शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व्यवसाय परवाने

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व्यवसाय परवाने घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन संगणक प्रणाली कार्यान्वित झाली आहे.
The farmer company needs a license to do business.
The farmer company needs a license to do business.

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व्यवसाय परवाने घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली  आहे. त्यासाठी ऑनलाइन संगणक प्रणाली कार्यान्वित झाली आहे.  राज्यात पर्यायी बाजार व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने सहकारा सोबतच उत्पादक कंपनी कायद्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसोबतच कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी निगडित प्रत्येक घटक शेतकरी उत्पादक कंपनी नि‍र्मिती करण्यात अग्रेसर आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या चळवळीस बळकटीकरणाचे साहाय्य होत आहे. नि‍र्मिती झालेल्या शेतकरी कंपन्या प्रामुख्याने व्यवसायाची कास धरण्यासाठी शासकीय योजनांचे साहाय्य घेत आहेत. परंतु संपूर्णपणे व्यवसायात उतरण्याच्या अनुषंगाने त्यांचे मार्फत पूर्ण तयारी झालेली नसल्याने निदर्शनास येत आहे. राज्यातील विविध प्रकल्पांच्या माध्यमातून यापूर्वी शेतकरी कंपन्यांनी व्यवसायात उतरण्याच्यादृष्टीने कृषी व पणन यंत्रणेमार्फत प्रयत्न करण्यात आले होते. परंतु अद्यापही राज्यात स्थापित झालेल्या शेतकरी कंपन्या  व्यवसाय उभारण्याच्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.  आवश्यक परवाने

 • शेतकरी कंपन्यांना विक्री व्यवस्थेत उतरण्याच्या अनुषंगाने प्रामुख्याने  थेट पणन  खासगी बाजार  सिंगल लायसन   यापैकी एक परवाना घेण्याची आवश्यकता असते. 
 • महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ५ (डी) व नियम १९६७ मधील ‍ नियम ४ (बी) नुसार थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करण्यासाठी थेट पणन परवाना व नियम ४ (सी) नुसार खासगी बाजाराचा परवाना पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडून दिले जाते. सदर परवाना घेण्याकरिता विहित नमुन्यात अर्ज पणन संचालनालय कार्यालयामध्ये सादर करावा लागतो.
 •  लायसन घेण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परवाना घेण्याबाबतची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन संगणक प्रणाली कार्यान्वित झाली आहे. 
 • ऑनलाइन अर्ज व त्याअनुषंगाने लागणारी आवश्यक कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड/सादर करावीत. परवाना घेण्यासाठी www.dom.msamb.com या संकेतस्थळास भेट देऊन अर्ज करण्याची आवश्यकता आहे.
 • थेट पणन अर्ज ऑनलाइन सादर करण्याकरिता मार्गदर्शक सूचना थेट विपणन परवान्यासाठी पात्रता एका किंवा अनेक बाजार कार्यक्षेत्रामधून शेतकऱ्यांकडून थेट शेतीमाल खरेदी करू इच्छिणारी व्यक्ती, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन इ. थेट पणन परवाना मिळविण्यासाठी पात्र आहे.

 • www.msamb.com या वेबसाइटच्या होम पेजवर  Directorate of  Marketing या पर्यायांतर्गत थेट पणन (Direct Marketing) लिंकवर क्लिक करावे. किंवा
 • https://mahapanan.maharashtra.gov.in  या वेबसाइटच्या होमपेजवर online License  या पर्यायांतर्गत थेट पणन (Direct Marketing या लिंकवर क्लिक करावे.      
 • नवीन अर्ज करण्यासाठी प्रथम New Registration या बटणावर  क्लिक करावे. जर यापूर्वी Registration  केलेले असेल तर यूजरनेम व पासवर्डचा वापर करून लॉगीन करावे.
 • रजिस्ट्रेशन करताना लायसन टाइप या पर्यायांमधून ज्यासाठी लायसन्स घ्यावयाचे आहे तो पर्याय निवडावा. त्यानंतर Application Category, Name, Address, State, District, Contact Person, PAN No., Adhar No., Mobile No., E-Mail ID, Login इत्यादी माहिती अचूक भरावी व सादर करण्यासाठी  submit या बटणावर क्लिक 
 • करावे.
 • रजिस्ट्रेशन केल्यानंतर पडताळणीसाठी यूजरच्या मोबाईलवर त्वरित OTP (One Time Password) SMS द्वारे पाठविला जाईल.
 • संगणकाच्या स्कीनवर एक नवीन विंडो दिसेल. यामध्ये SMS द्वारे  प्राप्त झालेला OTP टाकावा.
 • अर्जदाराची  पडताळणी झाल्यावर अर्जधारकास त्याने नोंदविलेल्या मोबाईलवर SMS द्वारे यूजरनेम व पासवर्ड पाठविला जाईल. 
 • SMS द्वारे आलेला यूजरनेम व पासवर्ड वापरून लॉगिन करावे, प्रथम लॉगिन केल्यानंतर पासवर्ड बदलणे अनिवार्य आहे.
 • यूजरनेम व नवीन पासवर्डचा वापर करून लॉगिन करावे व ऑनलाइन अर्ज सादर करावा.
 • थेट पणन परवाना अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे  अ) थेट पणन लायसन्ससाठी पात्रता   थेट शेतकऱ्याकडून शेतीमाल खरेदी करू इच्छिणारी कोणतीही व्यक्ती.  ब) थेट पणन लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रे 

