
शेतकरी- गजेंद्र खोत गाव- टेंभूर्णी ता. जाफ्राबाद जि. जालना एकूण शेती- १४ एकर केसर आंबा - ३.५ एकर (झाडे ५००) माझी एकूण १४ एकर शेती आहे. त्यापैकी ३.५ एकरावर केसर आंबा लागवड आहे. उर्वरीत क्षेत्रामध्ये द्राक्ष २ एकर, चिकू १ एकर आणि सीताफळाची २ एकर यासह पेरू, रामफळ, आवळा, जाभूळ अशा विविध फळपिकांची लागवड आहे. याशिवाय ८ गायींचा गोठा असून त्यात प्रत्येकी ४ गीर आणि देशी गायी आहेत. गायींच्या शेणखत आणि गोमुत्राचा वापर फळबागांमध्ये केला जातो. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ याचे पालन करत सर्व फळपिकांच्या लागवडीतून नंदनवन उभारण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा झाडांना मोहर चांगला लागला असून किमान २० ते २२ टन उत्पादनाची आशा आहे. मी केसर आंब्याची २००२ साली दोन एकरांत १५ बाय २० फूट अंतरावर २०० झाडे आणि २०१० रोजी दीड एकरांत १६ बाय ८ फूट अंतरावर ३०० झाडे लावली. आंबा तज्ज्ञ डॉ.भगवानराव कापसे वेळोवेळी बागेस भेट देऊन मार्गदर्शन करत असतात. त्यानुसार संपूर्ण बागेचे व्यवस्थापन केले जाते. व्यवस्थापनातील बाबी
पुढील महिनाभराचे नियोजन
उत्पादन
रायपनिंग चेंबरची करणार उभारणी ग्राहकांना थेट विक्री केल्यामुळे गतवर्षी सुमारे १५ लाखांचे उत्पन्न मिळाले. थेट विक्रीमुळे अधिक चांगला दर मिळतो. बागेतील आंब्यास जाफ्राबाद, भोकरदन, बुलडाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मागणी वाढत आहे. त्यामुळे यावर्षी घरगुती स्तरावर रायपनिंग चेंबर उभारणी करण्याचा विचार करत आहे. यावर्षी जून-जुलै महिन्यात २ एकरावर अतिघन पद्धतीने केसर आंब्याची लागवड करण्याचे नियोजन आहे. - गजेंद्र खोत : ९१५६४२९५१२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.