कमाल अन् किमान तापमानात वाढ शक्‍य

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४ हेप्टापास्कलपर्यंत वाढ होईल. त्यामुळे या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही. कमाल व किमान तापमान वाढण्यास या आठवड्यात सुरुवात होईल. मकरसंक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू झाले असून, कमाल व किमान तापमान वाढ होण्यास सुरुवात होईल.
कमाल अन् किमान तापमानात वाढ शक्‍य
weekly weather

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४ हेप्टापास्कलपर्यंत वाढ होईल. त्यामुळे या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही. कमाल व किमान तापमान वाढण्यास या आठवड्यात सुरुवात होईल. मकरसंक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू झाले असून, कमाल व किमान तापमान वाढ होण्यास सुरुवात होईल. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होण्यास सुरुवात होईल. हवामान थंड व कोरडे राहील. विदर्भात अल्पशा प्रमाणात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. या आठवड्यात हवामान बदल जाणवणार नाहीत. हवामानात स्थिरता येईल. सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढत जाईल. दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील. सकाळी थंड व दुपारी उष्ण हवामान राहील. धुळे, उस्मानाबाद, बीड व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याच्या ताशी वेग वाढ होऊन तो ताशी १५ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे सकाळी हवामान थंड राहील. मात्र सकाळची सापेक्ष आर्द्रताही कमी राहील. हिवाळी हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, यापुढे थंडी कमी होत जाईल. पश्‍चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे विदर्भात हवामान अल्पशा प्रमाणात ढगाळ राहणे शक्‍य आहे. काही भागांत अल्पशा पावसाची शक्‍यता निर्माण होईल. कोकण  पालघर व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर पालघर, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पालघर, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ६० टक्के, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ८४ ते ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नंदूरबार जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, नाशिक जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. मराठवाडा  कमाल तापमान उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर जालना जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, तर औरंगाबाद जिल्ह्यात ९ ते ११ सेल्सिअस इतके कमी राहील. लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. मात्र काही काळ ढगाळ राहील. इतर सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत ६८ टक्के लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ७० ते ७५ टक्के आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत २३ ते २७ टक्के इतकी कमी राहील. उर्वरित जिल्ह्यांत ३५ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात ५८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १२ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ  बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. मध्य विदर्भ  कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ कि.मी. व दिशा ईशान्येकडून राहील. पूर्व विदर्भ  कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ, तर उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. हवामान थंड व कोरडे राहील. चंद्रपूर जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ९१ टक्के, तर दुपारची २७ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर जिल्ह्यात १५ कि.मी., पुणे व नगर जिल्ह्यांत ११ ते १२ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यात ३ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. कृषी सल्ला 

 • उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी.
 • उन्हाळी भेंडी, दोडका, गवार, टरबूज, खरबूज या पिकांची लागवड करावी.
 • आंबा मोहराचे संरक्षण करावे.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com