कृषी सल्ला - सुरु ऊस, हरभरा, ज्वारी, गहू, तूर, कांदा, करडईसह फळभाज्या

कृषी सल्ला
कृषी सल्ला

सुरु ऊस

 • लागवडीसाठी जमीन तयार करावी. लागवडीकरिता को-८६०३२(निरा), को-९४०१२ (सावित्री), को. एम.-०२६५ (फुले-२६५) या जातींचे १० ते ११ महिने वाढीचे चांगले जाड, रसरशीत डोळे फुगलेले बेणे निवडावे.
 • सुरु उसाची लागवड कोरड्या पद्धतीने केल्यास चांगली होते.
 • ओली लागवड करावयाची असल्यास दोन डोळ्यांची टिपरी घेऊन, दोन टिपरीमधील अंतर १५-२० सेंमी ठेऊन मांडावीत. नंतर सरीत पाणी सोडून डोळे बाजूला येतील, अशा पद्धतीने पाण्यात दाबावीत.
 • लागवडीपूर्वी प्रतिहेक्टरी बेण्यासाठी १०० ग्रॅम कार्बेन्डाझीम अधिक मॅलॅथिऑन ३०० मि.लि. प्रती १०० लिटर पाणी या द्रावणात १० मिनिटांसाठी बेणे बुडवून ठेवावे. या प्रक्रियेनंतर ॲसिटोबॅक्टर १० किलो प्रती १०० लिटर पाणी या द्रावणात वरील बेणे ३० मिनिटे बुडवून लागवड करावी. या प्रक्रियेमुळे उसासाठीच्या नत्र खताच्या मात्रेमध्ये ५० टक्के बचत होते.
 • लागवडीवेळी प्रतिहेक्टरी २५ किलो नत्र (५४ किलो युरीया), ६० किलो स्फुरद (३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट), ६० किलो पालाश (१०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.
 • हरभरा  

 • फुलोरा/घाटे लागण्याच्या काळात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसतो.
 • फवारणी  ः प्रतिलिटर पाणी क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.२५ ग्रॅम किंवा क्लोरपायरिफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (४० टक्के प्रवाही) २.५ मि.लि.
 • रब्बी ज्वारी

 •      पोटरी ते निसवण्याची अवस्था.
 •      ज्वारीवर मावा कीड आणि चिकट्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
 • नियंत्रण ः  फवारणी प्रतिलिटर पाणी      डायमेथोएट (३४ टक्के) १ मि.लि.      प्रतिहेक्टरी ५०० लिटर पाणी फवारणीसाठी वापरावे. वाटाणा  

 •   मावा या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे.
 •  नियंत्रण ः फवारणी प्रतिलिटर पाणी     इमिडाक्लोप्रीड ०.४ मिलि.
 • भुरी नियंत्रण ः गंधक २.५ ग्रॅम किंवा डिनोकॅप १ मिलि प्रतिलिटर पाणी
 • भेंडी        फळे लागण्याची अवस्था.      फळे पोखरणारी अळी       नियंत्रण ः फवारणी प्रतिलिटर पाणी      निंबोळीवर आधारित कीटकनाशक अझाडिरेक्टीन (१०,०००    पीपीएम) ५ मिलि किंवा      प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा      डेल्टामेथ्रीन (२८  इसी ) ०.५ मिलि किंवा      क्विनॉलफॉस (२५ इसी) २ मिलि गहू      फुटवे फुटण्याची अवस्था.

 • ज्या ठिकाणी गहू पेरणी करून २१ दिवस झाले असतील त्या ठिकाणी नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्टरी ६० किलो या प्रमाणे द्यावा.
 • पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
 • या अवस्थेत मावा व तुडतुड्यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. थायामिथोक्झाम (३० एफएसजी) ७.५ मिलि प्रती १० किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया केली असेल अशा पिकांचा पहिल्या टप्प्यात रसशोषक किडीपासून संरक्षण होण्यास मदत झाली आहे.
 • तूर      शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणः        फ्लुबेंडीअमाईड (४८ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रती १० लिटर पाणी. कांदा      वाढीची अवस्था. नियंत्रण ः  फवारणी प्रतिलिटर पाणी फुलकिडे  ः      डायमेथोएट (३० इसी) १ मि.लि. किंवा      प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.लि      फिप्रोनील १.५ मिलि करपा रोग   ः      क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा      मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा      कार्बेन्डाझिम १ ग्रॅम      द्रावणात उत्तम दर्जाचे स्टिकर १ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळावे. कापूस      सध्या पीक काढणीच्या स्थितीत आहे. या अवस्थेत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीचे पीक वेळेवर म्हणजे जानेवारी महिन्यात काढणी पूर्ण करावी. गुलाब      अनेक ठिकाणी गुलाबामध्ये पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसत आहे. नियंत्रण ः   अॅसिटामिप्रीड ०.४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी करडई      पीकवाढीच्या अवस्थेत आहे.      मावा किडीचे नियंत्रण ः      अॅसिटामिप्रिड (२० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) ०.२ मि.लि. प्रतिलिटर पाणी.

  वांगी      फळे लागण्याची अवस्था.      फळे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणः  फवारणी प्रतिलिटर पाणी      प्रोफेनोफॉस २ मिलि किंवा      स्पिनोसॅड  ३ ते ४ मिलि किंवा      इंडोक्झाकार्ब १ मिलि

   संपर्क : ०२४२६-२४३२३९ (ग्रामीण कृषी हवामान सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com