द्राक्ष घडांना पेपर लावताना घ्यावयाची काळजी

साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास सुरुवात झाल्यानंतर पेपर लावावा. त्यापूर्वी बागेमध्ये योग्य त्या उपाययोजना करून रोग-कीड नियंत्रित असले पाहिजे. त्यामुळे पुढील काळात कीड, रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते.
द्राक्ष घडांना पेपर लावताना घ्यावयाची काळजी
Thus the paper wraping process should be completed

साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास सुरुवात झाल्यानंतर पेपर लावावा. त्यापूर्वी बागेमध्ये योग्य त्या उपाययोजना करून रोग-कीड नियंत्रित असले पाहिजे. त्यामुळे पुढील काळात कीड, रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते. द्राक्ष हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिसत असले तरी त्याचा उत्पादन खर्च जास्त आहे. त्यातच हवामानासाठी संवेदनशील असल्यामुळे बदलत्या वातावरणात दर्जेदार उत्पादन हे आव्हानात्मक बनत चालले आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्षाचे योग्य आकाराचे मणी, एकसारखा व आकर्षक रंग, गोडीचे योग्य प्रमाण आणि कीड-रोगविरहीत, कीडनाशक अवशेषमुक्त असा घड आवश्यक असतो. या पिकामध्ये सध्या सनबर्निंग आणि पिंकबेरीसारख्या अनेक समस्या वाढत चालल्या आहेत. या समस्या टाळून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्षमण्यामध्ये पाणी उतरण्यास सुरुवात झाल्यानंतर पेपरचे आवरण करणे फायदेशीर ठरू शकते. घडांना पेपर लावण्याआधी करावयाची पूर्वतयारी योग्य अवस्था  साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास सुरुवात झाल्यानंतर पेपर लावावा. त्यापूर्वी बागेमध्ये योग्य त्या उपाययोजना करून रोग-कीड नियंत्रित असले पाहिजे. त्यामुळे पुढील काळात कीड, रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते. घड व मणी विरळणी  निर्यातीसाठी आवश्यक असलेला मण्यांचा आकार, घडाची लांबी, सुटसुटीत व एकसारखेपणा, गोडी इ .मिळण्यासाठी वेलीवरील घडांची संख्या, प्रत्येक घडातील मण्यांची संख्या योग्य असली पाहिजे. त्यासाठी पेपर लावण्याआधी वेलीचे वय, लागवडीचे अंतर, जात इ. घटकांनुसार प्रति वेल घडांची संख्या निर्धारित करावी. एकसारख्या वाढीचे, आकर्षक, कीड रोग विरहित घड ठेवावे. कीड-रोगांचा प्रादुर्भाव असलेले, पानांच्या आड, गर्दीत असलेले, एकसारखा आकार नसलेले जास्तीचे घड काढून टाकावे . खराब, कमी आकाराचे, गर्दी करणारे मणी काढून जातीपरत्वे प्रत्येक घडात मणी संख्या निर्धारित करावी. यामुळे प्रत्येक वेलीवर योग्य घड व मणी संख्या राहून निर्यातक्षम उत्पादन मिळण्यास मदत होईल. काडी व घडांची बांधणी  पेपर लावण्याआधी काड्यांची व घडांची बांधणी करून घ्यावी, त्यामुळे पेपर लावणे सोयीचे होईल. प्रतिबंधात्मक फवारणी  एकदा द्राक्ष बागेत पेपर लावल्यानंतर फवारणी करण्यावर मर्यादा येतात. फवारणीद्वारे वापरलेल्या द्रावणांचा घडांशी संपर्क येत नाही. म्हणून पेपर लावण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक फवारणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रामुख्याने मिलीबग (पिठ्या ढेकूण) या किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. त्यासाठी काढणीपूर्व कालावधीचा विचार करून फवारणी घ्यावी. तसेच व्हर्टीसिलीअम लेकॅनीसारख्या ---- जैविक कीडनाशकांचा वापर शिफारशीनुसार करता येईल. त्याच प्रमाणे द्राक्षामध्ये येणाऱ्या केवडा, भुरी, करपा इ. रोगांच्या नियंत्रणासाठी काढणीपूर्व कालावधी पाहून शिफारशीनुसार योग्य बुरशीनाशकाची फवारणी करावी. ट्रायकोडर्मा व्हिरीडी, बॅसिलस सबटिलीस यासारखी जैविक बुरशीनाशकेही उपयुक्त ठरू शकतात. जैविक रोगनियंत्रणाचा वापर बागेमध्ये योग्य तितकी आर्द्रता असताना केल्यास रासायनिक अवशेषांचे प्रमाण कमी राखतानाच उत्तम रोग नियंत्रण होऊ शकते. अशी सर्व पूर्व तयारी झाल्यानंतर कुशल मजुरांद्वारे घडांना इजा न करता, कमीत कमी हाताळणी करून योग्य अवस्थेत पेपर लावण्याचे काम पूर्ण करावे. ५) नियमित तपासणी ः पेपर लावल्यानंतर ठराविक काळाने प्रातिनिधिक स्वरूपात घडांची मिलीबग, भुरी इ. साठी तपासणी करावी . घडांना पेपर लावण्याचे फायदे 

 • द्राक्ष घडांचे उन्हे व त्यामुळे होणाऱ्या सनबर्निंगसारख्या समस्येपासून संरक्षण होते.
 • घडांचे थंडीपासूनही संरक्षण होते. मण्यांचा योग्य आकार मिळण्यास मदत होते.
 • पिंक बेरी या समस्येपासून मुक्तता मिळते. किंबहुना ही समस्या टाळण्यासाठी हा एकमेव उपाय आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 • घडांचे पक्षी, प्राणी इ. पासून होणारे नुकसान टाळता येते.
 • द्राक्ष काढणी वेळी निर्यातीसाठी आवश्यक मण्यांचा आकार,
 • आकर्षक एकसारखा रंग मिळून निर्यातक्षम मालाचे उत्पादन वाढून अधिक आर्थिक फायदा मिळू शकतो.
 • - प्रा. योगेश भगुरे, ९९२२४१४८७३ (साहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, मविप्र समाज, के.डी.एस.पी. कृषी महाविद्यालय, नाशिक.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com