नियोजन आंतरपीक पद्धतीचे...

जमिनीचा प्रकार व सरासरी पावसाचा विचार करून योग्य आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. लवकर पक्व होणाऱ्या जातींची निवड करावी. योग्य बियाण्याचे प्रमाण ठेवावे.
Cotton and green gram intercropping method
Cotton and green gram intercropping method

जमिनीचा प्रकार व सरासरी पावसाचा विचार करून योग्य आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. लवकर पक्व होणाऱ्या जातींची निवड करावी. योग्य बियाण्याचे प्रमाण ठेवावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पूर्वमशागतीमध्ये तीन वर्षांतून एकदा खोल नांगरणी करावी. नांगरणीनंतर उताराला आडवी समपातळीत उभी-आडवी वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरवून वखरणी करून मिसळावे. साधारण ६० ते ७० मि.मी पाऊस झाल्यावरच योग्यवेळी पेरणीस सुरुवात करावी. खरीप हंगामात कधी अतिवृष्टी किंवा खंडित वृष्टीचा सामना करावा लागतो. तसेच पीकवाढीस या गोष्टींचा विपरीत परिणाम होतो. तसेच वाढते तापमान, बदलते हवामान, यांचाही पीकवाढीवर परिणाम होतो. त्यामुळे खरीप हंगामातील उत्पादन अधिक शाश्‍वत बनण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब उपयुक्त ठरतो. आंतरपीक पद्धतीचे व्यवस्थापन 

 • जमिनीचा प्रकार व सरासरी पावसाचा विचार करून योग्य आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
 • मध्यम ते मध्यम भारी जमिनीत कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, बाजरी आदी पिकांचा अंतर पिकासाठी निवड करावी.
 • हलक्‍या जमिनीत बाजरी, तीळ एरंडी ही आंतरपिके घ्यावीत.
 • लवकर पक्व होणाऱ्या जातींची निवड करावी. योग्य बियाण्याचे प्रमाण ठेवावे. बीजप्रक्रिया करावी.
 • दोन ओळींत योग्य अंतर ठेवून योग्य पीक संख्या ठेवावी.
 • वेळेवर तणनियंत्रण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड, रोग व्यवस्थापन करावे.
 • शिफारशीत आंतरपीक पद्धती 

  अ.क्र. आंतरपीक ओळीतील पद्धती ओळीचे प्रमाण जमीन अंतर
  हमखास पावसाचा प्रदेश
  कापूस + सोयाबीन १:१ मध्यम ते भारी ९० सें.मी.
   कापूस + मूग/उडीद १:१ मध्यम ते भारी ९० सें.मी.
  सोयाबीन + तूर ४:२ मध्यम ४५सें.मी.
  ज्वारी + तूर ४:२/३:३ मध्यम ते भारी ४५ सें.मी.
  ५    मका + सोयाबीन २:२ मध्यम ते भारी ७५-४५ पट्टा
  मका + मूग १:१ मध्यम ते भारी ६० सें.मी.
    कमी पावसाचा प्रदेश
  ज्वारी + तूर ४:२/३:३ मध्यम ते भारी ४५ सें.मी.
  एरंडी + सोयाबीन १:१ मध्यम ९० सें.मी.
  बाजरी + तूर  २:१/३:३ मध्यम ४५ सें.मी.
  तूर + मूग  १:२/२:४ मध्यम  ९० सें.मी.
  तूर + तीळ १:२ मध्यम ९० सें.मी.
  तूर + सोयाबीन १:२/२:४ मध्यम ९० सें.मी.

  संपर्क ः अक्षय इंझाळकर, ९०२१६३७५७४ (विषय तज्ज्ञ, कृषिविद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२, ता. दारव्हा, जि. यवतमाळ)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com