावस्था  तिला रांगती अवस्था किंवा अपरिपक्व अवस्था म्हणतात. अंडी उबल्यानंतर थोडी हालचाल करून त्यांच्या अणकुचीदार तोंडाने पानांमधील अन्न रस शोषतात. रांगती अवस्था रूपांतरित होऊन विकासाच्या टप्प्यामध्ये स्थिर अंडाकृती आणि चपटे होत जातात. प्रथम बाल्यावस्था ही ५ ते ६ दिवसांची असते. प्रथम अवस्था  ही ०.३५ मिलिमीटर लांब व ०.२० मिलिमीटर रुंद असते. पिल्ले ही फिकट पांढरट ते पिवळसर सोनेरी रंगाची असतात. ती दाट कपाशीसारखी, मेणचट लांब धागे तयार करतात. पुढे ती दाट होत जाते.  द्वितीय बाल्यावस्था ही अवस्था अंडाकृती, पारदर्शक आणि पिवळसर रंगाची असते. सुरुवातीला शरीराभोवती पाठीवर पांढरे पांढरट मेणचट आवरण असते. ०.५५ मिलिमीटर लांब व ०.८० मिलिमीटर रुंद असलेली ही अवस्था ५ ते ५.५० दिवसांची असते. तृतीय बाल्यावस्था या पिल्लांचा रंग पिवळसर असून, पृष्ठभागावर प्रचंड पांढरे मेणचट दांडे दिसून येतात. पांढरे मेणाचे दांडे ही उदरामधील मेण निर्मितीग्रंथीतून तयार करतात. ०.९५ मिलिमीटर लांब व ०.८२ मिलिमीटर रुंद अशा अवस्थेचा कालावधी हा साडे सहा दिवसांचा असतो. चतुर्थ बाल्यावस्था या अवस्थेतील पिल्ले ही गतिहीन आणि पिवळसर रंगाची असतात. शरीरावर भरपूर प्रमाणात पांढरट मेणचट दांडे असतात. ही अवस्था साडे दहा दिवसांची असून, १.२४ मिलिमीटर लांब व १ मिलिमीटर रुंद असते. अशाप्रकारे रूगोज पांढरी माशीचा जीवन क्रम हा ३६ ते ३८ दिवसांचा असतो. नियंत्रण उपाय या चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसत असला तरी अद्याप आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी आहे. ज्या झाडांवर चक्राकार पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झालेला आहे, अशा माशीवर विविध प्रकारचे परभक्षी (म्हणजेच अपर्टोक्रायसा) व परभक्षी कोळी, परभक्षी भुंगेरे तसेच परोपजीवी कीटक (म्हणजेच येनक्रायशिया, अपेंटलीस, ब्रेकॉन इ.) वाढत असल्याचे अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण योजनेमधील शास्त्रज्ञ डॉ. बी. ए. बडे आणि डॉ. एस. ए. मोरे यांच्या सर्वेक्षणांमध्ये दिसून आले आहे. या मित्रकिटकांच्या संवर्धनासाठी रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या या योजनेमार्फत आणखी परभक्षी व परोपजीवी कीटक उपलब्ध करण्यात येत आहेत. प्रादुर्भावग्रस्त झाडावर कृषी महाविद्यालय, पुणे व पुणे शहराच्या आसपास नारळाच्या झाडावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी ते सोडण्यात आले आहेत.  किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास आणि मित्र कीटक आढळलेले नसल्यास पुढील उपाययोजना कराव्यात. 

 • या झाडांवर सर्वेक्षणासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत.
 • प्रादुर्भाव जास्त दिसून येताच फक्त पाण्याची फवारणी केली तरी किडींची संख्या कमी होते. 
 • आवश्यकता भासल्यास लेकॅनीसिलियम लेकॅनी किंवा मेटाऱ्हायझीम ॲनिसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. 
 • पानांवरील काळी बुरशी नष्ट करण्यासाठी स्टार्च सोल्यूशन (१%) अधिक चांगल्या दर्जाचे सरफॅक्टंट शिफारसानुसार फवारणी केल्यास प्रादुर्भाव कमी होतो.
 • किडीचा प्रादुर्भाव असताना योग्य प्रकारे काळजी घेतल्यास चक्राकार पांढरी माशी सहजपणे नियंत्रणात आणणे शक्य आहे. 
 • - डॉ. बी. ए. बडे,  ९४२३०५०४५८ (डॉ. बडे, डॉ. मोरे  हे  अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण योजना, कृषी महाविद्यालय, पुणे येथे कीटकशास्त्रज्ञ, तर डॉ. पाटील हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे किटकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com