मॉन्सूनसाठी वातावरण अनुकूल

या आठवड्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता आहे. मात्र पावसाचे प्रमाण अल्प राहण्याची शक्‍यता आहे. यवतमाळ, बुलडाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली व सोलापूर या जिल्ह्यांत आज आणि उद्या चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील.
weekly weather
weekly weather

या आठवड्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता आहे. मात्र पावसाचे प्रमाण अल्प राहण्याची शक्‍यता आहे. यवतमाळ, बुलडाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली व सोलापूर या जिल्ह्यांत आज आणि उद्या चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब आठवडाभर राहणे शक्‍य आहे. त्याशिवाय ईशान्य व पूर्व भारतावरील हवेचे दाब ९९८ ते १००० हेप्टापास्कल इतके कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मॉन्सून वारे नैॡत्येकडून वाहण्यास हवामान अत्यंत अनुकूल बनले आहे. सुरुवातीच्या काळात मॉन्सून वाऱ्यांचा जोर कमी राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मॉन्सून वाऱ्यांना हवेचे दाब अनुकूल असले, तरी पावसाचे प्रमाण सुरुवातीस कमी राहील. तसेच पावसाच्या वितरणात फरक राहील.  या आठवड्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता आहे. मात्र पावसाचे प्रमाण अल्प राहण्याची शक्‍यता आहे. यवतमाळ, बुलडाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली व सोलापूर या जिल्ह्यांत आज आणि उद्या चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. भारतभर मॉन्सूनच्या वाटचालीस हवेचे दाब अनुकूल राहतील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत अधिक राहील. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत व पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती व वाशीम या जिल्ह्यांत वारे ताशी २० किमीपेक्षा अधिक वेगाने वाहतील. कोकण  आज आणि उद्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ४ ते ५ मि.मी. इतक्‍या कमी पावसाची शक्‍यता आहे. तर रायगड व ठाणे जिल्ह्यांतही अत्यल्प पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस तर रायगड, ठाणे जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस तर ठाणे, रायगड जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६३ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक, नंदूरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत आज आणि उद्या ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १९ ते २४ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर धुळे, जळगाव जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ४३ टक्के राहील. मराठवाडा  उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत आज ५ ते ८ मि.मी, तर उद्या ६ ते १८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. पावसाच्या वितरणात फरक राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. कमाल तापमान परभणी, नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तर लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत कमाल ते ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान कमी राहील. किमान तापमान उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, बीड व जालना जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस, नांदेड जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ७४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते ३० टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत काही दिवशी २५ ते ४४ मि.मी. तर काही दिवशी ३ ते ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. अकोला व वाशीम जिल्ह्यांत काही दिवशी ३ मि.मी., तर काही दिवशी १३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व  वायव्येकडून राहील. कमाल तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस तर बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६२ टक्के, तर दुपारची ३० टक्के राहील. मध्य विदर्भ यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात काही दिवशी ६ ते २५ मि.मी, तर वर्धा जिल्ह्यात ३ ते १२ मि.मी. पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १९ कि.मी. राहील. कमाल तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५० टक्के, तर दुपारची २५ ते ३१ टक्के राहील. पूर्व विदर्भ  चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत काही दिवशी १४ ते ३१ मि.मी., भंडारा जिल्ह्यात १६ ते २४ मि.मी. व गोंदिया जिल्ह्यात ४ ते १३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ४१ ते ४२ अंश सेल्सिअस राहील. हवामान ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २६ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  सोलापूर जिल्ह्यात काही दिवशी ७ ते २३ मि.मी., सांगली, पुणे व नगर जिल्ह्यांत ३ ते ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, नगर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८७ टक्के, तर दुपारची ३५ ते ५६ टक्के राहील. कृषी सल्ला 

  • नांगरणी, कुळवाची पाळी, धस्कटे, वेचणी इत्यादी पूर्वमशागतीची कामे पूर्ण करावीत.
  • फळभाज्या, कांदा आणि भात रोपवाटिका तयार करणे ही रोपवाटिकेची कामे पूर्ण करावीत.
  •  डबलबीन, लायमाबीन, पावटा या पिकांच्या लागवडी पूर्ण कराव्यात.
  • हळद पिकात मिरचीचे आणि आले पिकात पपईचे आंतरपीक घ्यावे.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया.)

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    www.agrowon.com