द्राक्ष बागेत खत, पाणी व्यवस्थापन

खरडछाटणीनंतर निघालेल्या फुटी जोपर्यंत प्रकाश संश्‍लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्य तयार करण्यास सक्षम होत नाहीत, तोपर्यंत या वेलीमधील शक्ती असणे आवश्यक आहे. त्या करिताच खरडछाटणीच्या वेळी ओलांडा ओला असावा. तसेच त्यावरील काड्या रसरशीत असाव्यात. ही गरज पूर्ण करण्यासाठी विश्रांतीच्या काळात पुढील उपाययोजना कराव्यात.
सामू अल्कलाईन असलेल्या जमिनीत शेणखतात मिसळून गंधकाचा वापर करावा
सामू अल्कलाईन असलेल्या जमिनीत शेणखतात मिसळून गंधकाचा वापर करावा

खरडछाटणीनंतर निघालेल्या फुटी जोपर्यंत प्रकाश संश्‍लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्य तयार करण्यास सक्षम होत नाहीत, तोपर्यंत या वेलीमधील शक्ती असणे आवश्यक आहे. त्या करिताच खरडछाटणीच्या वेळी ओलांडा ओला असावा. तसेच त्यावरील काड्या रसरशीत असाव्यात. ही गरज पूर्ण करण्यासाठी विश्रांतीच्या काळात पुढील उपाययोजना कराव्यात.  फळ काढून झाल्यानंतर साधारणपणे फेब्रुवारी, मार्च महिन्यांत त्या वेलीतील अन्नद्रव्याचा ऱ्हास झाल्याचे दिसून येईल. वेलीवरील साधारणतः ८ ते १० मि.मी. जाड काडीवर ४५० ते ५०० ग्रॅम वजनाचा घड तयार झाला. या घडाच्या विकासात आवश्यक असलेले अन्नद्रव्य एकतर त्या काडीमधून व शेजारील ओलांड्यातून घेतले गेले. त्यामुळेच या वेळी फळकाढणी झाल्यानंतर पाने पिवळी होऊन पिकताना दिसून येतील. खरडछाटणीनंतर निघालेल्या फुटी जोपर्यंत प्रकाश संश्‍लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्य तयार करण्यास सक्षम होत नाहीत, तोपर्यंत या वेलीमधील शक्ती असणे आवश्यक आहे. त्या करिताच खरडछाटणीच्या वेळी ओलांडा ओला असावा. तसेच त्यावरील काड्या रसरशीत असाव्यात. ही गरज पूर्ण करण्यासाठी विश्रांतीच्या काळात पुढील उपाययोजना कराव्यात. 

  • बागेमध्ये फक्त गरजेनुसार पाणी द्यावे. यामुळे काडीवरील उपलब्ध पाने टिकून राहतील. वेलीमधील अन्नद्रव्यांचा साठा वाढेल.
  • विश्रांतीच्या काळात ५ ते ६ हजार लिटर पाणी प्रति एकर प्रति आठवडा पुरेसे होईल. जर तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले असल्यास पाण्याची मात्रा ७००० लिटरपर्यंत वाढवावी. 
  • बागेतील कोठल्याही परिस्थितीत नवीन फूट निघणार नाही, याची काळजी घ्यावी. याकरिता नवीन निघणाऱ्या फुटीचा अंदाज घेऊन पाणी एकतर कमी करावे किंवा बंद करावे.
  • बागेमध्ये १० ते १५ किलो युरिया, २५ ते ३० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १० ते १५ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति एकर १५ ते २० दिवसांतून एकदा खरडछाटणी होईपर्यंत जमिनीतून द्यावे. 
  • द्राक्षवेलीला मोकळे पाणी देण्याचे शक्यतो टाळावे. त्यापेक्षा मुळांच्या कक्षेत पाणी व्यवस्थित मिळेल, याची काळजी घ्यावी.  
  • छाटणीपूर्व तयारी  छाटणीची कार्यवाही ही २० ते २५ दिवस आधीपासून सुरू करावी. यामुळे मजुरांची उपलब्धता, खत, रसायने व पाण्याची उपलब्धता करणे शक्य होईल. बागेत खत आणि पाण्याची गरज  समजून घेण्यासाठी माती व पाणी परीक्षण आवश्यक असते. पुढील उपाययोजना कराव्यात.

