थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात

सध्या थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. या आठवड्यात ढगाळ हवामान फारसे जाणवणार नाही.सध्या तरी पुढील काळात पावसाची शक्यता दिसत नाहीये.वाऱ्याच्या दिशेत बदल होण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळेही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
weekly weather
weekly weather

सध्या थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. या आठवड्यात ढगाळ हवामान फारसे जाणवणार नाही. ला निनाचा प्रभाव कमी झाल्याने सध्या तरी पुढील काळात पावसाची शक्यता दिसत नाहीये. वाऱ्याच्या दिशेत बदल होण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळेही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तापमानात वाढ होताच हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते. या आठवड्यात ढगाळ हवामान फारसे जाणवणार नाही. त्याचा फायदा कांदा व इतर भाजीपाला व फळपिकांना होईल. आंबा पिकास मोहोर निघण्यास ते अत्यंत पोषक होईल. त्यामुळे अधिक फळे लागतील. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. ला निनाचा प्रभाव कमी झाल्याने सध्या तरी पुढील काळात पावसाची शक्यता दिसत नाहीये. रब्बी पिकांच्या काढणी आणि उन्हाळी पिकांच्या पेरणीसाठी हे हवामान अत्यंत अनुकूल आहे. मात्र सापेक्ष आर्द्रतेत होणारी घट पिकांची पाण्याची गरज वाढवेल. त्यानुसार ठिबक सिंचनच्या कालावधीत वाढ करणे क्रमप्राप्त ठरेल. वाऱ्याच्या दिशेत बदल होण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळेही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण  कमाल तापमान रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. ठाणे व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५७ टक्के तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २४ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ कि.मी. आणि दिशा आग्नेयेकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २२ ते २७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १५ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. मराठवाडा  कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तर उर्वरित नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस तर बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात ते १७ अंश सेल्सिअस, तर औरंगाबाद जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर जिल्ह्यात १५ कि.मी. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ७ ते १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होऊन हवेचे दाब कमी राहतील. पश्‍चिम विदर्भ  बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. मात्र बुलडाणा जिल्ह्यात त्यात वाढ होईल. बुलडाणा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २३ ते २६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. मध्य विदर्भ  कमाल तापमान यवतमाळ, नागपूर व वर्धा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात ते १८ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ ते २९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात आग्नेयेकडून तर वर्धा, नागपूर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. पूर्व विदर्भ  कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० ते ३१ टक्के तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत ४१ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ११ ते १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कमाल तापमान कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व नगर जिल्ह्यांत १६ ते १७ अंश सेल्सिअस, तर उर्वरित कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ५४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ७ कि.मी. राहील. दिशा आग्नेय व नैर्ऋत्येकडून राहील. कृषी सल्ला

  • - आंबा मोहोरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसल्यास, नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
  • - सुरू उसाची लागवड करावी.
  • - उन्हाळी भुईमूग व बाजरीची पेरणी करावी.
  • - करडई पिकाचे मावा किडीपासून संरक्षण करावे.
  • - ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, अॅग्रीकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    www.agrowon.com