या आठवड्यात कमाल तापमानात वाढीची शक्यता

यापुढील काळात सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढत तसे कमाल तापमान वेगाने वाढत जाईल. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस अथवा त्याहून अधिक राहण्यामुळे हवामान उष्ण व कोरडे राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. किमान तापमानातही वेगाने वाढत जाऊन ते बहुतांशी जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील.
weekly weather
weekly weather

यापुढील काळात सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढत तसे कमाल तापमान वेगाने वाढत जाईल. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस अथवा त्याहून अधिक राहण्यामुळे हवामान उष्ण व कोरडे राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. किमान तापमानातही वेगाने वाढत जाऊन ते बहुतांशी जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमानात वाढ होईल. सूर्य विषुववृत्तावरच्या कक्षेत राहण्यामुळे १२ तास सूर्यप्रकाश व १२ तासांची रात्र राहील. यापुढील काळात सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढत तसे कमाल तापमान वेगाने वाढत जाईल. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस अथवा त्याहून अधिक राहण्यामुळे हवामान उष्ण व कोरडे राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. किमान तापमानातही वेगाने वाढत जाऊन ते बहुतांशी जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. तापमानाचा थेट परिणाम सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेवर होईल. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व आग्नेयेकडून राहील. कोकण  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर पालघर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांत २० ते ३० टक्के आणि सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व नैर्ऋत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  कमाल तापमान नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २० ते २४ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मराठवाडा  कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. मराठवाड्यामध्ये कमाल तापमानवाढीचा वेग हा अधिक असेल. त्यामुळे उष्मा अधिक जाणवेल. औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते २१ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व वायव्येकडून राहील. हवामान अत्यंत कोरडे व उष्ण राहील. पश्‍चिम विदर्भ  बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १७ ते २२ टक्के इतकी कमी राहील. तसेच दुपारची सापेक्ष आर्द्रताही अत्यंत कमी म्हणजे ९ ते १० टक्के इतकी राहील. हवामान अत्यंत उष्ण व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. व दिशा आग्नेय व नैर्ऋत्येकडून राहील. मध्य विदर्भ  वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व आग्नेयेकडून राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. पूर्व विदर्भ  कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस राहील. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या दोन जिल्ह्यांत अति उष्ण तापमान राहील. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस आणि भंडारा जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कमाल तापमान सांगली, पुणे व नगर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, तर सोलापूर व सातारा जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ६३ ते ७७ टक्के राहील. मात्र सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ती ४० ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत २० ते ३५ टक्के, तर पुणे व नगर जिल्ह्यांत १५ ते १८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्य, नैर्ऋत्य, आग्नेयेकडून राहील. कृषी सल्ला 

  • बाष्पीभवनाचा वेग वाढतोय. त्यामुळे पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर ८ दिवसांचे ठेवावे.
  • जनावरांना दिवसातून ४ वेळा पिण्यासाठी पाणी आणि मुबलक हिरवा चारा द्यावा.
  • फळबागांमधील वाळलेले गवत खोडाजवळ टाकून आच्छादन करावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com