शेतकरी नियोजन ः बेदाणा

सुनील महादेव माळी एकूण बेदाणा शेड : १३ शेडचा आकार ः लांबी २५० फूट बाय ४० फूट रुंद एका शेडमध्ये २ रॅक प्रति हंगाम १०० ते १५० शेतकऱ्यांचा बेदाणा तयार केला जातो चारशे ते साडेचारशे टन बेदाणा निर्मितीहोतो.
शेतकरी नियोजन बेदाणा
शेतकरी नियोजन बेदाणा

कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील सुनील  महादेव माळी हे पूर्वी द्राक्ष पीक घेत असत. मात्र, सन १९९७-९८ मध्ये निसर्गाची अवकृपा झाली. द्राक्ष बागांचे नुकसान झाले. तेव्हापासून टेबल ग्रेप्सपेक्षा बेदाणा उत्पादनाचा पर्याय निवडला. अन्य शेतकऱ्यांकडील बेदाणा शेडवर अनुभव घेतला. त्यानंतर स्वतः निर्मिती सुरू केली. केरेवाडी येथे जागा भाडे तत्त्वावर घेतली. सुरुवातीला आठ शेड उभारली. यामध्ये बेदाणा निर्मिती सुरू केली.  पूर्वी गावातील आणि परराज्यातील मजुरांद्वारे बेदाणा प्रतवारी करून त्याचे पॅकिंग केले जायचे. सन २०१९ पासून माळी यांनी बेदाणा स्वच्छता, प्रतवारी (क्लिनिंग, ग्रेडिंग) यासाठी यंत्रांचा वापर सुरू केला. यामुळे प्रति तास दोन टन बेदाणा स्वच्छ करून त्याची प्रतवारी होते. यामुळे मजूरबळ, वेळ व श्रम यांची बचत झाली. बेदाण्याचा दर्जा व मूल्यवर्धन वाढले आहे. साहजिकच माळी यांच्याकडे शेतकरी ग्राहकांची संख्या वाढून व्यवसायाचे नवे साधन त्यांच्यासाठी खुले झाले आहे. यंत्रामुळे झालेले फायदे   एका तासात मळणी, स्वच्छता व प्रतवारी.   ताशी दोन टन स्वच्छ आणि प्रतवारी क्षमता.   प्रतवारीप्रमाणे बेदाणा बॉक्समध्ये थेट येतो.   बेदाण्याचे वजन करून त्वरित पॅकिंग. भांडवल   शेड उभारणी    १० लाख रु.   बेदाणा यंत्र    ३० लाख रु.   कच्चा माल    १० लाख रु. असे असते नियोजन

  •   हंगाम : जानेवारी ते एप्रिल हे चार महिने.
  •   आमच्या भागामध्ये ३५ अंश सेल्सिअस तापमानामुळे व आर्द्रता कमी असते. त्याचा फायदा बेदाण्यास चांगली चकाकी येण्यात होतो.
  •   शेतकऱ्यांच्या शेतावर द्राक्ष काढली की डिपिंग इन केले जाते.
  •   मजुरांच्या मदतीने द्राक्षे रॅकवर टाकली जातात.
  •   तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या दिवशी कार्बोनेट बरोबर बुरशी येऊ नये आणि रंग बदलू नये 
  • यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक फवारणी केल्या जातात.
  •   रॅकवर साधारण दहा ते बारा दिवस द्राक्षे सुकवली जातात.
  •   द्राक्ष रॅकवर असताना मजुरांच्या द्वारे खराब झालेले मणी सातत्याने काढून टाकले जातात.  स्वच्छता ठेवली जाते.
  •   १२ व्या दिवशी पाइपच्या साह्याने जाळीवर माल पाडला जातो.
  •   त्यानंतर बेदाणा धुतला जातो.
  •   गंधक लावून भट्टी लावली जाते. भट्टी सहा ते सात तास ठेवतात. सकाळी भट्टीतून काढलेला बेदाणा हा उन्हात वाळवला जातो.
  •   त्याच दिवशी संध्याकाळी हा बेदाणा गोळा करून यंत्राद्वारे प्रतवारी केली जाते.
  •   प्रतवारी केलेला बेदाणा बॉक्समध्ये पॅक केला जातो. शेतकऱ्यांनी सुचवलेल्या शीतगृहात पोचवला जातो.
  •   आमची एक शास्त्रीय पद्धत ठरलेली आहे. मात्र एखाद्या शेतकऱ्याला काही वेगळे नियोजन अपेक्षित असल्यास त्याच्या सूचनेनुसार बेदाणा तयार केला जातो.
  •  रॅकवर ठेवलेल्या प्रत्येक मालाला शेतकऱ्याचे नावाचा बॅनर लावलेला असतो. यामुळे प्रत्येकाचा माल ओळखणे सोपे जाते.
  •  पंधरा दिवसानंतर दुसऱ्या शेतकऱ्याचा माल सुकविण्यासाठी टाकला जातो.
  • - सुनील महादेव माळी,  ९७६६८१४४१० (शब्दांकन ः अभिजीत डाके)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com