अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी नॅनो युरिया

नॅनो युरियामध्ये नत्राचे प्रमाण हे वजनाच्या ४ टक्के असते. त्यामुळे पीकवाढीच्या मुख्य अवस्थेमध्ये नॅनो युरियाची फवारणी करून पिकाची ५० टक्के नत्राची गरज भागवता येते.
Nano urea has a good effect on crop growth.
Nano urea has a good effect on crop growth.

नॅनो युरियामध्ये नत्राचे प्रमाण हे वजनाच्या ४ टक्के असते. त्यामुळे पीकवाढीच्या मुख्य अवस्थेमध्ये नॅनो युरियाची फवारणी करून पिकाची ५० टक्के नत्राची गरज भागवता येते.  युरिया नत्रयुक्त खत आहे. शिवाय आपल्या देशातील ५० टक्के जमिनींमध्ये नत्राची कमतरता आहे. त्यामुळे युरियाच्या वापरास पिके चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे युरिया खताचा वापर वाढत गेला. मात्र युरियाची कार्यक्षमता ही साधारणपणे ३० ते ५० टक्के असते. म्हणजेच गेल्या वर्षी देशातील शेतकऱ्यांनी वापरलेल्या युरियापैकी १७५ लाख टन युरिया पिकांना उपलब्ध झाला. तेवढाच तो जमीन, पाणी आणि हवेमध्ये वाया गेला. हे लक्षात घेऊन युरियाचा योग्य प्रकारे वापर करणे आवश्यक आहे.  युरियाच्या अतिवापराचे परिणाम

  • पिकांची फक्त शाखीय वाढ होते. लुसलुशीतपणा वाढतो. त्यामुळे पिकावर कीड, रोगांचा प्रादुर्भाव होतो. पिकाचा नाजूकपणा वाढल्यामुळे ते लोळते. 
  • जमिनीच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. जमिनीतील कर्ब नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणू, गांडुळांची संख्या कमी होते. त्याचा जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. 
  • युरिया खताचा अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते. त्याचा अनिष्ट परिणाम पीक, जनावरे आणि जमिनीवर होतो. 
  • अतिवापरामुळे हवेचे प्रदूषण होते. युरियातील अमाइड नत्राचे रूपांतर नायट्रस ऑक्साइड आणि नायट्रिक ऑक्साइडसारख्या वायूमध्ये होते. हे वायू कार्बन डायऑक्साइडपेक्षा घातक असतात. त्यामुळे पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन वायूच्या थरास छिद्रे पडतात. त्यामुळे वातावरणातील तापमान वाढते. 
  • नॅनो युरियाची कार्यपद्धती 

  • निरोगी पिकाच्या वाढीसाठी सर्वसाधारणपणे ४ टक्के नत्राची गरज असते. पूर्ण वाढ झालेल्या वनस्पतीमध्येसुद्धा जमिनीवरच्या भागामध्ये ४ टक्के नत्र असतो. 
  • नॅनो युरियामध्ये नत्राचे प्रमाण हे वजनाच्या ४ टक्के असते. त्यामुळे पीकवाढीच्या मुख्य अवस्थेमध्ये नॅनो युरियाची फवारणी करून पिकाची ५० टक्के नत्राची गरज भागवता येते. 
  • नॅनो युरिया २ ते ४ मिलि एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नॅनो युरियातील नत्राचे शोषण पानावरील पर्णरंध्रांद्वारे पेशींमध्ये होते. शोषण केलेला नत्र पेशीतील रिक्तिकामध्ये साठवला जातो. पिकाच्या गरजेनुसार अमोनिकल आणि नायट्रेट रूपामध्ये पुरवला जातो. 
  • नॅनो कणांचा आकार, त्यांचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ, पर्णरंध्राद्वारे शोषण, पेशींच्या रिक्तिकामध्ये साठवण आणि गरजेनुसार पुरवठा यामुळे नॅनो युरियाची कार्यक्षमता ८६ टक्क्यांपर्यंत जाते. 
  • नॅनो युरिया जमिनीमधून न देता पिकाला फवारणीद्वारे देत असल्यामुळे युरियाचा जमीन आणि पाण्याशी संबंध येत नाही. कार्यक्षमता चांगली असल्यामुळे हवेमध्ये वाया जात नाही.  त्यामुळे नॅनो युरिया पर्यावरणपूरक आणि शाश्‍वत शेतीसाठी उपयोगी आहे. 
  • भविष्यात नॅनो युरिया सारखी नॅनो स्फुरद, नॅनो पालाश, नॅनो झिंक अशी खते उपलब्ध होतील. त्यामुळे योग्य पद्धतीनेच अन्नद्रव्यांचा वापर होणार आहे. 
  • नॅनो युरिया तंत्रज्ञान देशातील विविध कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र , संशोधन संस्था आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नॅनो युरियाच्या वेगवेगळ्या ९० पिकांवर चाचण्या घेतल्या आहेत. यामध्ये असे दिसून आले, की नॅनो युरियाचा वापर करून पारंपरिक युरियाचा वापर मर्यादित करून आपल्याला योग्य पीक उत्पादन घेता येते. या सर्व चाचण्यांच्या निष्कर्षांवरून भारत सरकारने नॅनो युरियाची खत नियंत्रण कायदा १९८५ नुसार दिनांक २४, फेब्रुवारी, २०२१ रोजी राजपत्र अधिसूचना जारी केली आहे, त्यामुळे कायद्याने नॅनो युरियाचा वापर देशात सुरू होणार आहे.  

  • एखाद्या वस्तूचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ जितके जास्त तितकी त्याची कार्यक्षमता जास्त. या भौतिकशास्त्रातील सिद्धांतावर नॅनो युरियाची निर्मिती करण्यात आली. 
  • नॅनो युरियामध्ये नत्राच्या कणाचा आकार २० ते ५० नॅनोमीटर इतका असतो. १ नॅनोमीटर म्हणजे १ मीटरचा १०० कोटींवा भाग. सध्या आपण वापरत असलेला बारीक युरियाची तुलना नॅनो युरिया सोबत केली तर बारीक युरियाचा एक दाणा हा नॅनो युरियाच्या ५५,००० कणाइतका असतो. नॅनो युरियाचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे बारीक युरियापेक्षा १०,००० पटीने जास्त असते. त्यामुळे त्याची कार्यक्षमता जास्त असते. 
  • - डॉ. एम. एस. पोवार,  ७०२८०१४५४६  (लेखक इफ्को लिमिटेड,  पुणे येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com