थंडीचा केळी बागेवर होणारा परिणाम अन् उपाययोजना

सध्या मृग बाग लागवड केळफूल पडण्याच्या अवस्थेत, तर कांदेबाग मुख्य वाढीच्या अवस्थेत आहे. केळी पिकाच्या उत्तम वाढ व उत्पादनासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तापमान १२ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास त्याचा केळी पिकावर अनिष्ट परिणाम होतो.
थंडीचा केळी बागेवर होणारा परिणाम अन् उपाययोजना
sigataoka infestation

राज्यातील केळी लागवड क्षेत्रामध्ये तापमान कमी होऊन थंडीमध्ये वाढ झाली आहे. सध्या मृग बाग लागवड केळफूल पडण्याच्या अवस्थेत, तर कांदेबाग मुख्य वाढीच्या अवस्थेत आहे. केळी पिकाच्या उत्तम वाढ व उत्पादनासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तापमान १२ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास त्याचा केळी पिकावर अनिष्ट परिणाम होतो. थंडीचा होणारा परिणाम  लागवडीवर होणारा परिणाम  ऊतीसंवर्धीत रोपे सेट होण्यासाठी तापमान १६ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान असणे आवश्यक असते. कांदे बाग लागवडीस उशीर होईल तसा थंडी वाढल्याने रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. मुळावर होणारा परिणाम  उतिसंवर्धित रोपांच्या कांदेबाग लागवडीमध्ये कमी तापमानामुळे मुळांची संख्या व लांबी कमी होते. तसेच मुळांच्या अन्न व पाणी शोषणाची कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. पानांच्या वाढीवर होणारा परिणाम 

 • केळीला सरासरी ३ ते ४ पाने प्रति महिना येतात. थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे प्रति महिना २ ते ३ पाने येतात. कमी तापमानामुळे पाने कमी अंतरावर येतात. त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो. अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो. परिणामी, अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊन झाडाची वाढ खुंटते. त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.
 • लहान रोपांच्या कोवळ्या पानांच्या कडा करपतात. केळीचा पोंगा पिवळा होऊन करपतो. मोठ्या रोपांच्या पानावर पिवळसर लांबट चट्टे पडतात. कालांतराने ते काळपट तपकिरी रंगाचे होऊन पान वाळते. मोठ्या रोपांच्या पानांच्या कडा करपतात. सूर्यप्रकाश पडणाऱ्या बाजूने पानांचा रंग पिवळा पडतो आणि विरुद्ध बाजूच्या पानांचा रंग हिरवा राहतो.
 • झाडाच्या वाढीवर होणारा परिणाम  कमी तापमानामुळे झाडाची वाढ मंदावते. वाढ कमी झाल्यामुळे केळफुल बाहेर पडण्यास उशीर लागतो. परिणामी, केळी निसवण्याचा कालावधी लांबतो. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. बुंध्यावर व घडावर होणारा परिणाम  कमी तापमानामुळे केळीच्या बुंध्यावर व घडाच्या दांड्यावर काळपट तपकिरी चट्टे दिसतात. हे चट्टे वाढत जाऊन घड सटकतो. फळवाढीवर होणारा परिणाम  जास्त थंडीमुळे घडांची वाढ मंदावते. परिणामी, घड पक्व होण्याचा कालावधी ३० ते ४० दिवसांनी वाढतो. त्यामुळे घड काढणीस वेळ लागतो. थंडीचा परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना 

 • लागवडीनंतर ४ ते ५ आठवड्यांनी कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून २०० ते २५० मिलि प्रति झाड याप्रमाणे आळवणी करावी.
 • बागेच्या चोहोबाजूंनी वारा संरक्षक व उंच वाढणा­ऱ्या वनस्पतींची २ ते ३ ओळींत दाट लागवड करावी. त्यासाठी गजराज, शेवरी, गिरिपुष्प इत्यादी वनस्पतींचा वापर करावा. त्यामुळे पिकाचे थंड वाऱ्यापासून संरक्षण होते.
 • केळी बागेस युरिया २० ते २५ किलो एकरी अतिरिक्त मात्रा द्यावी. पालाशयुक्त खते वेळापत्रकानुसार द्यावीत.
 • केळीचा पोंगा काळा पडत असेल तर आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी करावी.
 • खोडालगत आच्छादन करावे. जेणेकरून कमी तापमानाचा मुळांच्या वाढीवर परिणाम होणार नाही.
 •  थंडीच्या काळात शक्यतो रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे.
 • बागेमध्ये गहू, भात किंवा मका यांचा भुसा ढीग करून रात्रीच्या वेळी जाळून धूर करावा. त्यामुळे बागेचे तापमान वाढण्यास मदत होईल.
 • करपा रोगनियंत्रण  हा रोग सरकोस्पोरा मुसी बुरशीमुळे होतो. रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे केळीच्या खालील ४ ते ५ पानांवर सुरुवातीला लहान-लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके पडतात. हे ठिपके मोठे होऊन आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो. नियंत्रण :  फवारणी प्रति लिटर पाणी

 • प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मिलि किंवा
 • कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम द्रावणात १ मिलि स्टिकर मिसळावा.
 • १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी
 • (टीप :  ॲग्रेस्को शिफारस आहे.) - डॉ. एस. व्ही. धुतराज, ७५८८६ १२६३२ (केळी संशोधन केंद्र, नांदेड)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com