  • माती आणि पाणी यांचे नमुने घेणे ः मातीचा नमुना घेतेवेळी तो मागील हंगामातील खते व ठिबकचे पाणी ज्या ठिकाणी पडते, त्यापासून १५ ते २० सेंमी अंतरावरून घ्यावा. ज्या बागेत माती एक सारखी आहे, अशा बागेत वेगवेगळ्या ठिकाणाहून किमान १० ते १२ नमुने प्रति एकर घ्यावेत. ही जमा केलेली माती मिसळून शेवटचा नमुना एक किलो पर्यंत तयार करावा. तो प्रयोगशाळेत पाठवावा.
  • भारी जमिनीत यावेळी भेगा पडलेल्या असून, मुळाच्या कक्षेत हवा खेळती राहत नाही. हलक्या (मुरमाड) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे अन्नद्रव्येही कमी शोषली जातात. त्यामुळे मुळांचा विकास अपेक्षेइतका होत नाही. घट्ट झालेल्या जमिनीत पालाश, स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण वेलीकडून कमी होते. जमीन घट्ट झाल्यामुळे ठिबकचे पाणी पडत असलेल्या ठिकाणी खाली अन्नद्रव्ये गोळा झालेले असते. त्यामुळेच अन्नद्रव्याचा असमतोल तयार होतो. हे टाळण्याकरिता छाटणीच्या २० ते २५ दिवसाआधी बोद व्यवस्थितरीत्या फोडून घ्यावा. डिस्क हॅरो किंवा पॉवर टिलरच्या वापराद्वारे बोद मोकळा करता येईल. यानंतर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास हलक्या व भारी दोन्ही प्रकारच्या जमिनीत अन्नद्रव्यांचा समतोल राखणे शक्य होईल. 
  • बऱ्याचशा जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त दिसते. तसेच जमिनीचा सामू अल्कलाईन दिसून येतो. अशा ठिकाणी ५० किलो गंधक प्रति एकर शेणखतासोबत व्यवस्थित मिसळून वापरावे. सल्फर शेणखतात मिसळल्यास त्याची कार्य करण्याची क्षमता वाढते. 
  • ज्या बागेमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी मुळांच्या कक्षेतून क्षार बाहेर काढण्यासाठी जिप्समचा वापर महत्त्वाचा ठरेल. काही परिस्थितीत जमिनीत क्षार व चुनखडी दोन्ही असल्यास फक्त गंधकाचा वापर पुरेसा होईल. 
  • शेणखत किंवा कंपोस्ट किंवा अन्य सेंद्रिय खते (हिरवळीच्या खतासह) १० टन प्रति एकर या प्रमाणे खरड छाटणीच्या १२ ते १५ दिवसापूर्वी टाकावे. या सेंद्रिय घटकाच्या वापरामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
  • सिंगल सुपर फॉस्फेटची उपलब्धता करण्यासाठी २०० किलो शेणखतात मिसळून वापरावे. यामुळे स्फुरद उचलण्याची क्षमता वाढेल. 
  • फुटी निघेपर्यंत शक्यतो अमोनिअम सल्फेट किंवा युरियाचा जमिनीतून वापर टाळावा. यामुळे निचरा होण्याची शक्यता कमी होईल. अशा निचऱ्यामुळे भूजल प्रदूषण उद्‍भवू शकते. 
  • वाढीची अवस्था पाणी व्यवस्थापन