 • विहित नमुन्यातील अर्ज - फॉर्म अ. 
 • विहित नमुन्यातील - फॉर्म ब. 
 • बँक गॅरेंटी संपूर्ण राज्य किंवा एका पेक्षा जास्त महसूल विभागासाठी ५ लाख रुपये, कोकण, पुणे, नाशिक करिता ५ लाख रुपये, नागपूर ३ लाख रुपये व अमरावती व नागपूर करिता २ लाख रुपये (बँक गॅरेंटी व फीमध्ये सूट मिळणेबाबत शासन आदेश पहावा) 
 • पतदारी प्रमाणपत्र (Solvency Certificate) नमुना ऑनलाइन उपलब्ध. 
 • \घोषणापत्र (२०० रुपये स्टॅम्प पेपरवर नोटराइजसह दोन साथीदारांच्या स्वाक्षऱ्या) 
 • खासगी बाजारामध्ये संचालक / भागीदार नसलेबाबत प्रतिज्ञापत्र २०० रुपये स्टॅम्प पेपरवर नोटराइजसह दोन साथीदारांच्या स्वाक्षऱ्या. 
 • व्यवसाय संबंधी मार्गदर्शक तत्त्वे (Operation and Working Guidelines) ऑनलाइन उपलब्ध
 • कंपनीचे (घटनापत्र, नोंदणी प्रमाणपत्र, संचालक यादी पत्त्यासह, पॅन कार्ड, सहीचे अधिकाराबाबत ठराव) 
 • प्रोप्रायटर/ शेतकरी उत्पादक कंपनी/ सहकारी संस्था/ महिला बचत गट (वर्तणुकीचा दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड, M.S.E.B. बिल, निवडणूक ओळखपत्र) 
 • मागील तीन वर्षांचे आयकर परतावा (Income Tax Returns). 
 • प्रकल्प अहवाल (फोटोसहित). 
 • संपर्कात असणाऱया शेतकऱ्यांची यादी. 
 • लायसन्स फी भरणा केलेले चलन : विभाग कार्यक्षेत्रासाठी ५०० रुपये (प्रति विभाग ५०० रुपये), संपूर्ण राज्य कार्यक्षेत्रासाठी १००० रुपये 
 • कार्यान्वयन आणि कामकाजातील मार्गदर्शक तत्त्वे - थेट पणन कंपनी संकलन केंद्रांवर, ओट्यावर आणि पुरवठा केंद्रामध्ये (प्रपत्र ब आणि अर्ज क मध्ये सादर केल्यानुसार) कृषी उत्पादनांच्या थेट विक्रीचे संचालन करणारी मार्गदर्शक तत्त्वे वेळोवेळी सुधारित केली जाऊ शकतात.

 • प्रत्येक संकलन केंद्र आणि प्लॅटफॅार्म पुरवठा केंद्र जेथे थेट विक्री केली जाते. (यापुढे संकलन केंद्र म्हणून संबोधले जाईल) अशा ठिकाणी शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांनी आणलेली  उत्पादने प्राप्त करण्यासाठी खास दालन असेल. थेट विक्रीसाठी कंपनी मोबाईल व्हॅन सुविधादेखील वापरू शकता.
 • शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी किंवा खरेदी करण्याच्या हेतूने उघडलेली संकलन केंद्र केवळ शेतीमालाची खरेदी आणि विक्री संबंधीतच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडली जाऊ शकते.
 • संकलन केंद्राच्या कामकाजाची वेळ आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी ५.०० ते रात्री १० पर्यंत असेल. या मध्ये कंपनीने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या आणि संबंधित यंत्रणांकडून आवश्यक परवानगी घेतल्यानंतरच, बदल करता येईल.
 • संकलन केंद्रात विविध शेतीमालाबाबत दर्जा आणि जातीनुसार बाजार दरांची सूची प्रदर्शित करावी लागते.
 • कोणत्याही घोषित शेतीमालाबाबत संकलन केंद्रामध्ये बनवलेले दरपत्रक नेहमी त्याच्या कंटेनर किंवा पॅकेजिंगशिवाय असते.
 • विक्रेता किंवा शेतकरी, जो आपला शेतीमाल कंपनीस विक्री करू इच्छित असेल, तो या संकलन केंद्रामध्ये शेतीमाल आणू शकतो.
 • कंपनीचे शेतकरी शेतीमालाचा दर्जा मूल्यांकन करत, जाहीर केलेल्या दर संगतीनुसार, विक्रेत्याला खरेदी दर स्पष्ट करतात.
 • विक्रेत्याने हमी देताच, वजन आणि माप नियमन यंत्रणेद्वारे मान्यताप्राप्त वजन व माप यंत्राद्वारे विक्रेत्याच्या समक्ष वजन व मापे केली जाते.
 • यानंतर खाली दिलेल्या नमुन्यानुसार पावती बनवावी लागते. यामध्ये सदर विक्रेत्याकडून खरेदी केलेल्या शेतीमालाची माहिती (दरासह)  द्यावी लागते. या पावतीची एक प्रत वजन माप पावतीसह कंपनी आपल्याकडे ठेवते आणि अशीच एक प्रत विक्रेता किंवा शेतकऱ्याला  देते.
 • - प्रशांत चासकर,  ९९७०३६४१३० (राज्य कृषी व्यवसाय व पणन तज्ञ,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पुणे)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com