फळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन

फळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जैविक खतांचा वापर करावा. शिफारशीनुसार वेळेवर योग्य खतांची मात्रा द्यावी. रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. आंतर मशागत, आंतर पिके ,पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.
आंबा कलमाभोवती चर खणून रासायनिक खते द्यावीत. आवश्‍यक आहे. तसेच हिरवळीची खते गाडून सेंद्रिय खताचा पुरवठा करावा
आंबा कलमाभोवती चर खणून रासायनिक खते द्यावीत. आवश्‍यक आहे. तसेच हिरवळीची खते गाडून सेंद्रिय खताचा पुरवठा करावा

फळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जैविक खतांचा वापर करावा. शिफारशीनुसार वेळेवर योग्य खतांची मात्रा द्यावी. रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. आंतर मशागत, आंतर पिके ,पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. आंबा 

 • लालसर पोयट्याची जमीन उत्तम.जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा. चुनखडीचे प्रमाण १० टक्यांपेक्षा कमी असावे.
 • चोपण ,खूप हलकी,कठीण मुरूम,दगडगोटे असणारी जमिनी अयोग्य असते. खूप खोलीच्या,चिकणमाती जास्त असणाऱ्या जमिनीत लागवड टाळावी.
 • पूर्ण वाढ झालेल्या (१० वर्ष वय) आंब्याच्या झाडास ५० किलो शेणखत , १५०० ग्रॅम नत्र , ५०० ग्रॅम स्फुरद आणि ५०० ग्रॅम पालाश म्हणजेच सर्वसाधारणपणे ३ किलो युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
 • सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यात निम्मे नत्र,संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे.उर्वरित नत्र सप्टेंबर महिन्यात द्यावे.
 • चिकू 

 •  विविध प्रकारच्या जमिनीत लागवड शक्य.उत्तम निचरा होणारी जमिनीचा सामू ६ ते ८ पर्यंत असावा. खोल ,वालुकामय पोयटा,रेताड आणि खारवट जमीनसुद्धा चालते.
 • उथळ कडक मुरूम, दगडगोटे आणि चुनखडी असणाऱ्या जमिनीत लागवड करू नये.
 • पूर्ण वाढलेल्या झाडास १०० किलो शेणखत, ६.५० किलो युरिया,१२.५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. जून व सप्टेंबर महिन्यात खते विभागून द्यावीत.
 • नारळ 

 •  पाण्याची उपलब्धता असल्यास सर्व प्रकारच्या जमिनीत नारळाची लागवड करता येते .समुद्रकिनाऱ्याच्या वालुकामय जमीन,नदीकाठच्या रेताड जमीन, डोंगर उताराकडच्या वरकस जमिनीत लागवड करता येते.
 • ५ वर्षाच्या नारळाच्या झाडास ५० किलो शेणखत,२.२५ किलो युरिया,३ किलो सिंगल स्फुरद फॉस्फेट आणि २ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. युरिया व म्युरेट ऑफ पोटॅश ही खते जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात समान हप्त्यात द्यावी. संपूर्ण सिंगल सुपर फॉस्फेट जुने-जुलै महिन्यात द्यावे.
 • पेरू

 • हलकी,वालुकामय पोयटा व चिकण युक्त पोयटा जमीन निवडावी. सामू ४.५ ते ८.२ असावा.
 • पूर्ण वाढलेल्या झाडास ५० किलो शेणखत, ९०० ग्रॅम नत्र,३०० ग्रॅम स्फुरद,३०० ग्रॅम पालाश प्रती झाड द्यावे.यापैकी निम्मे नत्र (४५० ग्रॅम) बहराच्या वेळी व उर्वरित फलधारणेच्या वेळी द्यावे. स्फुरद व पालाश एकाच हप्त्यात बहराच्या वेळेस द्यावे. सर्वसाधारणपणे २ किलो युरिया, २ किलो किलो सिंगल स्फुरद फॉस्फेट आणि १/२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
 • सीताफळ

 • मुरमाड,डोंगराळ जमीन, हलकी ते भारी जमिनीत लागवड करावी.
 • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.
 • सीताफळाच्या पूर्ण वाढलेल्या झाडास (वर्ष ५) सर्वसाधारणपणे १/२ किलो युरिया, ८०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि २०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश जून-जुलै महिन्यात द्यावे.उर्वरित नत्राची अर्धी मात्रा पावसाचा अंदाज घेऊन पहिल्या मात्रेनंतर एक महिन्यांनी किंवा फुलोरा धरताना द्यावी.
 • बोर

 • सर्व प्रकारच्या जमिनीत,अत्यंत हलक्या,मुरमाड,डोंगर उताराच्या जमिनीपासून ते रेताड वालुकामय गाळाच्या पोयटायुक्त खोल,कसदार ,भारी जमिनीत योग्य निचरा असल्यास पीक चांगले येते.
 • पूर्ण वाढलेल्या झाडास ५० किलो शेणखत, ५५० ग्रॅम युरिया, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश जून-जुलै मध्ये द्यावे.अर्धे नत्र फळधारणा सुरु झाल्यावर ऑगस्ट –सप्टेंबर महिन्यात द्यावे.
 • अंजीर

 • अंजीर लागवडीसाठी हलकी ते मध्यम पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते.जमिनीची खोली ६० ते ९० सें.मी. व सामू ७.५ असावा.लागवडीसाठी सुपीक,पाण्याचा निचरा होणारी जमीन चांगली.
 • पूर्ण वाढलेल्या (५ वर्ष) झाडास ४० ते ५० किलो शेणखत, २ किलो युरिया, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १/२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रती झाड द्यावे. नत्र दोन हप्त्यात विभागून द्यावे.
 • आवळा,चिंच,जांभूळ

 • आवळा : अत्यंत हलकी, खडकाळ, भरड, गाळाची व भारी ,क्षारपड जमिनीत लागवड करावी.
 • चिंच : हलक्या, निकृष्ट, बरड माळरानाच्या जमिनीत मध्यम काळ्या भारी, सुपीक जमिनीत लागवड करावी.
 • जांभूळ: वरकस, मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी.
 •  पूर्ण वाढलेल्या आवळा, चिंच व जांभूळ झाडास ५ वर्षानंतर ५० किलो शेणखत, १ किलो युरिया,१.५ किलो दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १/२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश जून-जुलै महिन्यात आणि उर्वरित नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
 • कवठ

 • मध्यम ते भारी ,उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. हे फळझाड खऱ्या किंवा चोपण जमिनीतही चांगले येते.
 •  पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ८०० ग्रॅम युरिया,१६०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ४०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश जून-जुलै महिन्यात व उर्वरित नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
 • संपर्क : डॉ. आदिनाथ ताकटे,९४०४०३२३८९ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी,जि.नगर)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com