घरगुती स्तरावर शेंगदाण्यातील अफ्लाटॉक्सिन कमी करणे शक्य

अफ्लाटॉक्सिन या विषारी घटकामुळे शेंगदाण्याला कडवटपणा येतो. या घटकामुळे गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण घरगुती स्तरावर शेंगदाण्यावर प्रक्रियेद्वारे कमी करणे शक्‍य आहे.
Peanuts with aflatoxin fungi.
Peanuts with aflatoxin fungi.

अफ्लाटॉक्सिन या विषारी घटकामुळे शेंगदाण्याला कडवटपणा येतो. या घटकामुळे गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण घरगुती स्तरावर शेंगदाण्यावर प्रक्रियेद्वारे कमी करणे शक्‍य आहे. भुईमुगाची लागवड प्रामुख्याने शेंगदाणा उत्पादनासाठी केली जाते. शेंगदाण्यामध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते. विविध पदार्थांमध्ये शेंगदाणा तेलाचा वापर होतो. असे भाजलेले, तळलेले किंवा उकडलेले शेंगदाणे सर्व जण आवडीने खातात. कधी कधी शेंगदाणे खाताना एखादा दाणा चवीला कडू लागतो. पण तो कशामुळे कडू लागला हे अनेकांना माहिती नसते. शेंगदाण्याला कडवटपणा का येण्याची कारणे खालील लेखात पाहू.  अफ्लाटॉक्सिन म्हणजे काय? 

  • शेंगदाण्याला कडवटपणा येण्यामागे अफ्लाटॉक्सिन नावाचा विषारी घटक कारणीभूत असतो. अफ्लाटॉक्सिनचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी बी१, बी२, जी१ आणि जी२ हे प्रकार जास्त आढळतात. यापैकी अफ्लाटॉक्सिन बी १ हे अधिक घातक मानले जाते. 
  • अफ्लाटॉक्सिन हा विषारी घटक ॲस्परजिलस फ्लेवस आणि ॲस्परजिलस पॅरासीट्स नावाच्या बुरशीमुळे तयार होतो. ही बुरशी सर्वत्र आढळते. विशेषतः उबदार आणि आर्द्र प्रदेशांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
  • अफ्लाटॉक्सिनमुळे विविध गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो.
  • काढणीपूर्व आणि काढणीपश्‍चात हाताळणीदरम्यान या बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.  
  • ...असे करा अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण कमी

  • द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी (जि. पुणे) येथे शेंगदाण्यातील अफ्लाटॉक्सिन हा विषारी घटक कमी करण्याविषयी संशोधन करण्यात आले. येथील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कौशिक बॅनर्जी आणि मनीषा धनशेट्टी यांनी याविषयी संशोधन केले आहे. तसेच याविषयीचा संशोधन प्रबंध एका आंतरराष्ट्रीय नियतकालीकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. 
  •  घरगुती स्तरावर शेंगदाण्यावर प्रक्रिया करून अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण कमी करणे शक्य असल्याचे संशोधनातून दिसून आले. यासाठी शेंगदाणे तळणे, शिजवणे आणि भाजण्याची प्रक्रिया करता येतात. 
  • ही प्रक्रिया करताना शेंगदाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि सायट्रिक आम्ल घालून १८० ते १९० सेल्सिअस तापमानावर अर्धा तास भाजून घ्यावे. यामुळे अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत कमी होते. 
  • अफ्लाटॉक्सिनमुळे भारतातून खाद्यपदार्थांच्या होणाऱ्या निर्यातीवर मोठा परिणाम होत आहे. युरोपीय देशांमध्ये अफ्लाटॉक्सिनची कमाल पातळी ही २ पीपीबी (पार्ट पर बिलियन) तर भारतीय नियमावली नुसार ही मर्यादा १० पीपीबी इतकी आहे. शेंगदाणे, धान्य, वाळलेले अंजीर आणि दुधामध्ये अफ्लॉटॉक्सिनची पातळी ०.५ ते १५ मायक्रो ग्रॅम प्रतिकिलोच्या (µg/kg) श्रेणीमध्ये आहे. अन्न पदार्थातील अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण कमी करण्यासाठी कोडेक्सने विविध सराव संहितादेखील विकसित केल्या आहेत. यामध्ये विविध प्रतिबंधात्मक उपायांचा तपशील आहे. तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) द्वारा अफ्लाटॉक्सिन बी १ साठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एफएसएसएआय मान्यताप्राप्त प्रयोगशाळांना शेंगदाण्यातील अफ्लाटॉक्सिनची चाचणी करणे अनिवार्य आहे.  - ०२० - २६९५६०९१ मनीषा धनशेट्टी,  (वरिष्ठ संशोधन सहायक) कोमल पवार, (प्रकल्प सहाय्यक) कौशिक बॅनर्जी,  (पीएचडी)  (प्रधान शास्त्रज्ञ) (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,  मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com