weekly weather
weekly weather

उष्ण लहरी जाणवतील

महाराष्ट्रातील बऱ्याच भागात तापमान सरासरीपेक्षा ३.१ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक राहील. प्रामुख्याने विदर्भ व मध्य महाराष्ट्रात तापमान अधिक राहील. किमान तापमान मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा थोडे म्हणजेच १.६ अंश ते ३ अंश सेल्सिअसने कमी राहणे शक्‍य आहे.

महाराष्ट्रातील बऱ्याच भागात तापमान सरासरीपेक्षा ३.१ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक राहील. प्रामुख्याने विदर्भ व मध्य महाराष्ट्रात तापमान अधिक राहील. किमान तापमान मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा थोडे म्हणजेच १.६ अंश ते ३ अंश सेल्सिअसने कमी राहणे शक्‍य आहे. महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००६ हेप्टापास्कलपर्यंत कमी होतील. तसेच संपूर्ण भारतावरील हवेचे दाबही कमी होतील. जेव्हा तापमानात वाढ होते, तेव्हा हवेचे दाब कमी होतात. आज हिंदी महासागराच्या विषववृत्तीय भागावर व बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. आज सूर्य विषववृत्तीय भागावर असेल. आजच्या दिवशी दिवस आणि रात्रीचा कालावधी प्रत्येकी १२ तासांचा असेल, यालाच इंग्रजीत ‘इक्वीनॉक्‍स’ असे म्हटले जाते. याच दिवशी बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन वारे चक्राकार वाहण्यास सुरुवात होईल. त्याचे रूपांतर लहानशा चक्रीवादळात होईल व ते चक्रीय वादळ गुरुवार (ता. २४) रोजी म्यानमारकडे जाईल. अंदमान निकोबार भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस  होईल.  कोकणकिनारपट्टीतही आज हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन काही भागात पावसाची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. दुपारची व सकाळची सापेक्ष आर्द्रता घटेल. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात तापमान सरासरीपेक्षा ३.१ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक राहील. प्रामुख्याने विदर्भ व मध्य महाराष्ट्रात तापमान अधिक राहील. किमान तापमान मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा थोडे म्हणजेच १.६ अंश ते ३ अंश सेल्सिअसने कमी राहणे शक्‍य आहे. कोकण  हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग ३ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३९ ते ४० अंश सेल्सिअस इतके अधिक, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. किमान तापमान पालघर व ठाणे जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत ५४ ते ५५ टक्के तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ७४ ते ८४ टक्के राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १७ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर धुळे व जळगाव जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत १४ ते १८ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात २९ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते ९ टक्के इतकी कमी राहील.  मराठवाडा  कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १६ ते २७ टक्के इतकी कमी राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १३ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यांत १६ ते १८ कि.मी., तर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ताशी ६ ते १० कि.मी. राहील.  पश्‍चिम विदर्भ  बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १६ ते १८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १० टक्के राहील.  मध्य विदर्भ  कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. हवामान कोरडे राहील. पूर्व विदर्भ  गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते ४० अंश सेल्सिअस राहील आणि भंडारा जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस व भंडारा जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ५० टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ते २३ अंश सेल्सिअस, तर नगर व सोलापूर जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के, सांगली, सातारा जिल्ह्यात ६३ ते ६८ टक्के व नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत २७ ते ३८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ३० टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ८ ते १२ टक्के राहील.  कृषी सल्ला

  • नारळाच्या झाडांना ३ ते ४ दिवसांच्या अंतराने प्रति माड ४० लिटर पाणी द्यावे.
  • आंबा बागेत रक्षक फळमाशी सापळे लावावेत.
  • उन्हाळी भुईमूग पिकास ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • कुक्कुटपालन शेडवर गवत पसरवून टाकून शेडचे तापमान कमी करावे.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,  सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी  फोरम  फॉर साऊथ आशिया)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com