  • ज्या बागेत सिंचन पाण्याची दर्जा १ डेसिसायमन पेक्षा कमी  (ds/m) असल्यास, अशा ठिकाणी १०,८८० ते १४,९६० लिटर प्रति एकर प्रति दिवस ठिबकद्वारे पाण्याची उपलब्धता करावी. 
  • पाण्याची प्रत १.१ ते २ डेसिसायमन (ds/m) असल्यास १३,६०० ते १६,१५० लिटर पाणी प्रति एकर प्रति दिवसाची उपलब्धता करावी.
  • ज्या बागेत फुटींची वाढ जोमात असल्याचे अनुभवास येते, वाढ नियंत्रणात येईपर्यंत पाणी कमी करावे किंवा बंद करावे. 
  • बागेमध्ये पाऊस झालेला असल्यास जमीन वाफसा स्थितीत येईपर्यंत पाणी बंद करावे. 
  • या काळात बोदावर आच्छादन केल्यास मुळांच्या कक्षेत क्षार वाढण्याची शक्यता कमी होईल. बाष्पीभवनामुळे पाणी वर येते वेळी क्षार सोबत घेऊन येते. हे टाळणे आच्छादनामुळे शक्य होते. तसेच पाण्याची १० टक्क्यापर्यंत बचत होते. 
  • ओलांडा शेडनेटने झाकून घेतल्यास एकसारखी फूट निघण्यास मदत होईल. असे केल्याने २० ते २५ टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होईल. शेडनेट वापरामुळे ओलांड्याचे तापमान कमी होऊन भविष्यात ओलांडे डागाळण्याची समस्या कमी होईल. ३ ते ५ पानांच्या अवस्थेनंतर शेडनेट काढून घ्यावे. 
  • शेडनेट उपलब्ध नसल्यास ओलांड्यावर पाण्याची फवारणी दिवसातून दोन वेळा करावी.
  • ज्या बागेत पाण्याची उपलब्धता कमी आहे, अशा ठिकाणी छाटणी होताच एकदा बोद पूर्णपणे भिजवून घ्यावा. त्यानंतर लगेच आच्छादन करून घ्यावे. बोद पूर्ण भिजवल्यामुळे मुळांच्या कक्षेत क्षार एका ठिकाणी जमा होणार नाहीत. अशा परिस्थितीत निघत असलेल्या फुटीवर क्षाराच्या जखमा दिसणार नाहीत. 
  • खत व्यवस्थापन

  • डोळे फुटल्यानंतर ५० किलो युरिया प्रति एकर पाच ते सहा टप्प्यांत वापरावा. 
  • चुनखडी असलेल्या बागेत युरियाचा वापर टाळावा. त्याऐवजी अमोनिअम सल्फेट ८५ किलो प्रति एकर सात ते आठ टप्प्यांत द्यावे. 
  • फुटींची वाढ जोमात होताना असलेल्या ठिकाणी नत्राचा वापर बंद करावा. वाढ नियंत्रणात येण्याची वाट पाहावी. जर पुन्हा वाढ होताना आढळल्यास बागेतील पाणी कमी करावे. ज्या वेळी वाढ थांबलेली दिसून येते, त्या वेळी नत्र किंवा पाण्याचा वापर करावा. 
  • माती परीक्षणाच्या अहवालानुसार एकरी झिंक सल्फेट १० किलो, फेरस सल्फेट १० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो ही खते दोन वेळा विभागून पाच ते सात पानांच्या अवस्थेत द्यावीत. 
  • बोरॉनची उपलब्धता ही माती व देठ परीक्षणाच्या अहवालाच्या शिवाय करू नये. 
  • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मॅग्नेशिअम सल्फेट आणि पोटॅशिअम सल्फेट दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी (प्रत्येकी) या प्रमाणे फवारणी वाढीच्या अवस्थेत करून घ्यावी. 
  • सूक्ष्म घडनिर्मितीची अवस्था 

  • बागेमध्ये ठिबकद्वारे ५ ते ६ हजार लिटर पाणी प्रति एकर प्रति दिवस द्यावे. 
  • या अवस्थेत वेलीला ताण बसणे गरजेचे असते. भारी जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे पाण्याचा ताण थोडा लवकर देण्यास सुरू करावे. 
  • मातीच्या परीक्षणाच्या अहवालानुसार, जमिनीत स्फुरदाचे प्रमाण कमी असल्यास  ४५ ते ५० किलो फॉस्फोरिक अॅसिड किंवा २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. 
  • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये फॉस्फोरिक अॅसिडचा वापर फायद्याचा ठरतो.
  • छाटणीच्या ४५ व्या दिवशी देठ परीक्षण करून घ्यावे. यामध्ये वेलीतील अन्नद्रव्यांचे नेमके प्रमाण कळते. यासाठी फुटीच्या तळापासून पाचव्या पानांचे देठ तपासण्यासाठी पाठवावेत. (एकरी १०० ते १२० देठ)
  • मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो प्रति एकर या प्रमाणे दोन ते तीन वेळा विभागून द्यावे. 
  • पाण्याच्या अहवालानुसार, जर पाण्यात सोडिअमचे प्रमाण १०० पीपीएम पेक्षा अधिक असल्यास पाने काळी होण्याची समस्या दिसून येते. 
  • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मॅग्नेशिअम सल्फेट आणि पोटॅशिअम सल्फेट ३ ग्रॅम प्रत्येकी प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  • - डॉ. अजयकुमार उपाध्याय, ०२०-२६९५६०४० (प्रमुख शास्त्रज्ञ, मृदाविभाग,  द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com